Dharma Sangrah

गरोदरपणातला स्तन कॅन्सर!

Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (13:12 IST)
स्तनांचा कॅन्सर ही आजच्या युगातली महिलांपुढील सर्वात मोठी समस्या आहे. गरोदर असताना किंवा गर्भारणपणानंतर वर्षभरात स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. प्रमाण कमी असलं तरी या व्याधीकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखं नाही. गरोदरपणातल्या स्तनांच्या कॅन्सरबाबत... 
 
गरोदरपणात तसंच त्यानंतर स्त्रीच्या शरीरात हार्मोन्सशी संबंधित अनेक बदल होतात. यामुळे स्तन कॅन्सर विकसित होण्यास पोषक वातावरण तयार होतं. मोठ्या वयातल्या गरोदरपणामुळे ही समस्या उद्भवू शकते. 32 ते 38 या वयोगटातल्या गरोदर  स्त्रियांना स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. 
 
लक्षण : गरोदरपणातल्या स्तन कॅन्सरमध्ये तीच लक्षणं आढळून येतात. पण गरोदरपणात स्तनांच्या आकारात बदल होत राहतो. गाठीही येतात. त्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचं निदान लवकर होत नाही आणि उपचारांना उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो. 
 
काळजी : गरोदरपणात स्तनांची नियमित चाचणी करायला हवी. स्तन तसेच काखेत आलेल्या काठीकडे दुर्लक्ष करू नये. अल्ट्रासाउंड, एमआआय चाचणीद्वारे गाठींच निदान करून घेता येईल. गरोदरपणातल्या स्तन कॅन्सरवर वेळेत उपचार करून घेणं गरजेचं आहे. घरात स्तन कॅन्सरचा इतिहास असेल तर स्तनांची वेळोवेळी तपासणी करून घ्यायला हवी. गरोदरपणातला स्तन कॅन्सर योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो. गरज आहे ती वेळेत निदान होण्याची. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

उपवास स्पेशल शिंगाड्याचा शिरा

हिवाळ्यात छातीत दुखणे ही एक धोक्याची घंटा आहे का? त्याकडे दुर्लक्ष करू नका

BEL मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता होण्याची शेवटची संधी, पात्रता जाणून घ्या

हिवाळ्यात चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर या 5 गोष्टी हळदीमध्ये मिसळून लावा

थंडीत आरोग्याची काळजी घ्या, या 5 टिप्स वापरून पहा

पुढील लेख
Show comments