Festival Posters

पोट दुखत आहे, डोंटवरी हे घरगुती उपाय करून पहा

Webdunia
शनिवार, 9 मार्च 2019 (11:29 IST)
पोट दुखीचा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत -
 
दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल. 
 
जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते. 
 
अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एकत्र करून थंड पाण्यासोबत घेतल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते.
 
अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसे पादरे मीठ टाकून प्यायल्याने पोट दुखी थांबते. 
 
बिना दूधाचा चहा (कोरा चहा) प्यायल्यानेदेखील पोट दुखणे थांबते. त्यात थोडा लिंबाचा रस टाकल्यास लवकर असर होतो. 
 
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा एकत्र करून प्यायल्याने पोट दुखी लगेच थांबते
 
चांगल्या प्रकारे शिजलेले तांदूळ एका कॉटनच्या कपड्यात बांधून शेकल्यास पोट दुखी थांबते.
 
एक ग्लास पाण्यामध्ये थोडासा गोड सोडा टाकून प्यायल्याने पोट दुखणे थांबते.
 
सुंठ, जीरा आणि काळी मिरी सम प्रमाणात घेवून त्याचे चूर्ण बनवून घ्यावे. गरम पाण्यासोबत एक चमचा हे चुर्ण घेतल्याने पोट दुखणे थांबते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

काही मिनिटांत बनवा स्वादिष्ट असे सँडविचचे प्रकार; लिहून घ्या रेसिपी

दररोज सकाळी उठल्याबरोबर हे करा, वजन नियंत्रित होईल

दिल्ली सरकारी विभागांमध्ये रिक्त असलेल्या मल्टी-टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती सुरू

हिवाळ्यातही तुमचे हात मऊ राहतील, फक्त या सोप्या टिप्स अवलंबवा

ही लक्षणे शरीरात पोषणाची कमतरता दर्शवतात, दुर्लक्ष करू नका

पुढील लेख
Show comments