Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...

Webdunia
गुरूवार, 23 एप्रिल 2020 (15:42 IST)
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या सर्वत्र कोरोनाने उच्छाद मांडला आहे. संपूर्ण विश्व या वैश्विक महामारीने वेढले आहे. सध्या तरी या जीवघेण्या आजारांवर लस उपलब्ध नाही तसेच काहीही औषधं पण नाही जे या जीवघेण्या विषाणूंची लागण लागलेल्या रुग्णाला पूर्णपणे बरं होण्याचा आत्मविश्वास देऊ शकेल. ह्यासाठी सर्वात महत्त्वाच्या पर्याय म्हणजे कोरोनापासून सुरक्षित राहणे आणि त्यासाठी महत्त्वाचे आहे आपल्या घराची स्वच्छता करणे. 
 
तज्ज्ञ सांगतात की आपल्या दैनंदिनीच्या वापरल्या आणि हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंना देखील स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. लॅपटॉप, फोन, कार, बाईक्स, या सारख्या दररोज हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंना देखील सेनेटाइझ करायला हवंय. 
 
गाडीच्या त्या जागेची स्वच्छता करायला हवी जेथे आपण सर्वात जास्त स्पर्श करतो. जसे कारचे स्टियरिंग व्हील, डोर हॅण्डल, गियर शिफ्टर, एसी बटण, रेडियो नॉब, आउटसाइड रियर व्यू मिरर, सेंटर कन्सोल, कप होल्डर्सही सतत स्वच्छ केले पाहिजे. 
 
या महत्त्वाच्या वस्तू गाडीमध्ये ठेवाव्या 
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी त्यांचा टिशू पेपर बॉक्स, हॅन्ड सॅनिटायझर आणि सॅनेटरी वाईप्स ठेवाव्यात.
कार मध्ये बसताना आणि कारमधून बाहेर पडताना ताबडतोब हाताने स्वच्छ करावे.
कारची जागा अशी जागा आहे जिथे व्हायरस बऱ्याच काळी टिकून राहतो. चालक आणि प्रवासी सतत संपर्कात असतात म्हणूनच कारची सीट स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे. स्वच्छता करण्यापूर्वी ओले कापड आणि सौम्य साबण वापरून सीट साफ करणे चांगले. त्याच प्रमाणे सीट बेल्ट आणि बटणेही स्वच्छ करावीत.
गाडीच्या सर्व काच स्वच्छ करावे. चिमूटभर पोटॅशियम परमॅंगनेट आणि दोन चमचे फार्मेलीन एक कप पाण्यामध्ये घाला. त्या मिश्रणाने खिडक्या आणि दारे स्वच्छ करा आणि कमीत कमी सहा तास दार आणि खिडक्या उघड्या ठेवाव्या. 
 
रुमालाचा 2 घड्या देखील मास्कचे काम करतात. 
सध्या लॉकडाउनच्या काळात बाजारपेठेतून मास्क किंवा मुखवटे आणणे शक्य नाही. त्याचे पर्याय म्हणून आपण घरच्या घरी देखील मास्क तयार करू शकतो. रुमालाने किंवा सुती कापड्याचे 2 थर बनवून तोंडावर बांधल्यावर ते मास्क चे काम करतात. दररोज साबणाने हा रुमाल धुतल्यावर स्वच्छ पाण्यात काही थेंब डेटॉलची घालून त्या पाण्यात हे मास्क घालून मग वाळवून वापरावे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments