Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे साधे उपाय तुमची स्मरणशक्ती तल्लख करतील आणि तुम्हाला बनवतील 'सुपरह्युमन'

Webdunia
मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (18:04 IST)
तुमचं असं कधी होतं का, समजा तुम्हाला तीन गोष्टी खरेदी करायच्या आहेत असं डोक्यात ठेऊन तुम्ही दुकानात पोहोचता. दोन वस्तू घेता, तिसरी वस्तू काय घ्यायची हेच आठवत नाही.
आपल्याकडे अनेकजण चांगली स्मृती असावी असं म्हणत असतात. पण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरतो.
 
आणखी एक उदाहरण काहीतरी काम लक्षात येतं आणि आपण वरच्या मजल्यावर जातो. पण तिथे जाईस्तोवर आपण कशासाठी आलोय हेच विसरायला होतं. आपल्यासमोर येणाऱ्या गोष्टी क्षणार्धात पटलावरून गायब का होतात याचं आपल्याला आश्चर्य वाटत राहतं.
 
स्मरणशक्ती सुधारण्याच्या दृष्टीने अनेक तंत्र अवलंबण्यात येतात. काही क्लृप्त्या दशकभराहून अधिक काळ वापरल्या जात आहेत. अॅमनॉमिक्स आणि मेमरी प्लेसेस या काही युक्त्या आहेत.
 
मग शास्त्रज्ञ आता नवं काय शोधू पाहत आहेत. या क्लृप्त्या प्रत्यक्षात आणण्यापूर्वी आणखी संशोधन व्हावं लागेल. पण यासंदर्भात नवं संशोधन काय सांगतं हे आपण समजून घेणार आहोत.
 
वेळ आणि ठिकाण दोन एकदमच वेगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात रोज जगताना आपण काळजीपूर्वक लक्षात घेतलं तर यामध्ये सख्य असल्याचं समजतं. आपण काही आठवणी मागे सोडून देतो.
 
काही गोष्टी आयुष्यात याव्यात अशी आपली अपेक्षा असते. आपापल्या संस्कृतीनुसार संदर्भ बदलतात.
 
एक भन्नाट प्रयोग
रोहॅम्प्टन विद्यापीठातल्या संशोधकांनी वेळ आणि ठिकाणचा परस्परसंबंध ताडण्यासाठी संशोधन केलं आहे. याद्वारे गोष्टी अधिक परिणामकारकरीतीने लक्षात ठेवता येऊ शकतात.
 
संशोधकांनी लोकांना शब्दांची यादी दाखवली. चित्रांचा कोलाज दाखवला. महिलेची हँडबॅग चोरी होत असल्याचा व्हीडिओ दाखवला. त्यानंतर त्यांनी लोकांना पुढे किंवा मागे चालायला लावला.
 
असं करताना त्यांनी पाहिलेली गोष्ट बोलायला सांगितली. त्यांच्या स्मरणशक्तीची नंतर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पुढे-मागे चाललेल्या लोकांनी गोष्टी अधिक अचूकतेने सांगितल्या.
 
मागे चालल्यामुळे ते आधीच्या गोष्टी आठवू शकले. मागे जायच्या विचारानेही त्यांना फायदा झाला. 2006 मध्ये उंदरांवर करण्यात आलेलं संशोधन आणि 2018 मध्ये करण्यात आलेलं संशोधन यामधून रंजक गोष्टी समोर आल्या आहेत.
 
काही उंदरांना एका भुलभुलैय्या सारख्या रचनेत टाकण्यात आलं. हा प्रयोग होता की उंदीर आपला रस्ता कसा शोधतात आणि ते रस्ता बरोबर लक्षातही ठेवतात का.
 
उंदीर जेव्हाही एका बाजूने निघत तेव्हा त्यांना किती वेळ लागतो हे पाहण्यात आलं.
 
