Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Health Tips : अचानक हार्ट अटॅक येण्याची काय कारणं असू शकतात?

Webdunia
रविवार, 28 ऑगस्ट 2022 (17:09 IST)
What are the causes of sudden heart attack: आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून कोलेस्टेरॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात.
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमुळे सुरक्षित आहेत. याचा प्रभाव कमीत कमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो.
 
हृदय विकाराची काय लक्षणे असतात ?
 
काहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात.
 
* सामान्यत: छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
*  घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे हीदेखील काही लक्षणे आहेत.
* साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात.
* तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
* इतर लक्षणे जसे मळमळ, उलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व या वेदना सुमारे 20 मि. पेक्षा जास्त काळ टिकतात.
* काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन मृत्यू येतो.
 
हृदयविकार कसा ओळखला जातो ?
* डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात.
* इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
* ईसीजीमुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते.
* मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
* हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परीक्षणात दिसून येते.
* छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो.
* हृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कॅन चाचणी आहे ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते.कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी अ‍ॅन्जियोग्राम हा तपासणीसाठी महत्त्वाचा आहे. 
 
हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णास काय प्रथमोपचार द्यावे ?
हृदयविकारावर झटका आल्यास तातडीनं  ऊपचार मिळाल्यास रुग्णाचे जीवन वाचवता येते. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे. जर ऑॅक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरित ऑक्सिजन द्यावे. जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरित त्यातील एक गोळी जिभेखाली ठेवावी. पाण्यात ढवळून अ‍ॅस्प्रीन द्यावे.
 
हृदयविकारावर काय उपचार असतात ?
हृदयविकारावर तातडीनं वैद्यकीय उपचार करणे व रुग्णालयात भरती करणे गरजेचे असते. पहिले काही मिनिटे आणि तास संकटाचा असतो. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात. हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षित स्पंदने आढळली तर त्यावर त्वरित उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते. जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते. कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. यात कोरोनरी अ‍ॅन्जियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.
 
हृदयविकारापासून बचाव कसा करता येतो?
हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत 
 
जीवनशैलीत परिवर्तन :
*  आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मीठ कमी असावे, फायबर आणि जटिल - कार्बोहायड्रेट उच्च मात्रेत असावे.
*  वजन जास्त असणा-यांनी वजन कमी करावे.
* शारीरिक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
* धूम्रपान करू नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
*  मधुमेह, रक्तदाब किंवा जास्त कोलेस्टेरॉल असणा-यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगावर नियंत्रण मिळवता येतो.
 
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख