Marathi Biodata Maker

तोतरेपणा मेंदूसाठीही घातक

Webdunia
गुरूवार, 18 फेब्रुवारी 2016 (15:06 IST)
काही लोकांच्या बोलण्यात दोष असतो आणि त्यांना योग्य ते शब्द आठवण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातच दोष आहे असे मानले जाते. परंतु अमेरिकेतील मिनेसोटाच्या मेयो क्लिनिक या संस्थेतील तज्ज्ञांनी असे निरीक्षण केले आहे की बोलण्यातला हा दोष परिणामी मेंदूसाठीसुध्दा घातक असतो. एवढेच नव्हे तर सार्‍या शरीरातच या दोषाचे परिणाम दिसू शकतात. तोतरेपणा किंवा बोलण्यातील दोष असणार्‍या व्यक्तीमध्ये पुढे पुढे काही वेगळे दोष दिसायला लागतात. बोलण्याचा वेग कमी होणे किंवा बोलताना शब्द तोंडाबाहेर न पडता त्यास अनुकूल अशी केवळ ओठांची हालचाल होणे असे परिणाम जाणवायला लागतात.
 
हे परिणाम जाणवण्याचे मुख्य कारण म्हणजे बोलण्यातला तोतरेपणा मेंदूत पसरत जाणे हे असते. कोणताही माणूस बोलतो तेव्हा त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात म्हणजेच विशिष्ट प्रकारे हवा बाहेर पडते. एकूण बोलणे ही क्रिया फुफ्फुसाची संबंधित असते. एखादा माणूस बोलतो तेव्हा आधी त्याच्या फुफ्फुसातील स्नायू हलतात आणि नंतर ओठातले स्नायू हलतात. फुफ्फुस ते ओठ या दरम्यानचे 100 स्नायू एका सेकंदाला हलतात आणि त्या सेकंदाला 14 निरनिराळे आवाज 
 
निर्माण होतात. एखादा माणूस तोतरा बोलतो याचा अर्थ त्याच्या या स्नायूंवर परिणाम झालेला असतो आणि या स्नायूंच्या हालचाली मेंदूवर अवलंबून असल्याने त्याचा हा दोष म्हणजे मेंदूचा दोष ठरतो. म्हणूनच सुरूवातीला जी व्यक्ती तोतरी असते तिच्या तोतरेपणावर लवकर इलाज न झाल्यास पुढे पुढे तिच्या मेंदूवरही परिणाम होतो.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

औषधांशिवाय हात-पायांच्या दुखण्यावर मात करा; जाणून घ्या सोपी योगासने

हितोपदेशातील मनोरंजक कथा : वाईटापासून नेहमी दूर राहा

Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय

Show comments