Marathi Biodata Maker

हिवाळ्यातल्या खांदेदुखीवर कसे मात कराल

Webdunia
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (15:56 IST)
खांदा हा आपल्या शरीरातील सर्वात जास्त हालचाल असणाऱ्या सांध्यापैकी एक आहे. खांद्याच्या या लवचिकतेमुळेच दैनंदिन जीवनातील आपली अनेक कामे अत्यंत सहज साध्य होतात. इतकी सहज की, आपला खांदा 360 अंश फिरू शकतो हे आपल्या लक्षात देखील येत नाही. परंतु काही कारणाने जेव्हा खांद्याचे दुखणे उद्‌भवते आणि केस विंचरण्यापासून ते मागील खिशातील पाकीट काढण्यापर्यंतच्या सगळ्या हालचाली अवघड-अशक्‍य होऊन बसतात, तेव्हाच आपल्याला त्याच्या मोकळ्या हालचालीचे महत्व जाणवते.
 
खांदेदुखीचे मुख्य कारण :
 
सतत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हालचालीमुळे किंवा सांध्याला जोराचा झटका बसून झालेल्या दुखापतीचा परिणाम म्हणून खांद्याचे दुखणे उद्‌भावते. खांद्याच्या दुखण्याचे बरेच प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये विविध प्रकारच्या दुखण्यांचा समावेश होतो. याचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येऊ शकते.
 
स्नायूचे दुखणे : यात स्नायूला येणारी सूज व स्नायूचे फाटणे यांचा समावेश होतो.
इम्पीगमेंट : खांद्याच्या क्‍लिष्ट संरचनेमुळे हालचाल करताना स्नायू दोन हाडांच्या चिमटीत अडकून दुखणे निर्माण होते.
 
अस्थिरता : खांद्याची नैसर्गिक स्थिरता फारच कमी असते. तसेच खांद्याची हालचाल घडवून आणणारे व स्थिरता देणारे स्नायू एकच असल्यामुळे त्यांच्या ताकदीत असमतोल निर्माण झाल्यास / जोराच्या आघातानंतर सांधा निखळू शकतो.
 
संधीवात : यात हाडांची झीज झाल्याने सांध्यास सूज येऊन खांदा दुखू लागतो.
फ्रोझन शोल्डर : यामध्ये सभोवतालच्या आवरणाला सूज येऊन ते घट्ट झाल्याने खांदा दुखू लागतो व कालांतराने खांद्याची हालचाल आखडते. डायबेटीस पेशंटस्‌मध्ये फ्रोझन शोल्डरचे प्रमाण जास्त असते.
 
उपचार :
 
खांद्याच्या कुठल्याही प्रकारच्या दुखण्यामध्ये उपचारांचे मुख्य उद्दिष्ट हे सांध्याची सूज कमी करून त्याची हालचाल पूर्ववत करणे हे असते. 
 
वेदनाशामक गोळ्या सूज कमी करून दुखणे शमवण्यास मदत करू शकतात. परंतु लयबद्द हालचाल पूर्ववत करणे हे फक्त योग्य व्यायामानेच साध्य होऊ शकते. 
फिजिओथेरपी मध्ये विशिष्ट तांत्रिक व्यायामाचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्तीची हाडाची संरचना, स्नायूंची ताकद व लवचिकता, दैनंदिन कामाचे स्वरूप यात फरक असल्याने तज्ञ, फिजि ओथेरपीस्टकडून खांद्याची पूर्वतपासणी करून आपणास सुयोग्य व्यायाम करावेत. जेणेकरून व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा होऊन दुखणे व खांद्याची हालचाल लवकर आटोक्‍यात येण्यास मदत होईल.

डॉ. संजय क्षीरसागर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

स्वामी विवेकानंदांकडून आपण काय शिकू शकतो, या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्यास यश मिळेल

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एग्रीकल्चर इंजीनियरिंग करून करिअर बनवा

उकळता चहा किंवा कॉफी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि कोंडा दूर करण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय अवलंबवा

खोलीत रूम हीटरसोबत पाण्याची बादली ठेवणे का महत्त्वाचे आहे?

पुढील लेख
Show comments