Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मल्टीटास्किंग मेंदूसाठी घातक

Webdunia
सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (12:10 IST)
सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि प्रचंड धावपळीच्या काळात ‘मल्टीटास्किंग’ हा एक परवलीचा शब्द बनला आहे. अनेकांना आपल्या ‘मल्टीटास्किंग’च्या क्षमतेचा अभिमान असतो. मात्र प्रत्यक्षात मानवी मेंदूची रचना ‘मल्टीटास्किंग’साठी नव्हे; तर ‘मोनोटास्किंग’साठी अनुकूल असल्याने ‘मल्टीटास्किंग’ हे मेंदूला हानिकारक आहे; असा इशारा संशोधकांनी दिला आहे. मानवी मेंदूला एकावेळी एकच काम करण्याची नैसर्गिक क्षमता मिळाली आहे. 
 
एका वेळी अनेक कामे करणे हे अनैसर्गिक असून त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते; असे मॅसॅच्युसेटस् इन्स्टिटय़ूट ऑङ्ख टेक्नॉलॉजीच्या संशोधकांना आढळून आले आहे. छोटी छोटी कामे पुरा केल्याने आपल्या मेंदूमध्ये ‘डोपामाईन’ हे हामरेन निर्माण होते. हे हामरेन सुखद संवेदना निर्माण करते. त्यामुळे एसएमएस, ई मेल करणे, टिट करणे; अशी किरकोळ कामे केल्याने हे हामरेन तत्कालिक सुख देत असले तरी प्रत्यक्षात आपण कोणतेही मोठे, महत्त्वाचे काम केलेले नसते; असे इन्स्टिटय़ूटचे संशोधक अर्ल मिलर यांनी सांगितले. 
 
मल्टीटास्किंगमुळे मेंदूची विचारांना सुसंगती देण्याची आणि नको असलेले विचार, माहिती काढून टाकण्याची क्षमता नष्ट होते. त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि क्षमता कमी होते; असेही त्यांनी सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments