Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेंदूचा कर्करोग आणि उपचार

Webdunia
मंगळवार, 28 जानेवारी 2020 (12:24 IST)
कॅन्सर एक असा असाध्य आजार ज्याचे नाव एकूणच अंगाची थरकाप होते. पण विचार करून बघा जे ह्या असाध्य आणि बरे न होणारे जीवघेणे आजारांशी झुंज घेतात. त्यांची मन:स्थिती कशी होत असेल. या काळात त्यांना या आजारासाठी औषधोपचाराची गरज तर असतेच त्याचबरोबर घरातील प्रत्येक सदस्यांच्या मानसिक आधाराची गरज असते. कॅन्सर या आजारामुळे शरीरातील प्रतिकारक शक्ती कमी होत जाते. कॅन्सरचे विषाणू लवकर प्रसरण पावतात. झपाट्याने ह्यांची वाढ होते.  
 
कॅन्सर शरीरात कोठे ही होऊ शकते. आज आपण ब्रेन च्या कॅन्सर बद्दल जाणून घेऊ या...
कॅन्सरचं असं रूप जे मेंदूत वाढतं. हा मेंदूचा आजार आहे. ह्या आजारात मेंदूत कॅन्सरचे घटक विषाणू मेंदूतील ऊतकांमध्ये वाढतात. यामुळे ऊतकांत गाठी बनतात ज्यांचे रूपांतर नंतर कॅन्सर मध्ये होतं. यामुळे मेंदूतील आजार वाढतात, मेंदूच्या सर्व क्रिया थांबतात. स्नायूंच्या हालचाली कमी होणे सुरू होते, मुंग्या येतात, स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. ब्रेन कॅन्सरच्या गाठी मेंदूवर प्रभाव टाकतात. त्यामुळे मेंदू व्यवस्थित काम करत नाही, त्याचा परिणाम शरीरांवर होऊ लागतो.
 
ब्रेन कॅन्सरचे लक्षण :-
1 चक्कर येणे, उलट्या होणे, आणि डोके दुखी
2 शरीरात कुठेही मुंग्या येणे. बोलायला त्रास होणे. शरीरात कंपन, स्नायू आखडणे
3 नीट ऐकायला न येणे
4 स्पर्श न जाणवणे, शरीरातील अवयवांमध्ये हालचाल कमी होणे
5 थकवा येणे
6 औदासीन्यात किंवा डिप्रेशन जाणवणे
7 वैचारिक शक्ती मध्ये परिवर्तन
8 दृष्टीस बदल होणे
 
ब्रेन कॅन्सर होण्याचे कारण :-
* बऱ्याच काळापासून केमिकल किंवा रेडिएशनच्या संपर्कात असल्याने
* ल्युकेमियाचा आजार झाला असल्यास कॅन्सर होण्याची शक्यता असते
* वंशपरंपरागत कुटुंबातील सदस्याला झाला असल्यास
* एड्सच्या रुग्णांना हा आजार होण्याची दाट शक्यता असते
 
ब्रेन कॅन्सर ची चाचणी :- 
ब्रेन कॅन्सर आहे की नाही काही विशिष्ट पद्धतीच्या चाचण्यांमुळे कळते
1 न्यूरोलॉजी चाचणी
2 एम आर आय 
3 सी टी स्कॅन 
4 अँजिओग्राफी 
5 बायोप्सी
 
ब्रेन कॅन्सरचे निदान :-
सुरुवातीच्या काळात कळल्यावर त्याच्यावर औषोधोपचार करता येतं
* सर्जरी: सर्जरी करून ज्या भागास गाठी आहे, त्या गाठींना सर्जरीने काढतात
* रेडिएशन चिकित्सा: गाठींना रेडिएशन देऊन नष्ट करतात
* केमोथेरॅपी: कॅन्सरच्या कौशिकांचा नायनाट करण्यासाठी केमोथेरेपीचे औषध नसांतून देतात
* टार्गेटेड औषधोपचार: नसांतून इंजेक्शनने औषध देऊन कॅन्सरच्या विषाणूंचा नायनाट करतात
* पॅलिएटिव्ह केअर: रुग्णांना मानसिक आधार आणि पाठबळ देणे जेणे करून त्यांना या असाध्य आजाराशी झुंज देताना सोपं जातं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

Shiv Jayanti Wishes 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश

मसाला मॅकरोनी रेसिपी

Breakfast recipe : रवा आप्पे

Career in PG Diploma in Operations Management : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट

12 तासांत किती पाणी प्यावे? शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या

पुढील लेख
Show comments