rashifal-2026

उन्हाळ्यात शिळं अन्न खाण्याचे 5 मोठे नुकसान

Webdunia
बिजी शेड्यूल असल्यामुळे अनेक लोक एकत्र अन्न शिजवून वेळोवेळी फ्रीजमधून काढून वापरत असतात. तसे तरं असे करणे योग्य नाही तरी उन्हाळ्यात याबद्दल विशेष काळजी घेण्याची गरज असते. शिळ्या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात आणि यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतात.
 
किती वेळ पूर्वी तयार जेवण करणे योग्य ठरेल असा प्रश्न आपल्या मनात असेल तर डॉक्टरांप्रमाणे चार ते पाच तास पूर्वी तयार अन्न खायला हरकत नाही परंतू याहून अधिक वेळेपूर्वी तयार पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य ठरणार नाही. कापलेले फळ आणि भाज्या तर मुळीचंच वापरू नये. याचे नुकसान जाणून घ्या:
 
कर्करोगाचा धोका
शिळं अन्न पोटातील कर्करोगाचा धोका निर्माण करतं. यातून आढळणारे बॅक्टेरियामुळे हायड्रोकार्बन आणि कँसरचा धोका वाढतो.
 
ताप येणे
बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे ताप येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
पोटदुखी
शिळं अन्न खाल्ल्याने पोटात गॅस, अॅसिडिटी आणि पोटदुखी सारख्या समस्या झेलाव्या लागू शकतात. फ्रीजमध्ये गार झालेले अन्न खाल्ल्याने देखील पोटदुखीची तक्रार होते.
 
फूड पॉइजनिंग
उन्हाळ्यात तापमान अधिक असल्यामुळे खाद्य पदार्थांमध्ये बॅ‍क्टेरिया लवकर पसरू लागतात. एक ते दोन तासातच कीटाणूंची संख्या तिप्पट वाढते ज्यामुळे फूड पॉइजनिंग आणि लूज मोशन सारख्या समस्या उद्भवतात.
 
अतिसार
पचनतंत्र आणि प्रतिरक्षातंत्र कमजोर झाल्यामुळे उन्हाळ्यात शिळं अन्न सेवन केल्याने अतिसारचा धोका उद्भवू शकतो. यामुळे लूज मोशन, उलट्या, ताप देखील होऊ शकतो. अनेकदा शरीरात पाण्याची कमीमुळे धोका निर्माण होतो.
 
फ्रीजमध्ये ठेवलेले डेअरी प्रॉडक्ट्स देखील अधिक दिवसापर्यंत वापरू नये. दूध उकळल्यावर ते त्याच दिवशी संपवावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

नैतिक कथा : लोभी सिंहाची कहाणी

Interesting facts about India तुम्हाला माहित आहे का? भारतातील हे शहर 'कॉटन सिटी' म्हणून ओळखले जाते

पुढील लेख
Show comments