Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लकी नंबर आणि करीयर

Webdunia
ND
तुम्ही तुमच्या करीयरच्या बाबतीत चिंतेत असाल तर आता करीयर काऊंसेलरकडे जाण्याची गरज नाही, तुमच्या लकी नंबरनुसार तुम्ही करीयरची निवड करू शकता.

लकी नं. 1 : ज्यांचा लकी नं. 1 आहे ते न्यायव्यवस्था, प्रशासन, वैद्यकिय, इलेक्ट्रॉनिक, संशोधन या क्षेत्रात रस घेणारे असू शकतात. या कामात जास्त धावपळ करावी लागत नाही. या नंबरच्या लोकांसाठी बौद्धिक काम करायला आवडते.

लकी नं. 2 : या नंबरचे लोक सृजनशील असतात. लेखन, जल तथा वायूशी संबंधित काम, शिक्षणक्षेत्र, जाहिराती, चित्रपट या व्यवसायांशी त्यांचा संबंध येऊ शकतो.

लकी नं. 3 : ज्यांचा लकी क्रमांक 3 आहे, ती मंडळी समाजसेवा, राजकरारण, हॉटेल व्यवसाय, वनस्पती, शिक्षण, समीक्षण आदी किचकट व्यवसायांत उतरू शकतात.

लकी नं. 4 : या नंबरच्या लोकांना वेगवान कामात रस असतो. कामात धावपळ यांना आवडते. ही मंडळी लॉटरी, केमिकल, धातूशी संबंधित कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात.

लकी नं. 5 : या लकी क्रमांकाचे लोक व्यापार-व्यवसायात निपुण असतात. या लोकांसाठी कॉमर्स, बँकिंग, अकाउंटशी संबंधित कामे यांच्यासाठी शुभ आणि फायदेशीर ठरतात.

लकी नं. 6 : ज्या लोकांचा लकी नंबर 6 असतो ती मंडळी कला क्षेत्रात जास्त प्रगती करतात. सिनेमा, कला, फॅशन, टीव्ही शो, ग्लॅमर वर्ल्ड, पेंटिंग, सजावट, इत्यादी कामात ते निपुण असतात. या क्षेत्रात त्यांना यशही भरपूर मिळते.

लकी नं. 7 : ज्यांचा लकी नंबर 7 असतो ते लोकं सरळ मनाचे असतात. यांना नोकरीपेक्षा व्यापार जास्त फायदेशीर ठरतो. डॉक्टर, हॉटल किंवा खाण्या पिण्याचे काम, लक्झरी आयटम, कॉस्मेटिक्स व कपड्याचा व्यापार या लोकांसाठी उत्तम असतो.

लकी नं. 8 : ज्या लोकांचा लकी नंबर 8 असतो ते धावपळीची कामे चांगल्या प्रकारे करू शकतात. यांच्यात भरपूर प्रमाणात ऊर्जा
असते. म्हणून हे लोक पोलिस, सैन्यदल, सिक्युरिटी, टुरिझम, वकिल बनू शकतात. स्टीलच्या व्यवसायातसुद्धा या लोकांना यश मिळू शकते.

लकी नं. 9 : या नंबरचे लोक बोलण्यात माहिर असल्यामुळे सेल्समन, नेता, सरकारी अधिकारी, पब्लिक रिलेशन ऑफिसर, रेडियो जॉकी बनू शकतात. किंवा आपल्या स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात. या लोकांमध्ये नेतृत्वगुण असल्यामुळे कुणाच्या हाताखाली काम करणे अवघड जाते.

कुठल्या ही करियरची निवड करण्या अगोदर फक्त आपली आवड नव्हे तर आपली योग्यता व लकी नंबराकडेसुद्धा लक्ष दिले तर तुम्ही
नक्कीच सफल व्हाल.

ईद-उल-अजहा : इस्लाम, ज्यू, ख्रिश्चन आणि हिंदू धर्मात प्राण्यांची कुर्बानी का दिली जाते?

Ganga Dussehra 2024 : 100 वर्षांनंतर गंगा दशहऱ्याला घडत आहे अद्भुत योगायोग, यावेळी पूजा करा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

गंगा दशहरा 2024 या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये गंगाजल घाला

चाणक्य नीतीनुसार हे 6 लोक लवकर वृद्ध होतात

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट प्रकरणात मृतांची संख्या नऊ वर

धारावीची जमीन महाराष्ट्र सरकारच्या खात्यांना हस्तांतरित होणार,अदानी समूह फक्त पुनर्विकास करणार

इलॉन मस्कनंतर राहुल गांधींनीही EVM वर वक्तव्य केलं, म्हणाले-

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्यात घरातून 17.2 लाख रुपयांचे चरस जप्त, एकाला अटक

Show comments