Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दारु किती प्रमाणात प्यावी?

Facts about moderate drinking
, शनिवार, 4 मार्च 2023 (12:08 IST)
लग्न, पार्टी, वा सेलिब्रेशन असो बरेच लोक दारु पिऊन एजांय करतात. पण अनेकदा याची सवय लागते. सोशल लाइफचा भाग झालेली ही सवय पुरुषांपर्यंत मर्यादित नसून महिला देखील याचे सेवन करुन खूप एजांय करतात. पण आपण कधी हा विचार केला आहे का एक किंवा दोन पॅग याहून अधिक दारुचे सेवन केल्यास हे आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरु शकतं. दारू प्रेमींसाठी हा लेख फायदेशीर ठरू शकतो की दारू किती प्यावी?
 
काही अभ्यासांनी असे सूचित केले आहे की कमी प्रमाणात वाइन, विशेषत: रेड वाईन पिण्याचे आरोग्यासाठी फायदे आहेत, तरी हे विवादास्पद आहेत.
 
1 दिवसात किती दारु पिणे योग्य ठरेल
जर तुम्ही दारू पिण्याचे शौकीन असाल आणि तुमच्या आरोग्याचाही विचार करत असाल तर तुम्ही एका मर्यादेत दारू प्यावी. ज्यामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या काही गोष्टी लक्षात घेतल्यास दारूचे शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करता येतात. वयस्करांनी मद्यविकाराचा धोका टाळण्यासाठी एका आठवड्यात 10 पॅग पण दिवसाला 4 पॅग यापेक्षा पेक्षा जास्त दारुचे सेवन करु नये. मानक पेय आकार 30 ml हार्ड अल्कोहोल जसे की व्हिस्की, जिन इ. आणि 150 ml वाइन (रेड आणि व्हाईट) आणि 330 ml बिअर.
 
एका ड्रिंकमध्ये सुमारे 10 ग्रॅम इथेनॉल (अल्कोहोल) असते. शरीर एका तासात या प्रमाणात प्रक्रिया करू शकते. म्हणूनच एखाद्याने नेहमी निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त पिऊ नये.
 
दारुचे अती सेवन धोकादायक
ज्या दिवसापासून आपण दारुचे सेवन सुरु करता त्या दिवसापासून त्याचे दुष्प्रभाव शरीरावर हावी होण्यास सुरु होतात. होय, दारु पिणाऱ्या लोकांच्या शरीरावर काही परिणाम लगेच दिसून येतात, तर काही दीर्घकाळानंतर दिसून येतात. वाईनची बाटली उघडून ती रात्रभर पिण्याची सवय वाईनप्रेमींच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. म्हणूनच आपल्या मर्यादा सेट करणे फार महत्वाचे आहे. तुमचे आरोग्य बिघडवण्यासोबतच दारूचे अतिसेवन तुमची प्रतिमा बिघडवण्याचेही काम करते. अति दारू पिल्याने घरांमध्ये मारामारी, रस्ते अपघात यांसारख्या घटनाही घडतात.
 
पुरुष आणि महिलांचे दारुचे पिण्याचे प्रमाण वेगवेगळे
पुरुष आणि स्त्रिया यांचे मद्यपान करण्याचे प्रमाण वेगवेगळे असतात कारण दोघांवर अल्कोहोलचा वेगळा परिणाम होतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना नशा होण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांच्या शरीरात जास्त पाणी असते. 
webdunia
किती दारू प्यावी?
द लॅन्सेट मध्ये प्रकाशित नवीन विश्लेषणप्रमाणे तर 15 ते 39 वयोगटातील पुरुषांसाठी अल्कोहोलचे सेवन सर्वात धोकादायक आहे. कोणत्या वयोगटातील लोकांसाठी किती प्रमाणात अल्कोहोल घेणे योग्य असेल याचाही अंदाज संशोधनात लावण्यात आला आहे. 15 ते 39 वयोगटासाठी दररोज 0.136 मानक पेय. महिलांसाठी हे मानक दररोज 0.273 पेय आहे. 40 ते 64 वयोगटातील निरोगी लोकांसाठी सुरक्षित अल्कोहोल सेवन पातळी दररोज सुमारे हाफ स्टँडर्ड ड्रिंक्स (पुरुषांसाठी 0.527 आणि महिलांसाठी 0.562) ते दररोज सुमारे दोन स्टँडर्ड ड्रिंक्स (पुरुषांसाठी 1.69 आणि महिलांसाठी 1.82) पर्यंत शिफारस केली जाते.
 
एका अजून तज्ञांप्रमाणे कोणत्याही वयोगटातील निरोगी महिला आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसाठी दिवसातून एक पेय मध्यम मानले जाते आणि 65 वर्षांखालील पुरुषांसाठी दिवसातून दोन पेये.
 
जास्त प्रमाण किती?
तीनपेक्षा जास्त पेये म्हणजे 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुष आणि स्त्रिया यांच्यासाठी जास्त प्रमाणात (किंवा आठवड्यातून सात पेक्षा जास्त पेये) आणि 65 वर्षांखालील पुरुषांसाठी चारपेक्षा जास्त पेये (किंवा आठवड्यातून 14 पेक्षा जास्त पेये) अशी व्याख्या केली जाते.
 
दारु पिण्याची सवय घातक
जर स्त्री दोन तासांच्या आत चार किंवा त्याहून अधिक पेये आणि पुरुष दोन तासांत पाच किंवा त्याहून अधिक पेये प्यालीत, तर याला जास्त प्रमाणात मद्यपान करणे यात समाविष्ट केलं जातं याने गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढवू शकतो, जसे की-
स्तनाचा कर्करोग 
तोंड, घसा आणि अन्ननलिकेचा कर्करोग
स्वादुपिंडाचा दाह
आधीच अस्तित्वात असलेल्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगामुळे अचानक मृत्यू
अल्कोहोलिक मायोपॅथी, किंवा हृदयाच्या स्नायूंना नुकसान, ज्यामुळे हृदय अपयशी ठरते
स्ट्रोक
उच्च रक्तदाब
यकृत रोग
भ्रूणच्या मेंदूचे नुकसान
webdunia
या लोकांनी अजिबात दारु पिऊ नये
मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की काही लोकांनी दारू पिऊ नये, जसे की- 
 
गर्भवती महिला किंवा गर्भवती होण्याची शक्यता असल्यास.
जर ते 21 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील.
जर त्यांना काही वैद्यकीय परिस्थिती असेल किंवा काही औषधे घेत असतील जी अल्कोहोलशी मॅच करु शकत नसतील.
जर ते अल्कोहोल वापराच्या विकारातून बरे होत असतील किंवा ते पिण्याचे प्रमाण नियंत्रित करू शकत नसतील. 
स्तनपान करणार्‍या महिलांसाठी अल्कोहोल न पिणे हा सर्वात सुरक्षित पर्याय असल्याचेही मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
अल्कोहोलपासून पूर्णपणे मुक्त हा सर्वोत्तम पर्याय आहे
 
या माहितीद्वारे कोणाला दारू पिण्यास भाग पाडले जात नाहीये. विविध संशोधन आणि अभ्यासाच्या आधारे ही माहिती देण्यात येत आहे. वेबदुनिया याची पृष्टी करत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

10 मिनिटांचा व्यायाम केला तरी टळू शकतो अकाली मृत्यूचा धोका- संशोधन