Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्लेवर्ड कंडोम मजा देत असेल तरी आरोग्यासाठी धोके जाणून घ्या

Webdunia
फ्लेवर्ड कंडोम रासायनिक पद्धतीने संश्लेषित केले जातात, याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही त्यांचा वापर करता तेव्हा तुम्ही काही अतिरिक्त रसायनांच्या संपर्कात येतात. ज्यामुळे योनिमार्गात जळजळ होऊ शकते.
 
स्ट्रॉबेरी, चॉकलेट, व्हॅनिला, मँगो, बबलगम, पिकल, जिंजर विश्वास ठेवा वा नाही पण हे फ्लेवर्ड कंडोम बाजारात उपलब्ध आहेत. फ्लेवर्ड कंडोममुळे हे मार्केट अधिक सर्जनशील आणि रोमांचक बनले आहे.
 
हे सांगण्याची गरज नाही की ज्या लोकांनी ते विकत घेतले त्यांना कमी रोमांचित वाटले नाही आणि यात काही नुकसान नाही. कारण जीवनात उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करू इच्छित लोकांना या फ्लेवर्ड कंडोम्सबद्दल खूप उत्सुकता वाटते.
 
चांगली बाजू
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या अभ्यासादरम्यान, संशोधकांना असे आढळून आले की ओरल संबंध ठेवणार्‍या 50 टक्के व्यावसायिक वर्कर्सनी कंडोम वापरण्यास नकार दिला कारण त्यांची चव खराब होती. जर फ्लेवर्ड कंडोम असेल तर ते वापरायला तयार झाले.
 
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांद्वारे जारी केलेल्या शिफारशींनुसार, STI जसे की क्लॅमिडीया, गोनोरिया, सिफिलीस, एचपीव्ही तसेच एचआयव्ही तोंडी संभोगातून पसरू शकतात. CDC डेटा दर्शविते की सक्रिय प्रौढांपैकी 85% तोंडी संभोग करतात, परंतु त्यापैकी फक्त 2% कंडोम वापरतात. अशाप्रकारे कंडोम बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लेटेक्समध्ये सुगंधाचा समावेश केल्याने केवळ ओरल संबंध अधिक आनंददायी झाला नाही तर स्त्रियांना अनेक रोगांचा धोका कमी करण्यास मदत झाली आहे.
 
वाईट बाजू
फ्लेवर्ड कंडोममुळे सुरक्षित संबंध अधिक आनंददायी आणि सोयीस्कर झाला असल्याचे नाकारता येत नाही. असे असूनही FDA देखील फ्लेवर्ड कंडोममध्ये असलेल्या शुगरबद्दल चेतावणी देते. लेटेक्समध्ये असलेली ही शुगर महिलांच्या योनीमध्ये प्रवेश करताना पीएच स्तरावर परिणाम करते. यामुळे महिलांमध्ये यीस्ट संसर्गाचा धोका वाढतो.
 
याव्यतिरिक्त फ्लेवर्ड कंडोम रासायनिक पद्धतीने संश्लेषित केले जातात. याचा अर्थ असा की त्यांचा वापर करून तुम्हाला आणखी काही रसायनांच्या संपर्कात येत आहे. त्यामुळे योनीमार्गात जळजळ, खाज सुटणे आणि संसर्ग होण्याचा धोका असतो.
 
मग आता काय करावे?
ओरल किंवा पेनिट्रेटिव्ह - संरक्षणाशिवाय संबंध धोकादायक असू शकतात. त्यामुळे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कंडोम वापरा. जर तुम्हाला ओरल संबंध ठेवताना नवीन चव आणायची असेल तर तुम्ही फ्लेवर्ड कंडोम वापरू शकता. पण यासोबतच एक साधा कंडोम सोबत ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, ज्याचा वापर फिजिकल होताना केला जाऊ शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

Birthday Wishes For Mother In Marathi आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

या ट्रिक तुमच्या जेवणाची चव वाढवतील, नक्की अवलंबवा

Make Iron Tawa Nonstick धिरडे किंवा डोसा लोखंडी तव्यावरही चिकटणार नाहीत, फक्त या सोप्या टिप्स फॉलो करा

Bones Sound हाडातून येत असेल आवाज तर हे पदार्थ खाणे सुरु करा

चिकन मेयो सँडविच रेसिपी

पुढील लेख