उंदरांना या भुलभुलैय्या फिरायला लावण्यात आलं. जसा रस्ता सापडतो तसं त्यांचे मज्जातंतू सचेत झाले आहेत याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं होतं.
जर रिव्हर्स ऑर्डरमध्ये म्हणजे उलट्या क्रमाने त्यांनी आपण काय केलं आहे हे जर आठवलं तरी ती तो रस्ता त्यांच्या स्मरणात राहतो. आणि तेव्हा देखील हे मज्जातंतू सचेत झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं.
 
या संशोधनातून हे स्पष्ट झालंय की माणसं भूतकाळातली एखादी गोष्ट आठवताना उलट्या संरचनेत आठवतं. एखादी गोष्ट जेव्हा आपण पाहतो, त्याचं प्रारूप लक्षात राहतं. मग रंग लक्षात राहतात. जेव्हा आपण ती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला वस्तू आठवतो आणि मग तपशील.
 
चित्र काढा
तुम्हाला काय करायचं आहे याची शाब्दिक यादी करण्यापेक्षा चित्र स्वरूपात लिहून काढा. 2018 मध्ये एका संशोधनाचा भाग म्हणून तरुण आणि ज्येष्ठ अशा दोन भिन्न गटाच्या लोकांना काही शब्द देण्यात आले.
 
निम्म्या लोकांना चित्र काढा असं सांगण्यात आलं. बाकीच्यांना शब्द लिहून काढा असं सांगण्यात आलं. नंतर दोन्ही गटांची चाचणी घेण्यात आली. काही शब्दांचं चित्र काढणं खरंच कठीण होतं पण चित्र काढायचं असल्याने त्यांना तो शब्द लक्षात राहिला.
 
ज्येष्ठ नागरिकांना तरुणांच्या बरोबरीने शब्द लक्षात ठेवता आले कारण त्यांनी चित्र काढण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांना शब्द लक्षात राहिले.
 
जेव्हा आपण चित्र काढतो तेव्हा आपण त्या गोष्टीचा सखोलतेने विचार करतो. चित्र काढण्यासाठी ते कसं काढता येईल, दिलेल्या शब्दाचं रूप कसं असेल याचा विचार करतो.
 
ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यांची यादी करणंही उपयुक्त ठरतं. त्यामुळे एखादवेळेस आपण दुकानात पोहोचलो आणि यादी घरी राहिली तरी आपल्याला त्या गोष्टी आठवतात. जर त्या गोष्टींचं चित्र काढलं तर गोष्टी आणखी चांगल्या पद्धतीने आठवू शकतात.
 
चित्र किती चांगल्या पद्धतीने काढता येतं हे महत्त्वाचं नाही, चित्राच्या माध्यमातून शब्द आठवणं महत्त्वाचं.
 
थोडा व्यायाम करा
अॅरोबिक पद्धतीने व्यायाम ज्यामध्ये धावण्याचा समावेश आहे ते केलं तर स्मरणशक्ती सुधारते. तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची असते तेव्हा शारीरिक हालचाल शॉर्ट टर्म फायद्याची ठरू शकते.
 
व्यायामाची अचूक वेळ साधली तर स्मरणशक्ती तल्लख होण्याची शक्यता वाढते. चित्रांची यादी आणि ठिकाणं असं दाखवण्यात आलं आणि त्यानंतर व्यायाम केला तर अधिक चांगल्या पद्धतीने गोष्टी आठवतात.
 
नक्की कधी व्यायाम करावा यासंदर्भात संशोधक अभ्यास करत आहेत.
 
काहीच करू नका
पक्षाघातामुळे स्मरणशक्तीची समस्या झालेल्या लोकांना 15 शब्द आठवण्यासाठी देण्यात आले. त्यानंतर आणखी एक काम देण्यात आलं. 10 मिनिटांनंतर ते मूळ यादीपैकी 14 टक्के गोष्टीच आठवू शकले.
 
पण याऐवजी या सगळ्यांना काळोख असलेल्या खोलीत ठेवलं आणि काहीही करू नका असं 15 मिनिटं बसा सांगितलं तर तेव्हा त्यांना गोष्टी आठवण्याचं प्रमाण 49 टक्के झालं होतं.
 
मिचेला डेवार यांनी हेरियट वॉट विद्यापीठात हीच युक्ती वापरली जाते. निरोगी लोकांमध्ये एखादी नवीन गोष्टी शिकल्यानंतर छोटीशी विश्रांतीही खूप परिणामकारक ठरते.
 
पण त्या लोकांनी बंद खोलीत दुसऱ्या कशाचा विचार न करता जे आठवायचंय तेच डोक्यात ठेवलं नाही कशावरून? हे टाळण्यासाठी डेवार यांनी परकीय भाषेतले कठीण शब्द दिले. असे शब्द जे पुन्हा म्हणायला कठीण जातील.
 
आपली स्मरणशक्ती किती क्षणभंगुर असते हे समजू शकतं.
 
थोडी झोप घ्या
आपण केलेल्या कामाची उलट क्रमाने मनात उजळणी करणं, चित्र काढणं, व्यायाम करणं किंवा छोटी विश्रांती घेणं हे अवघड वाटत असेल तर रीतसर झोप घेण्याचा तुम्ही नक्की विचार करा.
 
झोप घेतली तर आपल्या स्मरणशक्तीला चालना मिळते. आपण जी गोष्टी पाहिली आहे, शिकली आहे ती झोपेत पुन्हा जागृत होते. भले ही झोप रात्रीची मोठी नसेल.
 
लोकांना काही शब्द आठवायला देण्यात आले. 90 मिनिटांच्या गाढ झोपेनंतर त्यांना हे शब्द सहज आठवले. पण एक चित्रपट पाहिल्यानंतर शब्द आठवताना अडचण आली असं जर्मनीतल्या एका संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे.
 
दुपारी झोप घेण्याची सवय असणाऱ्यांना या क्लृप्तीचा उपयोग होतो. एलिझाबेथ मॅकडेव्हिट आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील त्यांच्या चमूने हे अभ्यासलं की लोकांना झोप कशी घ्यायची याचं प्रशिक्षण देता येतं का. चार आठवड्यांसाठी दिवसा झोप न घेणाऱ्यांना झोप घ्या असं सांगण्यात आलं.
 
दुर्देवाने दिवसाच्या झोपेने त्यांची स्मरणशक्ती सुधारली नाही. कदाचित प्रदीर्घ अशा झोपेच्या सरावानंतर त्यांच्या स्मरणशक्तीत बदल होऊ शकतो. तुमच्यासाठी कोणती गोष्ट केली की स्मरणशक्ती सुधारतेय? यादी करणं, चित्र काढणं, काहीही न करणं, झोप काढणं, व्यायाम करणं?
 
अभ्यास चांगला व्हावा यासाठी काय कराल?
अभ्यास करण्याबद्दल अनेक समज गैरसमज असतात. चांगला अभ्यास करणे हे केवळ परीक्षा काळापुरतेच मर्यादित नाही तर तुमच्या कार्यालयीन कामासाठी किंवा व्यावसायिक प्रगतीसाठी देखील याचा निश्चित उपयोग होऊ शकतो.
 
इतकंच नाही तर अभ्यासामुळे तुमचा मेंदू सक्रिय राहतो आणि नवीन कल्पना सुचतात असं देखील सांगितलं जातं.
 
लोकांना काही शब्द आठवायला देण्यात आले. 90 मिनिटांच्या गाढ झोपेनंतर त्यांना हे शब्द सहज आठवले. पण एक चित्रपट पाहिल्यानंतर शब्द आठवताना अडचण आली असं जर्मनीतल्या एका संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे.
 
दुपारी झोप घेण्याची सवय असणाऱ्यांना या क्लृप्तीचा उपयोग होतो. एलिझाबेथ मॅकडेव्हिट आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील त्यांच्या चमूने हे अभ्यासलं की लोकांना झोप कशी घ्यायची याचं प्रशिक्षण देता येतं का. चार आठवड्यांसाठी दिवसा झोप न घेणाऱ्यांना झोप घ्या असं सांगण्यात आलं.
 
