Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pregnancy and Hepatitis गर्भावस्था आणि हेपेटाइटिस- आपल्या बाळाचा हेपेटाइटिसच्या समस्यापासून असा करा बचाव

Webdunia
मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (09:32 IST)
Pregnancy and Hepatitis हेपेटाइटिस यकृताच्या संबंधित एक विकार असून, तो हेपेटाइटिस ए, बी, सी, डी आणि ई नामक विषाणूमुळे होतो. जर तुम्ही गर्भवती आहात, आणि तुम्हाला हेपेटाइटिसचे निदान झाले असल्यास, तुमच्या होणाऱ्या बाळाला त्याचे संक्रमण होऊ शकते. असे असले तरी, काही अपवाद वगळल्यास हेपेटाइटिसमुळे गरोदर महिलेवर किंवा तिच्या पोटातील बाळावर प्रभाव पडण्याची शक्यता कमी असते. पण तरीही हेपेटाइटिस समस्यांकडे कानाडोळा करून चालणार नाही.
हेपेटाइटिस बी चा लहान मुलांवर कसा प्रभाव पडू शकतो?
• हेपेटाइटिस बी यकृताच्या संक्रमणाचा सर्वाधिक आढळून येणारा असा गंभीर प्रकार आहे. कारण ही समस्या उद्भवेपर्यंत बहुतांश लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचे लक्षणे आढळून येत नाहीत. त्यामुळे या स्थितिला 'मूक महामारी' म्हणून ओळखले जाते.
•त्यामुळे, बाधित व्यक्ति त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांमध्ये ही समस्या पसरवू शकतो.
• गर्भावस्थेच्या काळात गरोदर महिलांसाठी हेपेटाइटिस बी हानिकारक असू शकतो, कारण हे संक्रमण आईकडून होणाऱ्या बाळाला संक्रमित होण्याची शक्यता अधिक असते. खास करून प्रसूतीदरम्यान हेपेटाइटिस बी चे संक्रमण बाळाला होण्याचा संभव असतो.
•अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, हेपेटाइटिस बी बाधित 10 मधील एकूण 9 महिला आपल्या बाळाला ही समस्या संक्रमित करते.
• हेपेटाइटिस बी विषाणूच्या संक्रमणामुळे बालकांमध्ये दीर्घकालीन, आणि गंभीर समस्या निर्माण होण्याची 90% संभावना असते. यावर वेळीच उपचार केला नाही, तर बालकांना यकृतासंबंधित गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
हेपेटाइटिस बी चे परीक्षण
प्रत्येक गर्भवती महिलेला प्रसूतीपूर्व काळामध्ये हेपेटाइटिस बीची रक्त चाचणी करणे गरजेचे आहे. जर हेपेटाइटिस बीचे निदान झाले, तर डॉक्टर आईकडून बाळाला संक्रमण होऊ न देण्यासाठी हेपेटाइटिस बी चे इंजेक्शन सुरू करतात.
हेपेटाइटिस बी चा विषाणू हा अतिशय संसर्गजन्य आहे, त्यामुळे संक्रमित व्यक्तीच्या शुक्राणू, रक्त किंवा शरीरातील अन्य द्रव पदार्थाच्या संपर्कातून तो इतरांमध्ये पसरू शकतो. त्यामुळे वडील आणि इतर कुटुंबातील सदस्यांनीही हिपॅटायटीस बी ची चाचणी करून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
नवजात बाळाचे हेपेटाइटिस बी समस्येपासून बचाव कसा करावा?
• जन्माच्या 12 तासांच्या आत, तुमच्या बाळाला हिपॅटायटीस बी लसीचा पहिला डोस आणि HBIG (हिपॅटायटीस बी इम्यून ग्लोब्युलिन) चा शॉट मिळाला पाहिजे. HBIG शॉट तुमच्या बाळाच्या जन्मानंतर लगेचच विषाणूंशी लढण्याची क्षमता वाढवतो.
• ज्या नवजात शिशूच्या आईला हिपॅटायटीस B चे निदान झाले आहे, अशा बाळांना हा शॉट देणे गरजेचे असते.
जेव्हा लस आणि एचबीआयजी डोस एकत्र केला जातो, तेव्हा विषाणू नवजात बाळामध्ये संक्रमित होण्याची जाण्याची शक्यता कमी होते.
• संक्रमण टाळण्यासाठी, तुमच्या मुलाला सर्व हिपॅटायटीस बी लसी मिळणे आवश्यक आहे. तुमच्या मुलाचे वजन आणि लसीच्या प्रकारानुसार, तीन ते चार डोस काही महिन्यांच्या फरकाने दिली जातात.
• तुमच्या मुलाला पहिली लस जन्माच्या वेळी, दुसरी लस एक किंवा दोन महिन्यांत आणि शेवटची सहा महिन्यांत मिळेल. तुम्ही तुमच्या बाळाला शॉट्ससाठी परत केव्हा आणावे याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
• तुमच्या मुलाने सर्व शॉट्स घेतल्यावर, बालतज्ञांकडे आरोग्य तपासणीसाठी घेऊन जा. तुमचे मूल हिपॅटायटीस बीपासून सुरक्षित आहे की नाही हे रक्त परिक्षणामार्फत कळून येईल.
• सहसा; शॉट पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांनी रक्त तपासणी केली जाते. रक्त तपासणी करण्यापूर्वी, बाळ नऊ महिन्यांचे असणे आवश्यक आहे.
लसीकरणानंतर स्तनपान
स्तनपानामुळे तुमच्या बाळाला विषाणूचा संसर्ग होत नाही. जर तुमच्या बाळाला हिपॅटायटीस बी लस किंवा एचबीआयजीचा पहिला शॉट जन्माच्या 12 तासांच्या आत मिळाला असेल तर स्तनपानावर कोणतेही निर्बंध नाहीत.
जर तुम्हाला तुमच्या स्तनांमध्ये उघडे फोड येत असतील किंवा स्तनाग्र फुटले असतील तर तुम्ही स्तनपान करावे की नाही हे तुमच्या डॉक्टरांना विचारा.
या गोष्टीची देखील काळजी घ्या
तुमच्या यकृताच्या स्थितीचे परीक्षण करण्यासाठी आणि उपचारांची आवश्यकता निश्चित करण्यासाठी तुम्हाला आणखी काही चाचण्यांची आवश्यकता असू शकते. अँटीव्हायरल औषधे हिपॅटायटीस बी वर उपचार करण्यास मदत करू शकतात, तरीही गर्भधारणेदरम्यान कोणतीही ओटीसी औषधे, जीवनसत्त्वे किंवा पूरक आहार घेण्याआधी
तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही योग्य! कारण काही औषधे गर्भाला हानी पोहोचवू शकतात.
हिपॅटायटीस सी चा बाळावर कसा परिणाम होतो?
• रक्ताच्या किंवा संक्रमित सुयांच्या संपर्कात येऊन किंवा दूषित अन्न खाल्ल्याने तुम्हाला या विषाणूची लागण होऊ शकते. बहुतेक लोकांना ते शेअरिंग सुया किंवा इतर इंजेक्शन उपकरणांद्वारे याचे संक्रमण होते.
• हिपॅटायटीस सी असलेल्या एकूण 20 मातांपैकी एका मातेच्या नवजात बालकाला हा विषाणू होतो. हे गर्भाशयात, प्रसूती दरम्यान किंवा जन्मानंतर होऊ शकते.
• प्रसूतीपूर्वी या आजाराचा बाळावर सहसा परिणाम होत नाही. आईच्या दुधाद्वारे बाळाला हिपॅटायटीस सी होत नाही, परंतु जर तुमच्या स्तनाग्रांना तडे गेले किंवा रक्तस्त्राव होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण संसर्ग रक्ताद्वारे पसरतो.
हिपॅटायटीस सी साठी चाचणी आणि उपचार
बहुतेक डॉक्टर 18 महिन्यांनंतर बाळाला हिपॅटायटीसची चाचणी घेण्याची शिफारस करतात कारण नवजात बाळाला त्याच्या आईकडून हिपॅटायटीस विषाणूचा संभव असून शकतो.
अशावेळी काय करावे?
गर्भधारणेदरम्यान, डॉक्टर हेपेटायटीससाठी नियमित तपासणी करत नाहीत. पण तुम्हाला जर कोणती शंका असेल तर डॉक्टरांकडून त्याचे निवारण करा. जसे कि, हिपॅटायटीसची औषधे वापरणे किंवा ही हिपॅटायटीस बाधित व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवणे.
हिपॅटायटीसची लक्षणे दिसून येत नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःला कितीही तंदुरुस्त समजत असला, तरी त्याची तपासणी करून घ्या. हिपॅटायटीस पाचपैकी चार लोकांना प्रभावित करते, तरीही चार जणांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
तुम्ही गरोदर असताना तुमच्या हिपॅटायटीसवर डॉक्टर उपचार करू शकत नाहीत कारण औषधे जन्मजात दोष निर्माण करू शकतात.
गर्भधारणेदरम्यान हिपॅटायटीसचा सामना करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते पूर्णपणे रोखणे. सर्व प्रकारचे हिपॅटायटीस टाळता येत नसले तरी हिपॅटायटीस ए आणि बी साठी सुरक्षित आणि प्रभावी लसीकरण आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसेच हिपॅटायटीस सी साठी देखील एक प्रभावी उपचार सध्या अस्तित्वात आहे.जे गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी, आई आणि बाळ दोघांनाही या संक्रमाणापासून वाचवू शकतो.
काही प्रकरणांमध्ये, अनेक उपचार पर्याय उपलब्ध असून, योग्य निरीक्षण आणि सावधानी बाळगल्यास तुम्ही स्वतः हे संक्रमण रोखू शकता. तुमच्या डॉक्टरांना तुमच्या किंवा तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी असलेल्या कोणत्याही संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवण्यास त्यामुळे मदत मिळू शकते. 

-Dr Hrishikesh Pai

संबंधित माहिती

ठाण्यात इमारतीला धडकून ट्रक पालटून अपघात, एक ठार, 6 जखमी

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल डिझेलच्या दरात बदल? आजचे दर जाणून घ्या

धक्कादायक! पुण्यात सावत्र बापाकडून 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपीला अटक

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार उलटून भीषण अपघातात 4 जण जखमी

SCO vs AUS : ऑस्ट्रेलियाचा स्कॉटलंडवर पाच गडी राखून विजय, स्कॉटलंड स्पर्धेतून बाहेर

किशोरवयीन मुलींनी मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

एकच प्रकारची चटणी खाऊन कंटाळा आला ना, खा ही चविष्ट चटणी लिहून घ्या रेसिपी

लघवीचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? त्याबद्दल चिंता कधी करायला हवी? वाचा

स्किन केयर रुटीनमध्ये सहभागी करा भोपळ्याचा फेसपॅक, चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल

विश्‍व वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिवस

पुढील लेख