Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाळ गर्भाशयातही देते जांभई....

वेबदुनिया
WD
गर्भाशयात असलेले बाळ केवळ उचकी देणे, थुंकी गिळणे आणि अवयवांची हालचालच करीत नाही, तर जांभईही देते, असे नवीन संशोधनातून सिद्ध झाले आहे.

संशोधन करताना गर्भाशयात असलेल्या 15 सुदृढ बाळांच्या 4 डी स्कॅनचा अभ्यास करण्यात आला. बाळांच्या आरोग्याची माहिती घेण्यासाठी जांभईचा निश्चितच उपयोग होऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले आहे. बाळ गर्भाशयात असताना जांभई देते की नाही, यावर संशोधकांमध्ये मतभेद होते. गर्भाशयात असताना बाळ केवळ तोंड उघडण्याचा प्रयत्न करतो आणि ती विकासाची एक प्रक्रिया आहे, असे काही संशोधकांचे मत होते.

' प्लोस वनं या जर्नलमध्ये ब्रिटिश संशोधकांनी केलेले हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. गर्भाशयातील बाळ किती तोंड उघडते यावरून ते जांभई देते, की नाही, याचा शोध लावण्यासाठी हा अभ्यास करण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

तेनालीराम कहाणी : लाल मोर

आरोग्यासाठी फायदेशीर आहे नारळाची मलाई

Show comments