Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तोंड, ओठ आणि दातांच्या रोगावर घरगुती उपाय

Webdunia
सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (18:42 IST)
तोंडातील फोड/तोंड येणे/तोंडातले छाले  
* तोंडात छाले झाल्यास ज्येष्ठमधाची काडी चघळावी. 

* कथ्याबरोबर पेरुची पाने चावल्याने छाले बरे होतात. 

* जिभेवर छाले झाल्यास एक केळ गाईच्या दुधाबरोबर खावे. काही दिवस घेतल्यास छाले बरे होतात.

हिरड्यांतून रक्त येणे : 
* मीठ, हळद आणि तुरटी समप्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण करून घ्यावे. या चूर्णाने मंजन करावे. फार गार किंवा फार थंड पेय घेऊ नये.गाजर, सफरचंद, आवळा यासारखी फळे खावीत.
 
दात हलणे : 
* तिळाच्या तेलात काळे मीठ वाटून हिरड्यांवर चोळल्याने दात हलायचे बंद होतात.

दात दुखणे : 
* दात दुखल्यास थोडासा कापूर दुखणाऱ्या दाताखाली ठेवून दाबावे. दाढेत खड्डा असेल तर त्यात भरून घ्यावे. वेदना बंद होतील. 

* दातदुखी असल्यास कच्च्या पपईचे दूध, थोडेस हिंग आणि कापूर मिसळून कापसाच्या बोळ्याला दुखणाऱ्या दाताखाली ठेवून दाबावे. 

* लिंबाचा पाला घेऊन त्याचा रस ज्या बाजूची दाढ दुखत असेल त्या बाजूच्या कानात दोन थेंब टाकावे. लगेच आराम येतो.

पायरिया : 
* आंब्याच्या कोयीच्या गराचे बारीक चूर्ण करून त्याने मंजन केल्याने पायरिया बरा होतो. 

* लिंबाची फांदी पानांसकट सावलीत वाळवायवी आणि जाळून बारीक वाटून घ्यावी.त्यात काही लवंग, पिपरेंट आणि मीठ मिसळावे. सकाळ-सायंकाळ या चूर्णाने मंजन केल्याने पायरिया बरा होतो. 
 
तोंडात किंवा श्वासात दुर्गंधी.
* जेवण झाल्यानंतर दोन्हीवेळा चमचाभर बडीशेप चघळल्याने तोंडाचा वास काही दिवसात जातो आणि पाचनक्रिया पण सुधारते.

* तुळशीची चार पाने रोज खाऊन वरून पाणी प्यायलाने तोंडाचा वास जातो. 

* एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्या पाण्याने रोज सकाळी चुळ भरल्यास, तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. 
जेवणानंतर एक लवंग चघळल्याने तोंडाचा वास जातो. 
 
तोंडातली चव जाणे :
* एक लिंबू कापून त्याच्या अर्ध्या फोडीत दोन चिमूट काळे मीठ व मिरिपूड शिंपडून लिंबाला आगीत थोडे गरम करावे.नंतर तो लिंबू चोखल्याने जिभेचा कडवटपणा जाऊन जिभेला चव येते व अपचन आणि गॅसेस पण बरे होतात. 
 
* तोंडात कडवटपणा असेल तर डाळिंबाची साल पाण्यात उकळवून त्यात थोडी बडीशेप टाकून चुळ भरावी . 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Tuesday Born Baby Names मंगळवारी जन्मलेल्या मुलांसाठी शुभ नावे

हिवाळा विशेष : चिकन सूप बनवण्याची सोप्पी पद्धत

वाट पाहणारं दार

वयानुसार दररोज किती मिनिटे चालावे?

Constitution Day 2024 संविधान दिन कधी आणि का साजरा केला जातो?

पुढील लेख
Show comments