Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सफरचंदाचे फायदे…

वेबदुनिया
WD
इंग्रजीत एक सुप्रसिद्ध म्हण आहे, ‘An Apple keeps doctor away’ अर्थात ‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरला दूर ठेवता येते’ आणि हे खरेही आहे. हे कित्येकांना ठावूक असले तरीही सफरचंद खाण्याचे नेमके फायदे आणि त्यातील गुण खालीलप्रमाणे,

१) एनिमिया पासून बचाव :- सफरचंद मध्ये मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असल्याने एनिमिया सारख्या आजारावर ते रामबन इलाज ठरले आहे. रोज २-३ सफरचंदे खाल्ल्यास शरीराची संपूर्ण दिवसाची लोहाची गरज पूर्ण होते.

२) कॅन्सर चा धोका कमी होतो :- सफरचंदमधील क्वरसिटीन पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वचविते. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

३) मधुमेहापासून बचाव :- सफरचंदमधील ‘पेक्टिन’ जे शरीरातील ग्लाक्ट्रॉनिक आम्लाची ची गरज पूर्ण करते आणि इन्सुलिनचा वापर करणेही कमी करते.

४) पचनक्रियेस मदत करते :- सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असते जे पचनशक्ती वाढण्यास मदत करते. सफरचंद जर त्याच्या सालीसह खाल्ले तर त्यामुळे कफहि बरे होतात.

WD
५) कोलेस्ट्रॉल :- सफरचंद मध्ये विरघळू शकणारे फायबर असते जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते.

६) वजनावर नियंत्रित ठेवते :- स्वास्थविषयक बर्याच तक्रारी वाढलेले वजन आणि स्थूलपणामुळे संभवतात, जसे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह. सफरचंदमध्ये आढळणारे फायबर वजन कमी करण्यास मदत करते.

७) रोगप्रतिकारक शक्ती वाढविते :- लाल सफरचंदातील क्वरसीटीन नामक एन्टीऑक्सिडेंट असते. नुकत्याच लागलेल्या संशोधनानुसार क्वरसीटीन रोगप्रतिकारक क्षमता चांगली राखण्यास मदत करते.

८) लिव्हर मजबूत करते :- आपण रोजच्या जीवनात थोडेतरी विषयुक्त पदार्थ खातो. खाल्लेल्या अन्नातील विष नाहीसे करण्याचे काम लिव्हर म्हणजेच यकृत करत असते. आणि ह्याच लिव्हरला मजबूत करण्यासाठी रोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे कारण त्यात मोठ्या प्रमाणात एन्टीऑक्सिडेंट असतात.

९) दात निरोगी ठेवते:- सफरचंद मध्ये फायबर असल्याने दात चांगले राहतात. यात एन्टीव्हायरल प्रॉपर्टीज असतात ज्या किटाणू आणि विषाणूपासून दूर ठेवतात. तसेच तोंडातील लाळेचे प्रमाणही वाढवितात.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

Show comments