Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गर्भवतीचा आहार कसा असावा?

वेबदुनिया
ND
आई होणार हे कळलं की स्त्रीचा आनंद गगनात मावेनासा होतो. आपण नव्या जीवाला जन्म देणार या भावनेनेच ती सुखावते, पण त्याच आनंदाबरोबर तिने स्वत:च्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज असते. गर्भावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात स्त्रीच्या आरोग्यामध्ये बरेच चढ -उतार होत असतात. पोटात एक नवा जीव वाढत असल्याने गर्भवती स्त्रीने आरोग्याची काळजी घेण्याची गरज असते.

गर्भावस्थेदरम्यान स्त्रीने नेमका कशा प्रकारचा आहार घ्यायला हवा, याबाबत बरेच समज आहेत. एखादा पदार्थ खाल्ला तर बाळावर अमूक परिणाम होईल, असे मानले जाते. बर्‍याच प्रकारच्या भाज्या आणि फळे गर्भवती स्त्रीसाठी वर्ज्य मानली जातात. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला सर्दी, खोकला होण्याची शक्यता असल्याने गर्भवती स्त्रीला ठरावीक पदार्थ खायला दिले जात नाहीत. बाळाच्या शरीरावर पांढरे डाग निर्माण होण्याच्या शंकेने गर्भवती स्त्रीला मासे खाण्याचीही परवानगी नसते. मात्र, या सर्वांपलीकडे जाऊन स्त्रीचे आणि पोटातील बाळाचे आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने तिला सकस आणि पौष्टिक आहार देणे गरजेचे असते.

ND
गर्भवती स्त्रीच्या आहारामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश असला पाहिजे. गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडची एक गोळी गर्भवती स्त्रीला दररोज देणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रीच्या आहारात वरण, भात, हिरव्या भाज्या, पोळी आणि फळांचा समावेश असायला हवा. सकाळ-संध्याकाळ स्त्रीने दूध पिण्याची आवश्यकता असते. गर्भस्थ बाळाची वाढ होत असताना गर्भवती स्त्रीने पिरपूर्ण आहार घेण्याची गरज असते. गर्भवती महिलेचे वजन तिच्या नेहमीच्या वजनापेक्षा पुरेसे जास्त असायला हवे, असा सल्ला डॉक्टर देतात. बाळंतपणानंतर नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेऊन महिलेचे वजन पूर्वपदावर येऊ शकते.


जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments