Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एबी रक्तगट अधिक विसराळू

Webdunia
सोमवार, 27 ऑक्टोबर 2014 (16:16 IST)
वाढत्या वयातील विसराळूपणा आणि विचार करण्याची ताकद कमी होण्यामागे रक्तगट कारणीभूत असतो, असे अमेरिकेतील वरमॉट कॉलेज ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी शोधून काढले आहे. जगभरातील लोकांची विभागणी चार रक्तगटात केली गेली आहे. त्यात पुन्हा एबी हा रक्तगट असणार्‍यांचे प्रमाण केवळ ४ टक्के इतकेच आहे आणि वाढत्या वयात विचार करण्याची शक्ती आणि आठवण कमी होण्याची प्रवृत्ती या रक्तगटाच्या लोकात अधिक प्रमाणात असते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. 
 
या प्रयोगातील प्रमुख संशोधक डॉक्टर मेरी कुशमन यांनी त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने ३0 हजार लोकांची सतत तीन वर्षे निरीक्षणे नोंदवली. हे सर्व लोक ४५ व त्यापुढच्या वयाचे होते. त्यात त्यांना आढळले की ज्यांचा रक्तगट एबी आहे त्यांच्यात विचार करण्याची शक्ती कमी होण्याचे तसेच आठवण न राहण्याचे प्रमाण अन्य रक्तगटाच्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक आहे. अर्थात उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल पातळी, मधुमेह या व्याधीही आठवण कमी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. पण त्यात एबी रक्तगट असल्यास ही शक्यता ६ टक्के अधिक असते. अन्य रक्तगटात ही शक्यता ४ टक्के असते. अर्थात आपली विचारशक्ती आणि आठवण चांगली रहावी यासाठी मेंदू कार्यक्षम आणि स्वस्थ असणे गरजेचे आहे आणि हे काम संतुलित आहार, योग्य व्यायामाच्या सहाय्याने होऊ शकते, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments