Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका रोखण्यासाठी हे उपाय करा

Webdunia
शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (14:04 IST)
कर्करोगाचा धोका सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकतो.महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असला तरी पुरूषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे.जागतिक स्तरावर या गंभीर समस्येचा धोका झपाट्याने वाढताना दिसत आहे.पुरुषांनीही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊ या.
 
प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे- डॉक्टर सांगतात की सुरुवातीला प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे आढळून येत नाही. काही लक्षण बघता आपण कर्करोगाचा निदान करू शकतो.
 
* लघवी करताना त्रास होतो.
* लघवीच्या प्रवाहात शक्ती कमी होणे.
* मूत्र मध्ये रक्त
* वीर्यातून रक्तस्त्राव.
* काहीही न करता झपाट्याने वजन कमी होणे
* नपुंसकत्वाची समस्या.
 
उपचार -
1 सकस आहार घेणे - आहाराची काळजी घेणे फार महत्वाचे मानले जाते. यासाठी फळे आणि भाज्यांनी भरपूर आरोग्यदायी गोष्टी खा. फळे आणि भाज्यांमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात जे निरोगी ठेवण्यास मदत करतात. अनेक फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म देखील आढळतात जे कर्करोगाचा धोका कमी करून शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. 
 
2 नियमितपणे व्यायाम करणे- व्यायामामुळे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व लोकांना आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला व्यायामशाळेत जाता येत नसेल तर तुम्ही घरी योगासने करू शकता किंवा धावणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम करू शकता. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते.
 
3 वजन नियंत्रित करणे-  जर तुमचे वजन योग्य असेल तर ते तुमच्यासाठी अनेक गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वजन जास्त असणे हे प्रोस्टेट कॅन्सरचे कारण असल्याचे समजते. याशिवाय जास्त वजनामुळे हृदयविकार, संधिवात यांसारख्या आजारांचा धोकाही वाढतो. आहार आणि व्यायामामुळे शरीराचे वजन नियंत्रित ठेवता येते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो.
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

बटर चिकन खिचडी रेसिपी

दही पालक सूप रेसिपी

पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या

बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments