Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Health Tips : थंडीत नवजात बाळाची या प्रकारे काळजी घ्या. बाळ आरोग्यदायी राहील.

Webdunia
गुरूवार, 1 फेब्रुवारी 2024 (14:04 IST)
थंडीच्या दिवसांत नवजात बाळाची विशेष काळजी घ्यायची असते. कारण पालकांची एक छोटी चूक बाळाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. तसेच थंडीत नवजात बाळाच्या शरीराचे तापमान ठीक राहावे ही जवाबदारी आई-वडिलांची असते. नवजात बाळाला थंडीपासून सुरक्षित ठेवण्याकरिता पालकांच्या मनात खूप प्रश्न असतात. बाळाचे तापमान कसे पहावे, बाळाला कुठले व किती कपडे घालावे किंवा नवजात बाळाची असुविधा होते आहे याचे लक्षण काय असते. थंडीत नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी टिप्स जाणून घ्या. 
 
नवजात बाळाला खूप कपडे घालू नये कारण अधिक कपडे घातले तर बाळाला वजनदार होतील  ज्यामुळे त्याला अधिक गरम होऊ शकते. नवजात बाळाला थंडीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही त्याला 2-3 पतले कपडे घालू शकतात त्याने गरमावा राहिल आणि समस्या येणार नाही. 
 
नवजात बाळाला लोकरीचे कपडे घालु नये- 
खूप वेळेस लोकरीचे कपड्यांमुळे  बाळाच्या त्वचेला रेडनेस, एलर्जी आणि खाज येऊ शकते . त्यामुळे प्रयत्न करावे की नुसते लोकरीचे कपडे बाळाला घालू नये. बाळाला सूती कपडे घालावे मग त्यावर लोकरीचे कपडे घालावे.  
 
ज्यास्त कपडे घालण्याचे लक्षण- 
थंडीच्या दिवसांत बाळाला अधिक कपडे घातल्यास त्याचे शरीर गरम होते. ज्यामुळे ते रात्रभर रडतात. आणि त्यांची त्वचा लाल होते. याला ताप आहे अस समजण्याची चूक करू नका. तर बाळाच्या शरीरावरील घातलेले कपडे थोडे कमी करा ज्यामुळे त्यांच्या शरीराला थोडी हवा लागेल. 
 
मॉइश्चराइजरचा उपयोग महत्वाचा आहे-
थंडीत बाळाला तुमच्या वेळेनुसार अंघोळ घालू शकतात. बाळाच्या स्व्छतेची काळजी घ्यावी. सोबतच बाळाच्या त्वचेला मॉइश्चराइजर करणे यामुळे त्वचा मऊ राहिल. 
 
किती कपडे घालावे- 
पालकांच्या मनात नेहमी हा प्रश्न असतो की थंडीपासून सुरक्षा होण्यासाठी बाळाला किती कपडे घालावे. बाळाला 2-3 सूती कपडे घालावे. किंवा सूती कपडे घालून त्यावर लोकरीचे कपडे घालावे 
 
शरीराचे तापमान मोजावे-
थंडीत बाळाच्या शरीराचे तापमान मोजत राहावे तुम्ही बाळाच्या हाताच्या तळव्याला स्पर्श करून पाहू शकतात की जास्त गरम किंवा थंड तर नाही थंडीत बाळाचे हात थंड झाल्यास त्यांना सर्दी होऊ शकते.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

तुमच्या नखांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

काकडी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, जाणून घ्या त्याचे 5 चांगले फायदे

या 5 लोकांनी चुकूनही ग्रीन टी पिऊ नये, अन्यथा रुग्णालय गाठवं लागेल

Rice Kheer recipe : पितृपक्षात स्वादिष्ट तांदळाची खीर बनवा

Noodles Side Effects: नूडल्स खाल्ल्याने होतात हे 5 नुकसान, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments