Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Monkey B Virus : हा विषाणू काय आहे? त्याची लक्षणं कोणती आणि उपाय काय?

Webdunia
मंगळवार, 20 जुलै 2021 (12:35 IST)
चीनच्या बीजिंग शहरात 'मंकी बी व्हायरस'चा संसर्ग झाल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 'ग्लोबल टाईम्स'नं या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ग्लोबलस टाईम्सनुसार, बीजिंगमधील एका पशुवैद्यकीय डॉक्टरांचा मंकी व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे, तसंच त्यांच्या संपर्कात आलेले सगळे लोक सुरक्षित असल्याचंही या बातमीत सांगण्यात आलं आहे. हे 53 वर्षीय डॉक्टर एका संस्थेत नॉन-ह्यूमन प्रायमेट्सवर संशोधन करत होते.
 
मार्च महिन्यात त्यांनी दोन मृत्यू झालेल्या माकडांवर संशोधन केलं आणि त्याच्या एका महिन्यानंतर त्यांना मळमळ आणि उल्टीचा त्रास व्हायला लागला. गेल्या शनिवारी (17 जुलै) चायना सीडीसी वीकलीने याविषयी माहिती दिली. यानुसार, या डॉक्टरांनी अनेक दवाखान्यांमध्ये उपचार केले. पण 27 मे रोजी त्यांचं निधन झालं.
 
याआधी या व्हायरसशी संबंधित कोणतंही प्रकरण समोर आलं नव्हतं. मंकी बी व्हायरस आणि त्यांच्यामुळे झालेल्या मृत्यूचं हे पहिलंच प्रकरण आहे. संशोधकांनी एप्रिल महिन्यात डॉक्टरांच्या मज्जातंतूचं सॅम्पल घेतलं होतं आणि त्यात मंकी व्हायरस आढळल्याचं सांगण्यात आलं. पण, यात दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेल्या कुणालाही या व्हायरसच्या संसर्गाचे लक्षणं दिसून आलेले नाहीत.
 
मंकी व्हायरसची 1932 मध्ये जगाला ओळख झाली. हा व्हायरस माकडांशी आलेला प्रत्यक्षातला संपर्क तसंच शारीरिक स्त्रावांच्या संपर्कातूनही पसरतो. मंकी बी व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा दर 70 ते 80 टक्के आहे. त्यामुळे मंकी बी व्हायरस धोक्याचा ठरू शकतो आणि याविषयी त्वरित खबरदारीचे उपाय अवलंबवणं आवश्यक आहे.
 
मंकी बी व्हायरस काय आहे?
मंकी बी व्हायरस किंवा हर्पीस व्हायरस हा वयस्कर मॅकॉक माकडांपासून (शेपूट असलेले माकड) पसरतो. मॅकॉक माकडांची प्रजात ऱ्हिसस मॅकॉक, सिनोमोलगस माकड तसंच लांब शेपटाच्या माकडांपासून पसरतो. हा व्हायरस माणसांमध्ये दुर्मीळ आढळतो. पण एखाद्याला त्याची लागण झाल्यास यामुळे मज्जातंतूशी संबंधित रोग, तसंच डोक आणि पाठीच्या हाड सुजतं.
 
हा व्हायरस कसा पसरतो?
मॅकॉक माकडांनी चावा घेतला किंवा त्वचेला ओरबाडलं, तर माणसांमध्ये हा व्हायरस पसरतो, तसंच संक्रमित माकडाची लाळ आणि मल-मूत्रापासूनही याची लागण होऊ शकते. याशिवाय संक्रमित इंजेक्शनमुळेही तो माणसाच्या शरीरात पोहोचू शकतो. वस्तूंच्या पृष्ठभागावर हा व्हायरस अनेक तास जिवंत राहू शकतो. बोस्टन पब्लिक हेल्थ कमिशनच्या रिपोर्टनुसार, जे लोक प्रयोगशाळेत काम करतात, जनावरांचे डॉक्टर आहेत किंवा या माकडांशी संबंधित उपचाराचं काम करतात, त्यांना या व्हायरसची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
 
 
या व्हायरसची लक्षणं काय आहेत?
हा व्हायरस माणसाच्या शरीराल प्रवेश केल्यास एका महिन्याच्या आत त्याचे लक्षण दिसायला लागतात. अनेकदा हे लक्षण 3 ते 7 दिवसांमध्येही दिसू शकतात. हे लक्षण किती तेजीनं पसरतात, हे संसंर्गाच्या कणांवर अवलंबून असतं. पण, सगळ्याच प्रकरणात लक्षणं एकसारखी असतात, असं इथं आवश्यक नाही.
 
काही साधारण लक्षणं
संसर्गाच्या ठिकाणी छिद्र पडणं
जखमेजवळ आग होणं, खाज येणं
फ्लूसारखा त्रास होणं
ताप किंवा थंडी भरणं
24 तासांहून अधिक वेळ डोकेदुखी
थकवा येणं
मांसपेशीमध्ये आकुंचन पावणं
श्वास घेण्यात अडचण निर्माण होणं
लक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून 3 आठवड्यापर्यंत श्वास घेण्यात अडचण येऊ शकते. संसर्ग अधिक असेल तर मृत्यूही होऊ शकतो.
 
उपचार काय?
बोस्टन पब्लिक हेल्थ कमिशनचा रिपोर्ट सांगतो, की या व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यात आले नाही, तर जवळपास 70 टक्के प्रकरणांत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. अशात तुम्हाला एखाद्या माकडानं चावा घेतल्यास किंवा ओरबाडल्यास त्यामुळेही संसर्ग होऊ शकतो. अशास्थितीत ताबडतोब प्राथमिक उपचार सुरू करायला हवेत. जखमेला साबण आणि पाण्यानं चांगल्याप्रकारे स्वच्छ करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कमिशनच्या रिपोर्टनुसार, मंकी बी व्हायरसवरील उपचारासाठी अँटिव्हायरल औषधं उपलब्ध आहेत, पण कोणतीही लस मात्र उपलब्ध नाहीये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

पुढील लेख