Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सतत सुटणाऱ्या खाजेपासून 'या' नवीन औषधामुळे मुक्ती मिळू शकते

Webdunia
रविवार, 14 जानेवारी 2024 (16:30 IST)
अनेक लोकांसाठी खाज सुटणं हा त्रासदायक किंवा तात्पुरता होणारा त्रास असतो, परंतु आपल्यातल्या पाचपैकी एका व्यक्तींना अनेक आठवडे किंवा महिनोनमहिने खाजेचा त्रास होत असतो. आता नवीन उपचारांमुळे अशा लोकांना एक आशेचा किरण दिसतोय.
 
शायान बुलेट 18 वर्षांची होती आणि तिच्या कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी अचानकपणे तिला असह्य अशी खाज सुटायला लागली.
 
"मला सुरुवातीला वाटलं की हे गजकर्ण असेल, पण ते अतिशय दुर्बल करणारं होतं,” असं ती म्हणाली.
 
"मला गरम पाण्याने अंघोळ करता यायची नाही, मी माझ्या शाळेच्या गृहपाठावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हते, मला झोप यायची नाही. कारण मी पलंगावर पडल्यानंतर जवळपास दोन तास खाजवत असायचे. मला उठून स्वतःचं शरीर स्वच्छ करावं लागायचं. कारण माझ्या चादरीवर रक्ताचे डाग असायचे.”
 
शायानला प्रुरिगो नोड्युलरिस (पीएन) चं निदान झालं, जो एक दीर्घकाळ असलेला दाहक त्वचारोग आहे. मराठीत त्याला आपण “खाज सुटणाऱ्या गाठी" असं म्हणू शकतो.
वैद्यकीयदृष्ट्या सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या खाजेची दीर्घकाळ असलेली खाज अशी व्याख्या केली जाते.
 
दीर्घकाळ असलेली खाज त्वचाविकाराशी संबंधित असते, उदा. गजकर्ण, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी आणि सोरायसिस, परंतु मूत्रपिंडाचा गंभीर आजार, यकृत निकामी होणं आणि लिम्फोमा इत्यादी इतर वैद्यकीय परिस्थितींचादेखील यामध्ये समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये बरीच वर्ष खाजेचा सामना करावा लागू शकतो.
 
या संवेदनेमुळे वेड लागण्याची पाळी येऊ शकते. दांन्ते इन्फर्नो (व्हीडिओ गेम) मध्ये, लबाडांना नरकाच्या आठव्या वर्तुळामध्ये दोषी ठरवण्यात येतं, तिथे त्यांना “बिलकूल आराम मिळणार नाही आणि संताप येईल अशा भयंकर खाजेचा सामना करावा लागतो". सोरायसिसचा सामना करणाऱ्या व्यक्तींना याची कल्पना येऊ शकते, कारण या स्थितीत येणार्‍या खाजेची तुलना लाल मुंग्यांच्या चावण्याशी केली जाते.
 
यकृताचा आजार असलेल्या रुग्णांना प्रत्यारोपण करावं लागतं कारण ते खाजेची संवेदना सहनच करू शकत नाहीत. काही कर्करोगाचे रुग्ण जीवनरक्षक औषधं घेणं थांबवतात कारण औषधांमुळे खाज सुटू शकते.
 
“दीर्घकाळ असलेली खाज ही दीर्घकाळापासून असलेल्या दुखण्याइतकी दुर्बल करणारी असू शकते असं अभ्यासात दिसून आलंय, परंतु मी असं म्हणेन की ते यापेक्षाही भयानक आहे,” असं न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसिनचे क्लिनिक आणि न्यूरोइम्युनोलॉजिस्ट ब्रायन किम म्हणतात.
"दीर्घकाळापासून असलेल्या दुखण्यामुळे तुम्हाला मंद वेदना होतात, हे ‘दहा पैकी सहा' दुखण्यांसारखं आहे ज्यामध्ये दुखणं थांबतच नाही. परंतु तुम्ही झोपू शकता. दीर्घकाळ असलेली खाज ही वेगळी असते कारण ती तुम्हाला आरामच करू देत नाही. त्वचेला ओरबाडल्यामुळे तुम्हाला रात्रभर झोपच येत नाही. त्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हे अधिक दुर्बल करणारं असू शकतं.”
 
तथापि, त्याच्या व्यापकतेचा अंदाज असूनही आतापर्यंतच्या शास्त्रज्ञांना दीर्घकाळ असलेल्या खाजेचं कारण समजलं नव्हतं.
 
