Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘कालप्रवास’ करण्याची क्षमता केवळ मानवातच

Webdunia
मंगळवार, 29 डिसेंबर 2015 (15:21 IST)
नवीन संशोधनात मानसिक पातळीवर ‘कालप्रवास’ करण्याची क्षमता केवळ मानवातच असल्याचे सिद्ध झाले आहे. मानवी मेंदूच ‘टाइम ट्रॅव्हल’साठी सक्षम असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ही क्षमता जगातील इतर कोणत्याही प्राणिमात्रामध्ये नसल्याचेही संशोधकांनी सांगितले.
 
घटनाक्रम लक्षात ठेवणे, त्याची आठवण येणे, तसेच जसेच्या तसे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहणे हे केवळ मानवी मेंदूच्या द्वारेच शक्य असल्यामुळेच मानवी मेंदू भूतकाळातच नव्हे तर भविष्य काळातही मनाच्या माध्यमातून संचार करू शकतो असे मत संशोधनाअंती मांडण्यात आले आहे. त्याचवेळी यासाठीच्या चाचण्या इतर अनेक प्राण्यांच्यावर करण्यात आल्या. त्या अयशस्वी ठरल्या. मानवाच्या व्यतिरिक्त काही प्राण्यांमध्ये एखादी घटना स्मृतीमध्ये ठेवण्याचे वर्तन आढळले. मात्र ते टाइम ट्रॅव्हलसारखी गोष्ट अनुभवण्यास पुरेसे नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. एखादी गोष्ट रचून ती प्रतिबिंबित करण्याची क्षमता फक्त मानवामध्येच आहे. जर्मनीतील रुर विद्यापीठामध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात आले. न्यूरोसायन्स अँड बिहेविरल सायन्स जर्नलमध्ये हे संशोधन छापण्यात आले आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

Paris Olympics: अदिती आणि दीक्षा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

Lok Sabha: राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील,विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय

राहुल गांधी विरोधी पक्षनेते, लोकसभेत 10 वर्षांनंतर असणार विरोधी पक्षनेता; हे पद का महत्त्वाचं?

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला की त्याच्या खेळीतून आणखी काही संदेश दिला आहे?

चीन आणि पाकिस्तानचा एकमेकांवरील विश्वास डळमळीत झालाय का?

सर्व पहा

नवीन

नाचणी ओट्स ढोकळा रेसिपी, जाणून घ्या कशी बनवावी

कोणत्या वयात त्वचा सैल होऊ लागते? त्वचा घट्ट ठेवण्याचे नैसर्गिक उपाय जाणून घ्या

Online Kitchen ऑनलाइन किचन बिझनेस सुरु कसे कराल जाणून घ्या

रोज दुधासोबत एक जिलेबी खाल्ल्यास होतील अनेक फायदे

टोमॅटो जॅम रेसिपी, कसा बनवाल जाणून घ्या

Show comments