Marathi Biodata Maker

वजन कंट्रोल करतात या फायबरयुक्त भाज्या नियमित सेवन करा

वेबदुनिया फीचर टीम
शुक्रवार, 22 मे 2026 (07:00 IST)
सध्या बदलत्या जीवनशैली मुळे लहान वयातच शुगर, बीपी , हायपरटेन्शन सारखे आजार होतात. धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. फास्टफूड जंक फूड खाल्ल्याने शरीराला आजार होतात.
ALSO READ: पोट आणि हृदय मजबूत ठेवायचे असेल, तर २४ तासांचा उपवास सुरू करा, फायदे जाणून घ्या
जेवणात संतुलित आहार घेतल्याने शरीर निरोगी राहते. जंक फूड खाऊन वजन वाढते. आपल्या अन्नात फायबर पचनक्रिया निरोगी ठेण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे वजन नियंत्रित ठेवतात. आहारात फायबरयुक्त आहाराचा समावेश करावा. फायबरयुक्त आहार खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. हे वाढत्या वजनावर देखील नियंत्रण ठेवते. या फायबरयुक्त भाज्यांचा आपल्या आहारात नियमित समावेश करावा.
 
काकडी-
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्याशिवाय त्यात भरपूर फायबर असते. हे खाल्ल्याने जास्त भूक लागत नाही. वजन कमी करण्याच्या आहारात तुम्ही काकडीचा  सहज समावेश करू शकता. सालासह काकडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
ALSO READ: काळे टोमॅटो खा, हृदयविकाराचा झटका टाळा, इतर फायदे जाणून घ्या
मटार-
हिरव्या वाटाण्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. तुम्हाला हवे असल्यास, मटार ची भाजी, पराठा किंवा टिक्कीमध्ये देखील समाविष्ट करू शकता.
ALSO READ: कोणी बीट खाणे टाळावे? बीट खाण्याचे तोटे जाणून घ्या
पालक-
पालक हा पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यात लोह, फायबर आणि इतर अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हे खाल्ल्याने मलप्रक्रिया सुलभ होते आणि पचनक्रियाही निरोगी राहते.
 
ब्रोकोली-
ब्रोकोली फायबरचा समृद्ध स्रोत आहे. हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही त्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता. तुम्हाला हवे असल्यास ब्रोकोलीचा समावेश सॅलडमध्ये करून खाऊ शकता किंवा भाजी आणि भातासोबत शिजवू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मुंबई-उत्तर भारतीय स्ट्रीट फूडची लोकप्रिय चाट दही कचोरी रेसिपी

वजन कंट्रोल करतात या फायबरयुक्त भाज्या नियमित सेवन करा

Career After 12th : बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन फार्मास्युटिकल इंजिनीअरिंग करून करिअर बनवा, पात्रता व्याप्ती जाणून घ्या

चेहऱ्याची सैल त्वचा कशी घट्ट करावी

जातक कथा : राजा आणि गिधाडाची भेट

पुढील लेख
Show comments