दुर्देवाने दिवसाच्या झोपेने त्यांची स्मरणशक्ती सुधारली नाही. कदाचित प्रदीर्घ अशा झोपेच्या सरावानंतर त्यांच्या स्मरणशक्तीत बदल होऊ शकतो. तुमच्यासाठी कोणती गोष्ट केली की स्मरणशक्ती सुधारतेय? यादी करणं, चित्र काढणं, काहीही न करणं, झोप काढणं, व्यायाम करणं?
 
अभ्यास चांगला व्हावा यासाठी काय कराल?
अभ्यास करण्याबद्दल अनेक समज गैरसमज असतात. चांगला अभ्यास करणे हे केवळ परीक्षा काळापुरतेच मर्यादित नाही तर तुमच्या कार्यालयीन कामासाठी किंवा व्यावसायिक प्रगतीसाठी देखील याचा निश्चित उपयोग होऊ शकतो.
 
इतकंच नाही तर अभ्यासामुळे तुमचा मेंदू सक्रिय राहतो आणि नवीन कल्पना सुचतात असं देखील सांगितलं जातं.
वैज्ञानिक सांगतात की चांगला अभ्यास म्हणजे पाठांतर नाही किंवा घोकंपट्टी नाही.
 
नवे शब्द किंवा भाषा शिकताना सहसा ते लक्षात ठेवण्यासाठी पाठ करण्यावर भर दिला जातो. पण मानसशास्त्रज्ञांच्या मते घोकंपट्टी करणं चुकीचं आहे.
 
कारण तसं केलं तरी आपल्या मेंदूच्या लक्षात या गोष्टी राहतीलच असं नाही. यापेक्षा अभ्यास करताना थोडा ब्रेक घेणे जास्त चांगले.
 
एखादा विषय किंवा मुद्दा लक्षात ठेवायचा असला तर त्याचा अभ्यास थोड्या थोड्या वेळाने करावा. त्यामुळे स्मरणशक्ती उत्तम राहील.
 
एखाद्या पुस्तकातला एक धडा वाचावा मग दुसरं काहीतरी वाचायचं. काही काळाने आधी जो धडा वाचला आहे तो परत वाचावा. तो धडा परत एका तासाने वाचू शकता, एका दिवसाने किंवा एका आठवड्यानेही.
 
अभ्यास झाल्यानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की, वाचलेल्यापैकी किती कळलं. त्याने मेंदूला या विषयाची चांगली ओळख होईल.
 
त्या धड्याचा सारांश आपल्याला काढता आला पाहिजे आणि आपल्या शब्दात तो सांगता आला पाहिजे.
 
महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे अन्...
घोकंपट्टीसारखीच ही पद्धतही फार सामान्य आहे. यात काही वाईट नाही. वाचताना जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात ते अधोरेखित करण्यास काही हरकत नाही.
 
पण मानसशास्त्रज्ञांच्या मते ही पद्धत दरवेळेस यशस्वी होईलच असं नाही. अनेक विद्यार्थी तर पूर्णच्या पूर्ण परिच्छेद अधोरेखित करतात. असं केलं तर महत्त्वाचे मुद्दे आणि बिनमहत्त्वाचे मुद्दे यांच्यात फरक करणं कठीण होऊन बसतं. त्यापेक्षा शांतपणे विचार करा.
 
मानसशास्त्रज्ञ सल्ला देतात की आधी कोणत्याही विषयाचं पुस्तक पूर्ण वाचा. मग त्यातले मुद्दे अधोरेखित करा.
 
संपूर्ण वाचल्यानंतर महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केल्याने त्या विषयाचा शांतपणे विचार करायला वेळ मिळतो. प्रत्येक वाक्य अधोरेखित करत बसायची गरज नाही.
 
खूप नोट्स काढू नका
कोणत्याही लायब्ररीत, वर्गात गेलात तर विद्यार्थी नोट्स काढताना दिसतील. अतिउत्साहात शुल्लक गोष्टींच्याही नोट्स काढल्या जातात. नंतर त्यांचा काहीच उपयोग नसतो.
 
त्या ऐवजी छोट्या आणि मोजक्या शब्दांतल्या नोट्स बनवा.
 
सगळ्या प्रकारच्या अनुभवाअंती असं लक्षात आलं आहे की विद्यार्थी जितक्या कमी नोटस काढतील तितकंच त्यांच्या लक्षात राहील. कारण जेव्हा मोजक्या शब्दांत नोट्स काढल्या जातात, तेव्हा त्या विषयाबद्दल जास्त विचार करावा लागतो.
 
जास्तीत जास्त आशय कमी शब्दांत कसा मांडायचा यासाठी प्रयत्न करावे लागतात. असं करत असताना मेंदू त्या विषयाची आपोआप उजळणी करतो. त्यातले महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवतो. सहसा जर लिहून नोट्स काढल्यात तर त्याचा जास्त फायदा होतो.
 
लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर जर टाईप केलंत तर त्याचा फारसा फायदा होत नाही.
 
महत्त्वाच्या विषयांचे तक्ते बनवा
बरेचसे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात की ज्या विषयाची तयारी करत आहेत त्या विषयातले IMP मुद्दे काढा. त्या मुद्द्यांचाच अभ्यास करा.
 
बऱ्याचदा शिक्षकच असे IMP देतात आणि सांगतात की यांचा अभ्यास करा. त्यापेक्षा आपण त्या विषयाचा सखोल अभ्यास करायला हवा.
 
अभ्यासाची एक निश्चित रूपरेखा तयार करून अभ्यास केला तर विषय नीट समजायला मदत होते. महत्त्वाच्या विषयांचा तक्ता बनवू शकता म्हणजे तुम्ही ते विसरणार नाही.
 
महत्त्वाच्या लेक्चर्सचे बुलेट पॉईंटही बनवू शकता. जितक्या कमी शब्दात लिहाल तितकं चांगलं.
 
सतत स्वतःची परीक्षा घेणं थांबवा, आत्मविश्वास बाळगा
काही विद्यार्थी अभ्यास झाला की नाही ते तपासण्यासाठी स्वतःचीच परीक्षा घेतात. पण नुस्ती घोकंपट्टी करून परीक्षा घेतली तर त्याला अर्थ नाही.
 
फक्त प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा आपला एखाद्या विषयाचा किती सखोल अभ्यास झाला आहे ते तपासून पाहा. त्यामुळे स्मरणशक्ती वाढेल.
 
अनेकांना त्यांच्या स्मरणशक्तीच्या मर्यादा लक्षात येत नाहीत. ते स्वतःला खूप स्मार्ट समजतात. पण खरंतर ते तेवढे हुशार नसतात. अशा परिस्थितीत अतिआत्मविश्वास नडू शकतो.
 
कारण त्यामुळे जितक्या गंभीरपणे अभ्यास केला पाहिजे तितक्या गंभीरपणे तो होत नाही. अतिआत्मविश्वासी लोकांना वाटतं की त्यांना सगळं लक्षात आहे, पण ऐनवेळेस ते महत्त्वाचे मुद्दे विसरतात.
 
म्हणूनच एकदा अभ्यास केल्यानंतर काही काळाने आपण कुठे आहोत हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

लघू कथा : मूर्ख कावळा आणि हुशार कोल्ह्याची गोष्ट

Youngest Mountaineer Kaamya Karthikeyan 12 वीची विद्यार्थिनी काम्याने इतिहास रचला, सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करून सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली

Hydrate in Winter हिवाळ्यात तहान लागत नाहीये? तर स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

ब्रेड ऑम्लेट रेसिपी

नाश्त्यामध्ये बनवा मटार कचोरी, जाणून घ्या रेसिपी

पुढील लेख
Show comments