Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डेंग्यू ताप एक विषाणूजन्य रोग

Dengue fever is a viral disease Health Article Health Article In Marathi Manthan In Marathi Webdunia Marathi
Webdunia
मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (12:17 IST)
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप याला हाड ताप देखील म्हणतात.हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो.एडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे पसरतो. हा एक तीव्र,फ्लूसारखा आजार आहे.संक्रमित डासाच्या चावल्यानंतर 5-6 दिवसानंतर माणसाला हा आजार होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, या मुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
 
भारतात  1963 साली कलकत्त्यामध्ये डेंग्यू तापाची प्रथम मोठी साथ आली. त्यानंतर इतर महानगरे, शहरे व ग्रामीण भागांमध्ये देखील डेंग्यूची साथ पसरली आणि त्या भागात डेंग्यूचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
 
 डेंग्यू तापाची लक्षणे काय आहे जाणून घेऊ या 
 
1डेंग्यू ताप
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप येतो.डोके आणि डोळे दुखतात,अंगदुखणे,अशक्तपणा,अंगावर लाल रंगाचे चट्टे येतात.अंगदुखी तीव्र स्वरूपात होऊ शकते म्हणून याला हाडमोड ताप असेही म्हणतात​.
 
लक्षणे -
अचानक ताप येणं.
डोक्याच्या पुढील भागात तीव्र वेदना होणं. 
डोळ्यांच्या मागील भागात डोळ्यांच्या हालचाली मुळे तीव्र वेदना होणे.
चव आणि भूक नाहीशी होणे.
छातीवर आणि अंगावर पुरळ येणे.
मळमळणे आणि उलट्या होणे.
त्वचेवर व्रण येणे.
 
2 डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ)
 
हाय एक गंभीर प्रकारचा आजार आहे.या आजारात तापा बरोबरच रक्तस्त्राव देखील होत.या व्यतिरिक्त चट्टे उठतात,हिरड्यांमधून रक्तस्त्राव होते,प्लेटलेट्सची कमतरता होते,अंतर्गत रक्तस्त्राव ,छातीत आणि पोटात पाणी जमा होणं,या सारखे लक्षण होऊ शकतात.इतर  लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.
 
तीव्र, सतत पोटदुखी
त्वचा फिकट रंगाची होते, अंग थंड पडत, किंवा चिकट होते.
नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे
रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे
झोप येणे आणि अस्वस्थता जाणवणे.
तोंडाला कोरड पडून वारंवार तहान लागणे.
नाडी जलद चालते
श्वास घेताना त्रास होतो.
 
3 डेंग्यू अतिगंभीर आजार
हा आजार काही टक्के लोकांमध्येच आढळून येतो.ही अवस्था गंभीर असते.या मध्ये रुग्णाला अस्वस्थता जाणवते, रक्तदाब कमी होतो,नाडी मंदावते आणि रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो.
 
लक्षण -
ताप येणं,डोकेदुखी,पुरळ होणं,स्नायूंमध्ये वेदना होणं,मळमळ होणं,उलट्या होणं,रक्तस्त्राव होणं सारखे लक्षण आढळतात.या मुळे रुग्ण दगावू देखील शकतो.
डेंग्यू हा आजार मादी डास(एडिस इजिप्ती)च्या चावल्यामुळे होतो.हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही.हा आजार एकाद्या संक्रमित व्यक्तीला चावल्याने होतो.नंतर हा डास एखाद्या निरोगी व्यक्तीला चावल्यावर संक्रमित करू शकतो.
 
उपचार-
आराम करावा,जास्त दिवस ताप असल्यावर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.,पाणी भरपूर प्यावे,पपई खावे.रक्तस्त्राव असल्यास रुग्णाला त्वरित रुग्णालयात भरती करावे.
या आजारावर उपचार म्हणजे डासांवर आला घालणे आहे.असं करून आपण हा आजार पसरण्यापासून रोखू शकतो.घराच्या भोवती पाणी साचू देऊ नका,साठवलेले पाणी वेळीच रिकामे करा.जेणेकरून त्यात डास होणार नाही.डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Fasting Special Recipe साबुदाणा रबडी

April Fools' Day राजा- राणीची कहाणी यापासून एप्रिल फूल साजरा करण्याची परंपरा सुरू झाली ! याला मूर्खांचा दिवस का म्हणतात?

Summer Special Instant Recipe खरबूजाचे शिकरण

उन्हाळ्यात डिंकाचे सेवन केल्याचे आरोग्याला 5 फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत

Online Kitchen ऑनलाइन किचन बिझनेस सुरु कसे कराल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments