Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरुषांसाठीचं गर्भनिरोधक इंजेक्शन किती परिणामकारक ठरेल?

Webdunia
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (17:33 IST)
- सौतिक बिस्वास
पुरुषांशी संबंधित दोन गर्भनिरोधक उपाय दीर्घकाळापासून अस्तित्वात आहेत. यामध्ये पुरुष एकतर काँडम वापरु शकतात किंवा पुरुषाच्या शुक्राणूंना वाहून नेणाऱ्या दोन नळ्या बंद करून नसबंदीची शस्त्रक्रिया करू शकतात. पुरुष जन्म नियंत्रण गोळी (male birth control pill) आणि एक गर्भनिरोधक जेल (एक प्रकारचं औषधी द्रव्य ) तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
जगातील पहिल्या 'पुरुष जन्म नियंत्रण इंजेक्शन'ची लवकरच निर्मिती करणार असल्याचं भारताचं म्हणणं आहे. पण, हे गर्भनिरोधक इंजेक्शन यशस्वी ठरणार का?
 
सुजय गुहा हे 78 वर्षीय दिल्लीतील बायोमेडिकल इंजिनिअर आहेत, ते याचा शोध घेत आहेत. भूल देऊन पुरुषाचं अंडकोष ते जननेंद्रियापर्यंत शुक्राणूंना वाहून नेणाऱ्या नळ्यामध्ये या औषधाचं सिरिंज प्रीलोड केलं जातं. हे गर्भनिरोधक दीर्घकाळासाठी प्रभावी ठरतील, त्यांचा प्रभाव 13 वर्षं राहिल, असा संशोधकांचा दावा आहे. अनेक वर्षांच्या मानवी चाचण्यांनंतर मार्गदर्शक तत्वांनुसार शुक्राणूंच्या उलट प्रत्यारोपणासाठी रिसुग नावाचे औषध तयार आहे. हे एकप्रकारचं चिकट द्रव्य आहे, हे द्रव्य शुक्राणूंना निष्क्रिय करतं.
 
याप्रकारच्या उपचाराच्या दुसऱ्या टप्प्यात एक इंजेक्शन या द्रव्याला विरघळवते. यामुळे परिणाम उलट पद्धतीनं घडतात आणि एखाद्या माणसाला बाळ होण्याची परवानगी देते. या पद्धतीचा मानवी शरीरावर अभ्यास केला गेला नाही. असं असलं तरी, त्याने प्राण्याच्या शरीरावर परिणाम झालेलं दिसतं. इतर अडथळाविरहित पद्धतींप्रमाणेच गर्भनिरोधक इंजेक्शन लैंगिक संक्रमणापासून संरक्षण देत नाही.
 
"हे पुरुषांसाठी जागतिक स्तरावरील गर्भनिरोधक असेल. ते सुरक्षित आणि प्रभावी आहे, तसेच बरेच दिवस टिकते. आम्ही अपेक्षा करतो की नजीकच्या भविष्यात या गर्भनिरोधकांचं उत्पादन सुरू होईल," बायोलॉजिस्ट आर. एस. शर्मा सांगतात.
 
परंतु खरोखरच हे प्रभावी गर्भनिरोधक आहेत की नाही, यावर काही प्रश्न आहेत. काही वैज्ञानिक म्हणतात की, Risug ही औषध प्रणाली नसबंदीसाठी पर्याय आहे, ज्याला भारतीय संशोधक पूर्णपणे नकार देत नाहीत.
 
"गर्भनिरोधक औषधांच्या प्रत्यारोपणाच्या विस्तृत अभ्यासाची गरज आहे. सध्या हा अभ्यास निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीकोनातून केलेला दिसतो. या विस्तृत अभ्यासात औषधास गर्भनिरोधक बनू देण्याकरिता आवश्यक असणारी उलटक्षमता स्थापित करणे आवश्यक आहे," असं वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठातील बायोलॉजिस्ट मायकल स्किनर सांगतात.
 
डॉ. गुहा याविषयी सहमती दर्शवतात.
 
ते म्हणतात, जरी आम्हाला विश्वास असला, तरी आताच आम्ही उलटतपासणीचा दावा करणार नाही. मानवी शरीरावर त्याचं परीक्षण झाल्यानंतर तो करु. या क्षणी हे औषध नसबंदीला पर्याय म्हणून वापरता येऊ शकते. यामुळे पुरुषांना कमी त्रास होईल आणि आघातही होणार नाही."
 
या वर्षाच्या सुरुवातीला डॉ. शर्मा यांनी औषधांच्या चाचण्यांचे निकाल प्रकाशित केले. जवळपास 139 विवाहित पुरुष, ज्यांचं वय 41 वर्षांपेक्षा कमी आहे आणि कमीतकमी दोन मुलं आहेत, त्यांना इंजेक्शनचा एक डोस देण्यात आला आणि 6 महिने त्यांचं परीक्षण करण्यात आलं. असुरक्षित संभोगानंतर या 133 पुरुषांच्या बायका गरोदर राहिल्या नाहीत. हे औषध 6 पुरुषांकरिता काम करण्यात अयशस्वी झालं, याचं कारण सिरींजमधील गळती किंवा शुक्राणूंना वाहून नेणाऱ्या नळ्या पंक्चर झाल्या हे होतं.
 
"साइड इफेक्ट्स आणि अपयशदराच्या बाबतीत scalpel vasectomy पेक्षा हे इंजेक्शन वेगळं असू शकत नाही. यावर अधिक माहितीची आवश्यकता आहे," असं University of Washington School of Medicineमधील प्राध्यापक स्टीफन पेज सांगतात. "हा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. पण, यासाठी अधारभूत मानलेली पुरुषांची 139 ही संख्या मर्यादित आणि त्यासाठी ग्राह्य धरण्यात आलेला 6 महिन्यांचा कार्यकाळ खूपच त्रोटक होता," असं ते पुढे सांगतात. "म्हणूनच हे औषध म्हणजे संशोधनातील पुढची पायरी आहे, पण बाजारात ते काही गेम चेंजर ठरणार नाही," त्या असंही सांगतात.
 
भारतीय संशोधकांचं म्हणणं आहे की, Risugनं मानवी चाचण्यांच्या तीन फेऱ्या यशस्वी केल्य़ा आहेत. यामध्ये 1990पासून 500हून अधिक स्वयंसेवकांचा समावेश आहे. तसंच देशातल्या उत्तम पद्धती आणि विषाच्या चाचण्यांचा वापर करण्यात आलाय.
 
ते म्हणतात की, "हे इंजेक्शन परवडणारे असेल आणि गर्भधारणा रोखण्यासाठी कायमचा मार्ग असेल. स्वयंसेवकांना कामेच्छा किंवा इतर कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. भारतातील औषध नियामक लवकरच औषधांचं उत्पादन आणि विक्रीसाठी हिरवा कंदील दाखवण्याची अपेक्षा आहे."
 
पुरुष जन्म नियंत्रणाच्या पर्यायासाठी ही प्रभावी वेळ आहे. अनेक दशकांपासून स्त्रियांनी अनियोजित गर्भधारणेचा भार सहन केला आहे. गर्भधारणा आणि प्रसूती धोकादायक असल्यामुळे स्त्रियांसाठी सुरक्षित आणि प्रभावी गर्भधारणेचा उपाय म्हणून पुरुष जन्म नियंत्रणाच्या गर्भनिरोधकाची आवश्यकता निर्माण झालीय, असं संशोधकांचं मत आहे.
 
अमेरिकेत प्रथम गर्भनिरोधक गोळी उपलब्ध झाल्यानंतर आज जवळजवळ 60 वर्षांनंतर नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी महिला डझनपेक्षा जास्त गर्भनिरोधक पद्धतींवर अवलंबून आहेत: यामध्ये गोळ्या, इंजेक्शन, रिंग्ज, आणि स्पंज यांचा समावेश होतो. डॉ. गुहा यांनी अमेरिकेत हे औषध लाँच करण्यासाठी बार्कले सलंग्नित पार्सेमस फाउंडेशन या संस्थेला औषधाला परवाना दिला आहे. यासंबंधीचं गर्भनिरोधक Vasalgelचं परीक्षण अद्याप सुरू आहे. युरोपच्या सहा देशांमध्ये या औषधाची शास्त्रीय चाचण्या सुरु आहेत.
 
बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या अनुदानाअंतर्गत डॉ. गुहा यांनी मसूरीच्या सेंट लुई युनिव्हर्सिटीमधून मेडिकल सायकोलॉजीमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. महिलांची गर्भधारणा रोखण्यासाठी ते अनेक औषधांवर काम करत आहेत. पण, पुरुष त्यांची भूमिका बजावतील का?
 
भारतासारख्या पुरुषप्रधान समाजात पुरुषांमध्ये गर्भनिरोधकांचा वापर कमी आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 90% पेक्षा जास्त विवाहित जोडपे काँडम वापरत नाहीत. पुरुषांच्या नसबंदीचं प्रमाण खूपच कमी आहे आणि महिलांची नसबंदी ही एक लोकप्रिय गर्भनिरोधक पद्धत आहे. पण, जगभरात याविषयीची वृत्ती बदलत आहे, असा संशोधकांचा दावा आहे.
 
"वेळ आणि दृष्टीकोन जागतिक स्तरावर बदलत आहेत. गर्भनिरोधक वापरण्यात पुरुष इतके सहभागी नसण्याचं एक कारण म्हणजे त्यांच्याकडे खूप कमी पर्याय आहेत. पुरुषांचे गर्भनिरोधकांचे पर्याय विकसित करणं हे वैद्यकीय क्षेत्राचं ध्येय आहे; जेव्हा ते उपलब्ध असेल तेव्हाच पुरुष खऱ्या अर्थानं त्यांच्या भागीदारासह गर्भनिरोधकाचं ओझं वाटून घेईल," डॉ. पेज सांगतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

आवळ्याची चटणी रेसिपी

फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

नैसर्गिक लुकसाठी लिपस्टिकऐवजी या गोष्टी वापरून पहा

पुढील लेख
Show comments