suvichar

शिकेकाई

- मृणालिनी फाटे

Webdunia
ND
आयुर्वेदीय ‍दृष्टिकोनातून पाहता शिकेकाई निव्वळ केस धुण्यासाठक्षच नव्हे तर अनेक औषधी गुणांनीही परिपूर्ण आहे. शिकेकाईमध्ये 11.2 टक्के सॅपोनीन्स (अर्थात फेस निर्माण करणारे घटक), 12.75 टक्के मॅलिक अ‍ॅसिड हे महत्त्वाचे घटक आहेत. शिकेकाई उत्तेजक, कडू, उलट्या होण्यास मदत करणारी आणि शीतल आहे. याचमुळे शिकेकाईचा उपयोग जळजळ होत असल्यास होतो.

शिकेकाई बद्धकोष्ठ दूर करणारी आहे. बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा शिकेकाई पावडर, अर्धा चमचा बडी शोप पावडर व अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर असे मिश्रण 1 ग्लास पाण्याबोबर घेतल्यास फारच फायदा होतो.

मुतखड्याचा त्रास असल्या एक चमचा शिकेकाई पावडर एक ग्लास पाण्यात उकळावी. पाणी अर्धे आटल्यानंतर गाळून घ्यावे. रोज अर्था कप शिकेकाईचे पाणी आठ दिवस प्यावयास घ्यावे.

त्वचारोग झालेले असल्यास, विशेषत: फंगल इन्फेक्शन झालेले असल्यास शिकेकाईचा वापर सर्वोत्तम. 2 चमचे शिकेकाई पावडर, 1 चमचा बावची पावडर, 1 चमचा कापूर कचरी पावडर, 1 चमचा ज्येष्ठमध पावडर व 1 चमचा आवळा पावडर असे मिश्रण करून ठेवावे. आंघोळीच्या वेळेस त्वचारोग झालेल्या भागावर ही पावडर पाण्यात मिसळून चोळून लावावी.

शिकेकाई केसांसाठी सर्वोत्तम समजली जाते. शिकेकाईच्या वापराने केसांच्या तेलकटपणा जातो. पण केस कोरडे होत नाहीत. शिकेकाई बरोबर सुयोग्य प्रमाणात रिठा वापरल्यास केस अधिक चांगले होतात त्यासाठी शिकेकाई 100 ग्रॅम, रिठा 20 ग्रॅम, बडीशोप 20 ग्रॅम, ज्येष्ठमध 20 ग्रॅम, मेथी 25 ग्रॅम.

वरील सगळे घटक पदार्थ एकत्र दळून आणावेत. यातील दोन चमचे मिश्रण अर्धा लिटर पाण्यात उकळावे व या पाण्याने केस धुवावेत. यामुळे केसांचे आयोग्य अनेक पटीनी सुधारते. केस मृदु मुलायम रेशमासारखे चमकदार बनतात.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

प्रेरणादायी कथा : योग्य आकलन

Dinner Recipe जीरा राइस दाल तड़का; एक 'क्लासिक' आणि सर्वांचे आवडते कॉम्बिनेशन

उन्हाळ्यात रोज या पदार्थाचे सेवन करा, शरीर थंड राहील

चॅटमध्ये ‘हे’ शब्द वापरत असाल तर सावध! नातं तुटू शकतं

व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता पडेल महाग! ही ५ लक्षणे दुर्लक्षित करू नका; डॉक्टरांचा गंभीर इशारा

Show comments