Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Health Tips: बसून काम करणं फायद्याचं की उभं राहून?

Webdunia
सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (09:24 IST)
आधुनिक जीवनशैलीत, आपल्यापैकी बरेच जण रोज बहुतेक तास बसून घालवतात. विद्यमान संशोधन दीर्घकाळ बसून काम करणं आरोग्याला हानिकारक असल्याचं सांगतं.
हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी 'अॅडजस्टेबल' डेस्कचा वापर केला जातो, या डेस्कमुळं तुम्हाला उभं राहून काम करता येतं आणि दीर्घकाळ बसण्याचे अपायकारक परिणाम टाळता येतात.
 
पण उभं राहणं चांगलं आहे का? जास्त वेळ उभं राहण्याचा हानिकारक आहे का?
 
जास्त उभं राहणं किंवा बसणं यामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधींविषयी संशोधन काय सांगतं आणि 'अॅडजस्टेबल' डेस्क'मध्ये गुंतवणूक करणं किंवा त्याचा वापर करणं खरोखर फायदेशीर आहे का?
 
जास्त वेळ बसून राहण्यात काय धोका आहे?
जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल ज्यांच्याकडे आधीच अॅडजस्टेबल डेस्क आहे, तुम्ही ते ठेवावे की नाही हे अनेक घटकांवर अवलंबून आहे.
 
तुम्ही त्याचा किती वापर करता याचा विचार करा. तुम्‍ही तुमच्‍या अॅडजस्टेबल डेस्कचा वापर बहुतांशी उभ्या राहून अधिक करता, की बसून तुम्‍ही तो अधिक वापरता?
 
जे लोक बसून खूप वेळ घालवतात त्यांना टाइप 2 मधुमेह, हृदयविकार आणि काही कर्करोग यांसारखे जुनाट आजार होण्याचा धोका जास्त असतो तसंच त्यांचं आयुर्मान कमी असतं.
 
जास्त वेळ बसल्यानं स्नायू आणि हाडांना वेदना होण्याचा त्रास होऊ शकतो, विशेषतः मान आणि पाठीचं दुखणं उद्भवू शकतं . जे लोक खूप कमी व्यायाम करतात किंवा कमी शारीरिक हालचाली करतात , त्यांच्या आरोग्यासाठी हे आणखी हानिकारक आहे.
 
अधिक वेळ बसून राहणं आरोग्यासाठी धोकादायक आहे , याचा सामना करण्यासाठी शारीरिकरित्या सक्रिय असणं महत्त्वाचं आहे, परंतु दररोज बरेच तास बसण्याचा नकारात्मक परिणाम शरीरावर होत असतो.
 
जास्त वेळ उभं राहणं देखील शरीराला हानिकारक ठरू शकतं.
 
अलीकडील अभ्यासानुसार विश्रांती शिवाय उभं राहण्याचा कालावधी 40 मिनिटांपर्यंत मर्यादित ठेवावा. हे उभं राहण्याशी संबंधित आजार म्हणजे स्नायू आणि सांधेदुखी विकसित होण्याची शक्यता कमी करेल. ज्यांना पूर्वी लक्षणं आहेत आणि ज्यांना नाहीत त्यांना ही हे लागू होतं.
 
अधिक कालावधीसाठी उभं राहणाऱ्या प्रत्येकाला स्नायू, हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांबाबतची लक्षणं जाणवतील असं नाही आणि असेही लोक असतील ज्यांना अधिक वेळ उभं राहूनही ही लक्षणं जाणवणार नाहीत.
 
पण, जर तुम्ही आता उभं राहिल्यानंतर ब्रेक घेत असाल, पण तुम्हाला उभं राहण्याशी संबंधित समस्या आधीपासून असतील आणि तुम्ही अधिक वेळ उभं राहिल्यास ती लक्षणं पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते.
 
उभं राहणं किंवा बसण्याची वेळ कमी करणं किंवा टप्प्याटप्यानं बसणं हे तुमचं रक्ताभिसरण, चयापचय, हृदयाचं आरोग्य, मानसिक आरोग्य आणि आयुर्मान सुधारू शकतं.
 
एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की दररोज फक्त एक तास बसून आणि एक तास उभं राहिल्यानं कंबरेचा घेर, चरबीचा स्तर आणि कोलेस्ट्रॉलमध्ये सुधारणा होते.
 
जेव्हा बसण्याऐवजी चालणं, मर्यादित किंवा जोमानं हालचाली करता, तेव्हा त्याचे फायदे आणखी जास्त असतात.
 
दीर्घकाळापर्यंत तुम्ही बसत असाल तर दर 20 मिनिटांनी 2 मिनिटं किंवा दर 30 मिनिटांनी 5 मिनिटांचा ब्रेक घ्या , त्यामुळं ग्लुकोज, चरबी आणि कोलेस्टेरॉलची पातळी सुधारू शकते.
 
इतर अभ्यासातून असं दिसून आलं आहे की तीन मिनिटं वेगवान चालणं, दंड बैठका सारख्या साध्या व्यायामात दर 30 मिनिटांनी ब्रेक घेणं हे उपयुक्त आहे.
 
