rashifal-2026

उन्हाळ्यात पाळी दरम्यान या 5 आरोग्यदायी टिप्स ठेवा लक्षात

Webdunia
रविवार, 14 एप्रिल 2024 (07:00 IST)
उन्हाळ्यामध्ये पाळी आल्यावर ते दिवस कठीण असतात. उष्णतेमुळे आणि घामामुळे असुविधा निर्माण होण्याची शक्यता असते. संसर्गाचा धोका वाढू शकतो. याकरिता, उन्हाळ्यामध्ये पाळीच्या दिवसांत आरोग्यदायी असणे महत्वपूर्ण असते. या पाच आरोग्यदायी टिप्स अवलंबवा. 
 
1. पॅड नियमितपणे बदलणे- 
उन्हाळ्यामध्ये घाम आणि ओलावामुळे पॅड हे लवकर ओले होतात. ओले पॅड हे बॅक्टीरियाच्या विकासासाठी एक आदर्श वातावरण निर्माण करतात. ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. याकरिता, पॅडला 4 ते 6 तासांनी बदलत राहावे. 
 
2. मोकळे आणि आरामदायी कपडे घालावे- 
उन्हाळ्यामध्ये, मोकळे आणि श्वास घेणारे कपडे घातल्याने हवेचा संचार होण्यास मदत होते. तसेच घाम दूर होण्यासाठी मदत मिळते.यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. तसेच तुम्हाला मोकळे व आरामदायी वाटेल. कॉटनसारख्या नैसर्गिक फॅब्रिक पासून बनलेले कपडे घालावे. जे घामाचा ओलावा शोषून घेतात 
 
 
3. नियमित अंघोळ करा- 
उन्हाळ्यामध्ये घाम आणि ओलावामुळे शरीराची दुर्गंधी येऊ शकते. याकरिता, नियमितपणे अंघोळ करणे महत्वपूर्ण असते. तसेच खासकरून जेव्हा पाळीचे दिवस सुरु असतात तेव्हा नियमितपणे अंघोळ करावी. अंघोळ केल्याने घाम आणि बॅक्टीरिया दूर होतो.  
 
4. आपल्या वेजाइनल एरियाला स्वच्छ ठेवावे- 
पाळी दरम्यान चांगल्या आरोग्यासाठी आपल्या वेजाइनल एरियाला स्वच्छ ठेवणे चांगले असते. हलक्या व सुगंध न येणाऱ्या साबणाने दिवसभरात कमीतकमी एक ते दोन वेळेस आपल्या प्रायव्हेट पार्टला धुवावे. डूश किंवा योनि स्प्रेचा उपयोग करू नये. कारण हे तुमच्या योनिच्या नैसर्गिक pH संतुलनला खंडित करू शकतात. तसेच संसर्गाचा धोका वाढवू शकतो. 
 
5. आरोग्यदायी आहार घ्या आणि खूप पाणी प्या-
आरोग्यदायी आहार घेतल्याने आणि खूप पाणी पिल्याने तुमचे संपूर्ण आरोग्यामध्ये सुधारणा होते. फळे, भाज्या आणि कडधान्य  यांनी भरपूर आहार तुमच्या शरीराला पोषकतवे प्रदान करतात. तसेच तुमची रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवतात. खूप पाणी पिल्याने संसर्गाचा धोका कमी होतो. 
 
या आरोग्यदायी टिप्स अवलंबल्यास तुम्ही उन्हाळ्यात पाळी दरम्यान असुविधा कमी करू शकतात.तसेच संसर्गाच्या धोक्याला कमी करू शकतात. लक्षात ठेवा की, चांगले आरोग्य केवळ  तुमच्या शरीरासाठी महत्वपूर्ण नाही तर हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आणि आत्मविश्वासला वाढवण्यासाठी देखील महत्वपूर्ण आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. 
या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक 
माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

नारळाच्या आत पाणी कुठून येते? निसर्गाचा हा चमत्कार कसा घडतो; माहित आहे का तुम्हाला?

Modern Names with Classic Touch जुन्या नावांचा वारसा नव्या नावांच्या 'स्वॅग'ने जपा

Natural Glow लग्नसराईसाठी घरच्या घरी हवाय पार्लरसारखा निखार? किचनमधील 'या' वस्तूंचा वापर करून बनवा फेसपॅक

थंडी संपण्यापूर्वी एकदा तरी करून पाहा ही 'मटारची कचोरी'; सोपी रेसिपी आणि खास टिप्स

'र' अक्षरावरून मुलींची नवीन आणि आधुनिक नावे Best Marathi Baby Girl Names starting with R

पुढील लेख
Show comments