दुसरीकडे, तुलनेने टोचणाऱ्या खाजेबद्दल अधिक गोष्टी समजल्या आहेत. जर तुम्हाला डास चावला किंवा विषारी वनस्पतींच्या संपर्कात आलात, तर त्वचेतील रोगप्रतिकारक पेशी हिस्टामाइन आणि इतर घटक बाहेर सोडतात, जे संवेदनशील मज्जातंतूंच्या पृष्ठभागावर लहान रिसेप्टर्स तयार करतात, ज्यामुळे त्या ज्वलंत होतात आणि खाज सुटण्याचा सिग्नल पाठीचा कणा आणि मेंदूपर्यंत पाठवला जातो. दीर्घकाळ असलेली खाज त्रासदायक असली तरी त्यावर अँटीहिस्टामाइन्स किंवा स्थानिक स्टिरॉइड्स मार्फत उपचार केले जाऊ शकतात. परंतु दीर्घकाळ असलेल्या खाजेवर अँटीहिस्टामाइन्सचा कोणताही परिणाम होत नाही.
 
शास्त्रज्ञांना खात्री पटलेली की, खाज सुटणं हे वेदनेचं फक्त एक सौम्य स्वरूप आहे.
 
परिणामी, खाज सुटण्याची वैद्यकीय व्याख्या करण्यात आल्यानंतर, गेल्या 360 वर्षांपासून खाजेवरील उपचारांत काही प्रमाणात प्रगती झाली आहे.
 
याचं एक कारण असंही आहे की, शास्त्रज्ञांना खात्री पटलेली की खाज सुटणं हे वेदनेचं फक्त एक सौम्य स्वरूप आहे. या गैरसमजाचं मूळ 1920 च्या दशकाच्या सुरुवातीला शोधता येऊ शकतं, जेव्हा ऑस्ट्रियन-जर्मन फिजियोलॉजिस्ट मॅक्स वॉन फ्रे यांनी त्यांच्या प्रयोगशाळेतील सहभागींची त्वचा स्पिक्युल्स नावाच्या सूक्ष्म धारदार वस्तूने छेडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना असं आढळून आलं की सुरुवातीच्या वेदनानंतर खाज सुटण्याची संवेदना होते.
तथापि, 2007 मध्ये सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या झोउ-फेंग शेन यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांनी पाठीच्या कण्यातील न्यूरॉन्स (मज्जातंतू पेशी) च्या उपसंचावर खाजेला समर्पित असलेला एक रिसेप्टर शोधला. रिसेप्टर नसलेल्या उंदरांना खाज सुटत नव्हती. त्यांना कितीही गुदगुल्या झाल्या किंवा चिडचिड झाली तरी त्यांनी स्वतःला ओरबाडलं नाही. तरीही त्यांना सामान्य वेदना जाणवत होत्या.
 
दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, शास्त्रज्ञांना पाठीच्या कण्यामध्ये न्यूरॉन्सचा एक समूह सापडला होता जो विशेषत: खाजेची संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवतो.
 
तेव्हापासून संशोधकांनी खाजेशी संबंधित इतर विशिष्ट रिसेप्टर्स आणि न्यूरॉन्स शोधून काढले आहेत. उदाहरणार्थ, माससंबंधित जी-प्रोटीन-कपल्ड रिसेप्टर्स संवेदनाक्षम न्यूरॉन्सवर आढळतात जे त्वचेला उत्तेजित करतात. ते थेट मेंदूला सिग्नल पाठवतात आणि आणि खाज पसरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
 
दरम्यान, 2017 मध्ये ब्रायन किम आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर द स्टडी ऑफ इच अँड सेन्सरी डिसऑर्डरमधील सहकाऱ्यांनी शोधून काढलं की, त्वचेची जळजळ झाल्यामुळे रोगप्रतिकारक पेशी IL-4 आणि IL-13 नावाचं रासायनिक संदेशवाहक सोडू शकतात. सायटोकाइन्स म्हणून ओळखली जाणारी ही रसायनं त्वचेतील संवेदनाक्षम न्यूरॉन्सला बांधून ठेवतात, ज्यामुळे खाज सुटते.
"ब्रायन किमच्या कार्याबद्दल एक भन्नाट गोष्ट म्हणजे त्यांनी शोधून काढलं की, हे रेणू केवळ खाज असलेल्या न्यूरॉन्सलाच बांधून ठेवतात असं नाही, तर ते त्वचेतील इतर रेणूंचा खाज असलेल्या न्यूरॉन्सला सक्रिय करण्यासाठीचा थ्रेशोल्ड कमी करतात, त्यामुळे त्यांनी सर्वसाधारणपणे ॲलर्जी असलेल्या लोकांना जास्त खाज सुटण्याबाबत अधिक संवेदनशील केलं,” असं सॅन फ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ, त्वचाविज्ञानाचे प्राध्यापक मार्लिस फासेट म्हणतात.
 
फासेट यांनी आणखी एका ‘खाज सायटोकाइन', IL-31 वर लक्ष केंद्रित केलंय, ज्याने खाज-विशिष्ट न्यूरॉन्सला चालना देत असल्याचं पाहायला मिळतं. फासेट यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच प्रकाशित होणार्‍या अभ्यासावरून असं दिसून येतं की, इतर प्रकारची खाज असलेल्या साइटोकाइन्सप्रमाणेच, IL-31 देखील खाज असलेल्या न्यूरॉन्सचा थ्रेशोल्ड कमी करतं, ज्यामुळे ते अधिक वेळा आणि सहजपणे ज्वलंत होतात.
 
त्वचेतील न्यूरॉन्स जे IL-31 द्वारे सक्रिय होतात ते देखील रोगप्रतिकारक प्रतिसादाला दाबण्याचा प्रयत्न करतात, असंही दिसून येतं.
 
2023 च्या अभ्यासात फॅसेट यांना असं आढळून आलंय की खाज निर्माण करण्याबरोबरच IL-31 आजूबाजूची जळजळ देखील कमी करतं जेणेकरून खाज सुटण्याची भावना शेवटी कमी होते. IL-31 साठी कोड असलेलं एक जनुकं त्यांच्या टीमने उंदरांमधून काढून टाकलं आणि नंतर उंदरांना एक सर्वसामान्य ॲलर्जी म्हणून गणल्या जाणा-या घरातील धूळीच्या कणांमध्ये सोडून दिलं. अपेक्षेप्रमाणे, धुळीच्या कणांमुळे IL-31 नसलेल्या उंदरांना खाज सुटली नाही. मात्र, आजूबाजूच्या परिसरातील दाहकता असह्य झाली.
 
“गेल्या 15 वर्षांपासून हे चांगलंच लक्षात आलंय की जेव्हा तुम्ही उंदरांच्या त्वचेत किंवा मणक्यातील द्रवपदार्थात IL-31 इंजेक्ट करता तेव्हा प्राणी ताबडतोब अनियंत्रितपणे खाजवू लागतो," असं फॅसेट म्हणतात.
 
“असं असताना एक पंचाईत कायम राहिली ती म्हणजे जर तुम्ही ते खाजयुक्त सायटोकाइन काढून टाकलं तर टिश्यूंमध्ये जळजळ कमी होण्याऐवजी ती अधिक वाढते. आणि त्यामुळे फार फरक पडत नाही, कारण बहुतेक टिश्यूंमध्ये जिथे खाज सुटते आणि जळजळ होते तिथे त्या गोष्टी एकत्रित येऊन हलतील अशी अपेक्षा आपण केली पाहिजे."
 
असे दिसून येतं की, त्वचेतील न्यूरॉन्स जे IL-31 द्वारे सक्रिय होतात ते देखील जळजळीवर लक्ष ठेवून रोगप्रतिकारक प्रतिसाद कमी करतात. हा शोध महत्त्वाचा आहे, कारण याचा अर्थ असा आहे की IL-31 ला लक्ष्य करणार्‍या खाज-विरोधी औषधांचे अनपेक्षित परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे जळजळ नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
 
खाजेवरील उपचार
अशाप्रकारची औषधं आधीपासूनच तयार केली जात आहेत. उदाहरणार्थ, नेमोलिझुमॅब, जे IL-31 रिसेप्टरला लक्ष्य करतं, याने नुकत्याच Atopic dermatitis (AD) च्या उपचारांसाठीच्या क्लिनिकल चाचण्यांचा दुसरा आणि तिसरा टप्पा पार केला. गजकर्णाच्या या प्रकारात त्वचा कोरडी पडते, तिला खाज सुटते आणि सूज येते.
 
या दुर्बल अवस्थेने ग्रासलेल्या लोकांना आधीच डुपिलुमॅब हे अलिकडेच परवाना मिळालेलं व IL-4 आणि IL-13 रिसेप्टर्सला प्रतिबंधित करणारं औषध लिहून दिलं जाऊ शकतं. EP262, abrocitinib आणि upadacitinib सारखी इतर औषधं देखील Atopic dermatitis (AD) उपचारांसाठीच्या चाचण्यांच्या 3 च्या टप्प्यात आहेत. EP262 मास-संबंधित जी-प्रोटीन-कपल्ड रिसेप्टर्स X2 (MRGPRX2) ला रोखतं, तर abrocitinib आणि updacitinib JAK1 नावाच्या रिसेप्टरला प्रतिबंधित करून IL-4 आणि IL-13 मार्गांमध्ये व्यत्यय आणतात.
 
