Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सी फूड खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका कमी

वेबदुनिया
सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण कमी असतं यामुळंच टाईप-2 मधुमेह होण्याचा धोका कम ी असतो.

अनेक लोकांना सी फूड खाणं खूप पसंत असतं. एका नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला की, सी फूडचे सेवन केल्यानं निरोगी राहण्यासोबत टाईप-2 मधुमेह सारख्या आजारालाही टाळता येतं. जर तुम्हाला सी फूड खाणं पसंत असेल तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आनंदी करू शकते. अथेन्स विद्यापीठानं नुकतंच एक नवं संशोधन केलंय. सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांची मात्रा कमी असते. त्यामुळं सी फूड खाणारी व्यक्ती, टाईप-2 मधुमेहापासून वाचू शकते, असा निष्कर्ष या संशोधनातून स्पष्ट झालंय. अथेन्स विद्यापीठाच्या संशोधकांनी 11 वर्षापर्यंत जवळपास 23,000 लोकांवर याची पडताळणी केली. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. संशोधनात सहभागी झालेल्या लोकांकडून एक प्रश्नावली भरण्यात आली होती. या प्रश्नावलीत आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीची माहिती सांगायची होती. ज्या लोकांनी नियमित सी फूडचे सेवन करत असल्याचं सांगितलं, त्यांच्या शरीरात चरबीचं प्रमाण जास्त आढळलं नाही आणि यामुळ ं त्यांच्यामध्ये टाईप-2 मधुमेहाचा धोका कमी होता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments