Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्किंग वूमन्ससाठी डायट चार्ट

Webdunia
स्त्रियांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेयला हवी कारण की त्यांना ऑफिस आणि घरात दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं. स्त्रिया सर्वांच लक्ष ठेवण्याच्या नादात स्वत:ची काळजी घेत नाही. म्हणून वर्किंग वूमन्सला आपल्या आहारात पोषक वस्तूंचा समावेश केला पाहिजे. येथे प्रस्तुत आहे वर्किंग वूमन्ससाठी डायट चार्ट:
 
ब्रेकफास्ट
वर्किंग वूमन्सने ब्रेकफास्ट स्किप नको करायला. घरातून निघण्याआधी आपण दूध, सांजा, कॉर्नफ्लेक्स किंवा सँडविच घ्या. सकाळच्या नाश्त्यात विटामिन ए युक्त फळं जसे शेवफळ, पपई आणि स्ट्राबेरी खाणे फायदेशीर ठरेल. ब्रेकफास्टसाठी वेळ नसल्यास एक ग्लास दुधाबरोबर कोणतंही फळ घ्यावं. याबरोबरचं थोडेसे ड्रायफूट्स आपल्याजवळ ठेवावे.


लंच
वर्किंग वूमन्सच्या ब्रेकफास्ट आणि लंच यात चार ते पाच तासांचा अंतर हवा. लंचमध्ये भाजी, डाळ, दही, भात आणि पोळीचा समावेश करा. हिरव्या भाज्या जसे ब्रोकोली, पालक, मेथी व इतर आहारात सामील करा. याव्यतिरिक्त पनीर भु‍जिया किंवा एग भुजिया पण घेऊ शकता. लंचमध्ये सॅलेड किंवा कोशिंबीर घ्या.


स्नॅक्स
ऑफिसमध्ये काम करणारे काही लोकं संध्याकाळी भूक लागल्यावर काही अनहेल्थी फूड खातात जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. संध्याकाळी भूक लागल्यावर फळं किंवा कडधान्य खाणे फायद्याचे ठरेल. याने भूकही भागेल आणि आरोग्यासाठी उत्तमही ठरेल.



 
 

डिनर
रात्रीच जेवण झोपण्याच्या दोन ते तीन तासांपूर्वी घेयला हवं. याने अन्न पचायला वेळ मिळतो. रात्री जेवल्याशिवाय झोपू नाही. डिनरमध्ये तेलकट पदार्थ खाऊ नये. डिनरमध्ये पोळी आणि कमी मसालेदार भाजी किंवा डाळ खायला हवी. डिनरमध्ये घेतला जाणारा आहार लंच पेक्षा लाइट असायला हवं.

 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments