Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आला उन्हाळा, तब्बेत सांभाळा!

Webdunia
WD
उन्हाळा येऊन दाखल झाला आहे. तापमानातही परिवर्तन व्हायला सुरुवात झाली आहे. तप्त दुपार आणि गरम हवा शरीरावरही परिणाम करतेच. त्यामुळे उन्हाळा आल्यानंतर तुमच्या जेवणाच्या दिनचर्येतही बदल गरजेचा आहे.

उन्हाळ्यात अधिक तेलकट खाणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे संतुलित आहाराची आवश्यकता असते. दिवसाची सुरुवात एक लीटर पाणी किंवा लिंबू पाण्याने करा. दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिणेही आवश्यक असते.

निसर्गाने प्रत्येक ऋतू भिन्न रितीने बनविला आहे. पण त्यासोबतच प्रत्येक ऋतूचे फायदेही देऊ केले आहेत. थंडीत शरीरात उष्णता उत्पन्न करणार्‍या पालेभाज्या, फळे तर उन्हाळ्यात पचनासाठी हलके-फुलके खाद्यपदार्थ, फळे आणि पेय पदार्थ निसर्गापासून आपल्याला मिळतात. त्यात टरबूज, काकडी, खरबूज, द्राक्षे, लिंबू, स्ट्रॉबेरी, सफरचंद, आंबे ही फळे आहेत.

या सर्वांमुळे फक्त शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते असे नाही तर शरीराला थंड बनवून पोषणही देतात. त्यातून मिळणारे व्हिटॅमिन्स् आणि खनिजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात आणि त्वचेलाही सुंदर बनवितात. यांचा वापर कच्चे सलाड किंवा ज्यूसच्या रूपात किंवा काही शिजवून (काकडी, कोबी) खाऊ शकतो.

त्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात रॉक सॉल्ट (खनिज मीठ), जिरे, शोप, वेलची हे मसाले तसेच दही, कैरीचे पन्हे, पुदिना, बेलच्या फळाचा रस, सरबते, चटणी, जलजीरा या वस्तूही शरीरासाठी अनुकूल असतात.

त्यासोबतच आपण खालील गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो...

* सकाळी-सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामासाठी नक्की वेळ काढा.
* घरातून बाहेर निघताना सनक्रीन लोशन लावा. स्कार्फ, समर कोट घालूनच बाहेर जा. पाणी जास्त प्रमाणात प्या.
* डोळ्यांना सूर्याच्या तेज किरणांपासून बचावासाठी चांगल्या क्वालिटीचे सन ग्लासेस वापरा.
* बाहेर पडताना पाण्याची बॉटल शक्यतोवर सोबत असू द्या. त्यात ग्लूकोज किंवा लिंबू पाणी मिळवा.
* कॉटनच्या हलक्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य द्या.
* 10 ते 4 वाजेपर्यंतच्या वेळी घरातून किंवा ऑफिसातून बाहेर निघताना विशेष काळजी घ्या.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

थंडीमुळे पाय अखडत असतील तर या योगासनांचा सराव करा

बायकोची मनापासून माफी मागायची? मग पाठवा स्पेशल Sorry Messages In Marathi

चिकन तवा फ्राय रेसिपी

अचानक कोणी प्रपोज केले तर नकार कसा द्यायचा ?

HMPV विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये कशा प्रकारे पसरू शकतो?

Show comments