अॅडजस्टेबल डेस्कचे फायदे
अॅडजस्टेबल डेस्कमुळं कर्मचाऱ्यांचा दिवसभर बसून राहावं लागत नाही.
 
अॅडजस्टेबल डेस्कच्या वापरकर्त्यांना उभं राहण्याचा आणि बसण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
 
पण, प्रत्येकजण उभं राहूण काम करण्याची नवीन सवय लावून घेत नाही आणि बरेच कर्मचारी त्यांच्या पूर्वीचीच बसण्याची पद्धत वापरतात.
 
कर्मचार्‍यांचा बसण्याचा वेळ कमी करण्यासाठी केवळ अॅडजस्टेबल डेस्क पुरेसे नाहीत.
 
ऑफिसमध्ये कामाची जागा, पर्यावरण आणि सांस्कृतिक धोरणं तयार करताना आणि राबवताना कर्मचारी आणि संस्थांनी हे लक्षात घेतलं पाहिजे , "कमी बसा आणि जास्त हालचाली करा "
 
तुमच्यासाठी आरामदायी आहे का?
 
जास्त वेळ उभं राहिल्यानं किंवा बसल्यानं तुम्हाला कोणत्याही प्रकारची अस्वस्थता किंवा थकवा येतो का? तसं असल्यास, तुम्हाला तुमची बसण्याची आणि उभं रहाण्याची सवय बदलावी लागेल.
 
अस्वस्थता टाळण्यासाठी काही उपाय करावे लागतील, जसं की उभं असताना आराम वाटावा किंवा बसताना पायांना विश्रांती मिळण्यासाठी मॅटचा वापर करावा.
 
तुमचा डेस्क किती आरोग्यदायक आहे, ते तपासा?
तुमचा डेस्क उभं आणि बसून काम करण्यासाठी शास्त्रीय दृष्टीकोनातून योग्य आहे का? पुरेसं अॅडजस्टेबल डेस्क आहे का ? जेणेकरून तुम्ही ऑफिस आणि घरी दोन्ही ठिकाणी आरामदायी आणि सुरक्षित काम करू शकता.
 
तुमच्या आरोग्याच्या गरजांचा थोडा विचार करा
उभं राहणं आणि दीर्घकाळ बसल्यानंतर ब्रेक घ्या, म्हणजे तुमची अस्वस्थता दूर होऊ शकते किंवा ते त्यामुळे तुमचं चयापचय आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल, दिवसभर नियमितपणे उभं राहणं आणि हालचाल केल्यानं तुम्ही कोणत्याही प्रकारचा डेस्क वापरत असाल तरीही समान फायदे मिळतील.
 
तुमची सध्याची स्थिती किंवा स्नायू, हाडांमध्ये होणारी वेदना, अशी लक्षणं असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा 'एर्गोनॉमिस्ट'शी (प्रोडक्ट संबधात वापरकर्त्याच्या शारीरिक आणि मानसिक आवश्यकतांचा जाणणारा तज्ज्ञ) सल्लामसलत करण्याबद्दल तुमच्या कंपनी व्यवस्थापनाला सांगा. तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या डेस्कबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकते.
 
शेवटी, तुमच्या अॅडजस्टेबल डेस्कची किंमत आणि जागेची आवश्यकता विचारात घ्या. तुम्ही उभं असताना ते जास्त वापरत नसल्यास, कदाचित हा डेस्क अधिक जागा व्यापत असेल आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा मिळत नसेल?
 
शेवटी, तुमचा अॅडजस्टेबल डेस्क ठेवायचा की काढून टाकायचा याचा निर्णय त्याच्या फायद्यावर अवलंबून असेल.
 
जास्त वेळ उभं राहणं स्नायू आणि हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. यामुळे स्नायू आणि पायांमध्ये सूज येणं, अशुद्ध रक्तवाहिन्यामुळे पायांच्या नसा फुगणं, तसंच शरिराच्या कमरेखालील आणि पायांच्या भागात वेदना ( निंतब, गुडघे, पायाचा घोटा,पाय ) होतात.
 
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सक्रिय असणं
ऑस्ट्रेलिया सरकार किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यासारख्या आरोग्य संस्थांनी प्रौढांनी बसून किती तास घालवावेत याबद्दल सूचना केल्या आहेत.
 
बसण्याच्या वेळेत ब्रेक घेत राहा आणि त्याऐवजी शारीरिक हालचाली करत राहा, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
 
डब्ल्यूएचओ पुढे असं सुचवतं की प्रौढ व्यक्तींनी शरीराच्या हालचाली कारव्यात ज्या तुमच्या अधिक बसण्यामुळं होणाऱ्या शारीरिक व्याधी बऱ्या करण्यासाठी उपयुक्त आहे.
 
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, दीर्घकाळ बसून राहण्याचं नुकसान कमी करण्यासाठी उभं राहणं पुरेसं नाही. आपल्याला कमी बसावं लागेल आणि जास्त हालचाली कराव्या लागतील.
 
Published by- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

तुमच्या आयुष्यासाठी योग निद्रा का महत्त्वाची आहे, जाणून घ्या त्याचे फायदे

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

पुढील लेख
Show comments