नवीन उपचारांचा खाज सुटण्याच्या इतर परिस्थितींनाही फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, या वर्षी युनिव्हर्सिटी ऑफ मिलर स्कूल ऑफ मेडिसीनमधील फिजिशियन येथील त्वचाविज्ञानाचे प्राध्यापक गिल योसिपोविच यांनी ब्रायन किम आणि इतरांसोबत ‘पीएन’ वर उपचार करण्यासाठी डुपिलुमॅबच्या वापरासाठी 3 -या टप्प्यातील दोन चाचण्या पूर्ण करण्यासाठी काम केलं, ज्या कारणामुळे शायान बुलेट ही तरूणी चिंताग्रस्त आहेत.
24 आठवड्यांनंतर, डुपिलुमॅब प्राप्त करणार्‍या 60% सहभागींनी प्लासिबो प्राप्त केलेल्या 18.4% सहभागींच्या तुलनेत त्यांच्या खाजेत लक्षणीय आणि आयुष्य बदलून टाकणारी घट झालेली पाहायला मिळाली. परिणामी, ‘एफडीए’ने आता ‘पीएन’ रूग्णांवर उपचार करण्यासाठी डुपिलुमॅबला मान्यता दिली आहे.
 
“पीएन ही त्वचाशास्त्रज्ञांच्या निदर्शनास सर्वाधिक वेळा येणारी खाज सुटणारी परिस्थिती आहे आणि आजपर्यंत त्यावर कोणतेही चांगले उपचार उपलब्ध नव्हते, त्यामुळे रुग्णांना खूप त्रास व्हायचा," असं योसिपोविच म्हणतात.
 
"आमच्या रूग्णांसाठी हा एक आनंदी काळ आहे. आता यातून आपली कायमची सुटका होईल, असं त्यांना वाटतं. माझ्याकडे असे अनेक रूग्ण होते जे खूप निराश आणि त्यांची अवस्था खूप दयनीय झालेली. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'औषधांनी माझे प्राण वाचवले'."
 
दरम्यान, इकान स्कूल ऑफ मेडिसिन येथील ब्रायन किम यांच्या नवीन प्रयोगशाळेत नॉटॅल्जिया पॅरेस्थेटिकावर संशोधन सुरू आहे - मज्जातंतूचा एक अशाप्रकारचा विकार ज्यामध्ये पाठीच्या वरच्या भागात सतत खाज सुटणे.
 
हेमोडायलिसिसवर उपचार घेणा-या प्रौढांमध्ये दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराशी संबंधित मध्यम-ते-तीव्र खाज सुटण्याच्या उपचारांसाठी ‘एफडीए’द्वारे Difelikefalin ला आधीच मान्यता देण्यात आली आहे. तथापि, 2 -या टप्प्यातील चाचण्यांमध्ये नोटॅल्जिया पॅरेस्थेटिकावर उपचार करण्यासाठी देखील ते माफक प्रमाणात प्रभावी असल्याचं दिसून आलंय.
 
आजवर ज्याची तीव्रतेने कमतरता जाणवत होती त्याबाबत या औषधांनी आशा जागृत केल्या आहेत.
 
"मला माझं अस्तित्व नव्याने जाणवू लागलंय आणि मी माझं आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगू शकेन," असं शायान म्हणाली. योसिपोविच यांच्या चाचणीत सहभागी झालेल्यांमध्ये तिचा समावेश होता.
 
"कधीकधी मला थोडीशी खाज सुटते, पण ती फक्त 10 मिनिटांसाठीच असते, मी आता पूर्वीपेक्षा खूप चांगलं आयुष्य जगतेय,” असंही ती म्हणाली.
 
डुपिलुमॅब सर्व रुग्णांसाठी फायदेशीर नाही, परंतु इतरही काही औषधं तयार होत आहेत.
 
"मला विश्वास आहे की पुढील पाच वर्षांत आम्ही यातील बहुतांश रुग्णांना दिलासा देऊ शकू, त्यामुळे या त्रासाला सामोरं जाणाऱ्या लोकांवर उपचार करणाऱ्या माझ्यासारख्या डॉक्टरांसाठी हा सुवर्णकाळ आहे," असं योसिपोविच म्हणतात.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Health Tips: प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

कोणते योगासन कानांसाठी योग्य आहे जाणून घ्या

Winter Special Recipe : हे दोन सूप नक्की ट्राय करा

इस्ट्रोजेन संतुलित करण्याचे 5 प्रभावी मार्ग जाणून घ्या

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

पुढील लेख