Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, कात शरीरासाठी फायदेशीर आहे

Webdunia
शनिवार, 9 जानेवारी 2021 (15:59 IST)
पान खाण्याची सवय असणाऱ्यांना कात शिवाय पान खाणं शक्य नाही. कात शिवाय पान कधीही चांगली चव देऊ शकत नाही. पण पानात घालणाऱ्या कातच्या फायद्या विषयी ऐकले आहे का? जर नाही तर आज आम्ही सांगत आहोत पानाच्या कातच्या विषयी माहिती. पानात वापरला जाणारा कात तपकिरी रंगाचा असतो. जो औषधी गुणधर्माचा आहे. ह्याच्या नियमितपणे सेवन केल्याने अनेक रोग नाहीसे होतात. चला तर मग ह्याचे फायदे जाणून घेऊ या.
 
* दातांचे आजार दूर करत -
कातचे नियमित सेवन केल्याने दाताचे आजार दूर करू शकता. या साठी कात मंजनेत मिसळून दात आणि हिरड्यांना नियमितपणे  स्वच्छ केल्याने दाताचे सर्व आजार नाहीसे होतात. ह्याचा वापर करताना लक्षात ठेवा की हे मंजन मध्ये जास्त मिसळायचे नसून फक्त अर्ध्या चिमूटभर घ्यावयाचे आहे.
 
* तोंडाचे छाले दूर करत -
बऱ्याच वेळा काही लोक तोंडाच्या छाल्यापासून त्रासलेले असतात, तर काही लोक पान खाण्याचा सल्ला देतात. त्यांच्या म्हणण्याचे अर्थ असे असतात की जेव्हा देखील आपण पानाचे सेवन कराल त्या मध्ये कात आवर्जून लावावे आणि मगच त्या पानाचे सेवन करावं. असं एक किंवा दोन वेळा केल्यानं तोंडातील छाले नाहीसे होतात.
 
* करपट ढेकर दूर होते  -
आता कळलेच असणार की कात किती फायदेशीर आहे. जर आपण करपट ढेकर येण्यापासून त्रासलेले असाल तर ते दूर करण्यासाठी आपण कात चा वापर करू शकता. या साठी आपण सकाळ संध्याकाळ एक ते दोन चमचे गरम पाण्यात कातची भुकटी मिसळून सेवन करा. या मुळे करपट ढेकर ची समस्या दूर होईल.
 
* घशात खवखव होणे -
जर आपण बदलत्या हवामानामुळे घशात होणाऱ्या खव-खव मुळे त्रासलेले असाल, तर त्याला दूर करण्यासाठी कात वापरू शकता. या साठी आपण कातची भुकटीला गरम पाण्यात मिसळून किंवा कातची भुकटी चघळून घशातील खवखव दूर करू शकता. बरेच लोक हे सर्दी-पडसं साठी एक प्रभावी औषध मानतात.
 
कात काय आहे आणि कसं बनतं?
कात खैर नावाच्या झाडापासून निघालेल्या लाकडाने मिळतो. हे एक औषधी झाड आहे. असे म्हणतात की आयुर्वेदात विविध प्रकारचे औषध बनविण्यासाठी कातचा वापर करतात. खैरच्या लाकडापासून निघालेल्या रसाला घट्ट करून हे बनविले जाते. हे पानात लावण्याच्या शिवाय हिरड्यांची सूज, वेदना आणि तोंडाचे छाले सारख्या त्रासाला दूर करण्यासाठी ह्याचा वापर करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

तुमच्या आयुष्यासाठी योग निद्रा का महत्त्वाची आहे, जाणून घ्या त्याचे फायदे

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

पुढील लेख
Show comments