Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सायलेंट किलर 'हायपरटेन्शन' काय असतं? त्याला कसं रोखावं?

Webdunia
बुधवार, 17 मे 2023 (07:07 IST)
सर्वाधिक कारणांनी मृत्यू होणाऱ्या व्याधींमध्ये हायपरटेन्शन एक महत्त्वाचं कारण आहे.
वैद्यकीय विश्वात हायपरटेन्शला सायलेंट किलर म्हटलं जातं. याचं कारण उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना याची लक्षणं दिसत नाहीत. पण अचानकच हृदयविकाराचा झटका, पक्षाघात असा त्रास होतो. यामुळे मृत्यूही ओढवतो. त्यामुळे हायपरटेन्शनला सायलेंट किलर म्हटलं जातं.
 
'इंडियन इनिशिएटिव्ह ऑफ हायपरटेन्शन कंट्रोल' यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 कोटी युवा आणि मध्यमवर्गीय नागरिकांना हायपरटेन्शनचा त्रास संभवतो. केवळ 2 कोटी लोकांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचंही या संस्थेने म्हटलं आहे.
 
जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून स्थापना झालेल्या या उपक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे 2025 पर्यंत संसर्गजन्य आजारांनी होणाऱ्या मृत्यूंमध्ये 25 टक्क्यांनी कमी करणं.
 
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार हे प्रमाण सध्या 63 टक्के आहे.
 
17 मे रोजी वर्ल्ड हायपरटेन्शन दिन साजरा केला जातो. उच्च रक्तदाब आणि हायपरटेन्शन नियंत्रणात ठेवण्यादृष्टीने या दिवशी जनजागृती केली जाते. हायपरटेन्शन नेमकं काय असतं यासंदर्भात डॉ. जोसेफ यांनी सांगितलं.
 
हायपरटेन्शन म्हणजे काय?
जेव्हा हृदयाचे ठोके पडतात, रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब रक्तदाब म्हणून ओळखला जातो. रक्तदाब सुरक्षित पातळीच्या वर जातो, त्याला हाय ब्लडप्रेशर म्हणजेच वैद्यकीत भाषेत हायपरटेन्शन म्हटलं जातं.
 
सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर या दोन्हींची नोंद होत असताना स्पायग्मोमॅनोमीटर हे यंत्र पाऱ्यामधला चढउतार दाखवत असतं.
 
सिस्टॉलिक प्रेशर- हृदय धडधडतं तेव्हा सर्वाधिक रक्तदाब
डायसटोलिक प्रेशर- हृदय धडधडत असताना कमीत कमी रक्तदाब
रक्तदाब 90च्यावर जातो तेव्हा उच्च रक्तदाब म्हटलं जातं.
 
हायपरटेन्शन कशामुळे होतं?
सोप्या शब्दात सांगायचं तर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि अरुंद वाहिनीतून रक्त हृदयाकडे जातं. त्यावेळी रक्तदाब उंचावतो, त्याला हाय ब्लडप्रेशर म्हटलं जातं.
 
धूम्रपान, साखरेची पातळी वाढणं, मिठाचं अतिसेवन यामुळे उच्च रक्तदाब होतो असं डॉक्टर सांगतात.
 
* वाढत्या वयानुसार रक्तवाहिन्या आक्रसतात आणि रक्तदाब वाढतो.
* काही लोकांना रक्तदाबाचा त्रास अनुवंशिक पद्धतीचा असतो.
* चरबीयुक्त अन्नपदार्थ आणि बैठ्या स्वरुपाचं काम केल्याने रक्तदाब वाढतो.
 
हायपरटेन्शनची लक्षणं काय?
* प्रचंड डोके दुखणं
* श्वास घ्यायला त्रास होणं
* अनियमित हृदयाचे ठोके
* छातीत धडधड
* संभ्रमावस्था
* दृष्टिदोष
* नाकातून रक्त
* थकवा
* छातीत दुखणं
* मानेवर घाम येणं
 
हायपरटेन्शन आहे हे कसं ओळखायचं?
हायपरटेन्शन हे सायलेंट किलर आहे. 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माणसांनी रक्तदाब तपासणे आवश्यक आहे. ही चाचणी अतिशय सोपी असते. बसलेल्या स्थितीत असताना रक्तदाब तपासला जातो. रक्तदाब जास्त असेल तर दोनदा चेक करावं. उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आवश्यक चाचण्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार करुन घ्याव्यात.
 
हायपरटेन्शनवर उपचार काय आहेत?
 
वैद्यकीय चाचण्यांच्या माध्यमातून हायपरटेन्शन आहे हे समजू शकतं. डॉक्टर औषधं लिहून देतात. विकसनशील देशांमध्ये हायपरटेन्शनचं प्रमाण जास्त असतं असं डॉक्टरांनी सांगितलं.
 
हायपरटेन्शन नियंत्रणात ठेवण्यासाठीचे उपाय
* शारीरिक व्यायाम आणि चालणं आठवड्यातून तीन ते चार दिवस करावं
* वजन वाढू नये यासाठी उपाय करावेत
* ताणतणाव कमी करावा
* पोषक आहार घ्यावा
* आहारात मीठाचं प्रमाण कमी करावं
* वयाची 25 वर्ष पूर्ण केल्यानंतर दर 6 महिन्याला रक्तदाब पाहावा.
 



Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments