Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Home Remedies : पोटाच्या विकारावर गुण देणारी - बडीशेप

Webdunia
- रात्रभर पाण्यामध्ये एक मोठा चमचा बडीशेप भिजत ठेवावी. सकाळी ते पाणी प्यावं. त्यामुळे लघवीचा दाह कमी होतो. लघवीचा रंग सफेद होतो. 
- गोड, उष्ण, कफवातनाशक गुणधर्माची बडीशेप अत्यंत सुगंधी आणि रुचकर आहे.
- भोजनानंतर चिमूटभर बडीशेप तशीच किंवा विड्यात मिसळून खायचा आपला प्रघात आहे. 
- कोरडा खोकला किंवा तोंड आलं असेल तर बडीशेप चावून तोंडात धरावी. 
- उन्हामुळे डोकं दुखत असेल तर बडीशेप वाटून डोक्यावर त्याचा लेप लावावा. 
- मासिक पाळीच्या वेळी बर्‍याच स्त्रियांना पोटदुखी होते. सकाळ, संध्याकाळ १/१ चमचा बडीशेप खाल्ल्यानं पोटदुखी थांबते. 
- बडीशेप खाल्ल्यानं पोटातील मुरडा कमी होतो. 
- लहान मुलांना पोटदुखी, पोटफुगी, पातळ शौचास होत असेल तर बडीशेप भिजवलेलं पाणी द्यावं. 
- लहान मुलांना अजीर्ण, अपचनामुळे पोटात मुरडा मारतो आणि मूल रडू लागते. त्यावर ‘ग्राईप वॉटर’ हे पोटातील मुरडा थांबवणारे औषध द्यायची पद्धत आहे. यामध्ये बडीशेपेचा अर्क असतो. 
- १ चमचा बडीशेप पावडर, तेवढीच सुंठ पावडर गरम पाण्यासह रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास शौचास चिकट आव पडायची थांबते. पचन सुधारते. 
- बडीशेपेपासून काढलेले तेल औषधात वापरतात.
- तापातून नुकत्याच उठलेल्या पेशंटच्या तोंडाला चव नसणं, अन्नावरची वासना उडणं या तक्रारी असतात. त्यांना बडीशेप वरचे वर कोमट पाण्यासह खायला द्यावी. भूक लागते. 
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Health Tips: प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

कोणते योगासन कानांसाठी योग्य आहे जाणून घ्या

Winter Special Recipe : हे दोन सूप नक्की ट्राय करा

इस्ट्रोजेन संतुलित करण्याचे 5 प्रभावी मार्ग जाणून घ्या

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments