Festival Posters

उन्हाळ्याचा खरा मित्र गुलकंद, हे 5 फायदे आपल्याला फार कामी येतील

Webdunia
बुधवार, 27 मे 2020 (08:25 IST)
गुलाबाच्या ताज्या पाकळ्या आणि खडीसाखर मिसळून तयार केलेले गुलकंद. चवीला तर चविष्ट असतच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतं. गुलकंदाचे फायदे जाणून घेतल्यावर आपण आज पासूनच ह्याचे नियमाने सेवन करणार.
1 गुलकंद शरीरातील अवयवांना थंडावा देण्याचे काम करतं. शरीराची उष्णता वाढल्यावर गुलकंद घेणे लाभकारी असतं. उन्हाळ्या पासून होणाऱ्या त्रासांपासून सुटका होते.
2 गुलकंदाचे नियमाने सेवन करणे मेंदूसाठी देखील फायदेशीर असतं. 1 चमचा गुलकंद सकाळ आणि संध्याकाळ खाल्ल्याने आपला मेंदू शांत राहील, मेंदूला तवाका मिळेल, आपला राग देखील नाहीसा होईल.
3 बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास झाल्यास हे रामबाण आहे. दररोज गुलकंद घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो. आपली भूक वाढवतो त्याच बरोबर पचन प्रणालीला सुधारण्यास मदत करते. गरोदरपणात हे लाभदायक आणि सुरक्षित आहे.
4 डोळ्यांचे तेज वाढविण्यासाठी आणि डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी गुलकंदाचे नियमाने सेवन केले पाहिजे. डोळ्यांची जळजळ, आणि डोळे येणे या त्रासापासून सुटका मिळवून देतं.
5 तोंड येणे (छाले होणे) आणि त्वचेच्या त्रासांवर गुलकंद फायदेशीर असतं. थकवा आणि शक्तीचा ह्रास जाणवत असल्यास गुलकंद फायदेशीर ठरतं.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

कोथिंबीरच्या रसाचे किडनीसाठी फायदे जाणून घ्या

डॉक्टरेट ऑफ मेडिसिन पॅथॉलॉजी मध्ये करिअर करण्यासाठी पात्रता जाणून घ्या

पार्लरसारखा ग्लो मिळविण्यासाठी या ब्युटी टिप्स अवलंबवा

World Liver Day 2026: जागतिक यकृत दिन का साजरा केला जातो? त्याचे महत्त्व , उद्देश्य जाणून घ्या

Akshaya Tritiya festival Special अक्षय तृतीयेला अश्या प्रकारे बनवा 'परफेक्ट' शाही आम्रस

पुढील लेख
Show comments