Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या 5 परिस्थितीत संत्र्याचे सेवन करू नये,आरोग्याला त्रास संभवतो

Webdunia
मंगळवार, 12 जानेवारी 2021 (17:04 IST)
कोरोनाकाळात व्हिटॅमिन सी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी लोकांनी संत्र्याचे सेवन केले आहे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी,फायबर,व्हिटॅमिन ए बी, कॅल्शियम ,पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस इत्यादी असलेले पोषक घटक शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात.परंतु ह्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपण अडचणीत येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या 5 परिस्थितीत संत्र्याचे सेवन करू नये.

* पचनाशी निगडित काही समस्या असल्यास –
जर आपल्याला पचनाशी निगडित काहीही त्रास असल्यास संत्री खाऊ नये. ह्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यानं पोटात मुरडा येणे, अतिसार,अपचन सारखे त्रास होऊ  शकतात. एवढेच नव्हे तर या मध्ये असलेल्या फायबरच्या जास्त प्रमाणामुळे अतिसाराचा त्रास संभवतो.

* दात खराब होऊ शकतात-
संत्र्यामध्ये आढळणारे ऍसिड दातांच्या एनॅमल मध्ये कॅल्शियम मुळे बॅक्टेरिया संसर्ग उद्भवते . या मुळे दातां मध्ये पोकळी लागून दात खराब होतात.

* ऍसिडिटी होते-
संत्र्यामध्ये ऍसिड आढळते  जर आपण ह्याचे सेवन जास्त प्रमाणात करता तर आपल्याला ऍसिडिटी चा त्रास होऊ शकतो. ऍसिडिटी झाल्यावर व्यक्तीस छातीत आणि पोटात जळजळ होण्याचा त्रास वाढतो.

* पोटदुखी -
मुलांना संत्रे खाऊ घालू नये. संत्र्यामध्ये आढळणारे ऍसिड मुलांमध्ये पोटाशी निगडित समस्या उद्भवू शकतात.

* अनोश्यापोटी संत्री खाऊ नये-
आरोग्य तज्ज्ञांचा मते,अनोश्यापोटी संत्री खाऊ नये. संत्र्यामध्ये अमिनो ऍसिड असत त्या मुळे पोटात गॅस बनते या शिवाय रात्री देखील संत्रे खाऊ नये, संत्रे हे थंड प्रकृतीचे असतात त्यामुळे सर्दी-पडसं होऊ शकतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

स्टेज झिरो कॅन्सर म्हणजे काय? त्याचे लक्षण काय आहे

खाण्याव्यतिरिक्त, ही भाजी केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे, ती लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिला अशा प्रकारे त्यांचे मानसिक आरोग्य वाढवू शकतात, टिप्स जाणून घ्या

लॅपटॉपवर काम करताना मनगटाच्या वेदना कमी करण्यासाठी योगासन

लघु कथा : जादूचे पुस्तक

पुढील लेख