Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुणसंपन्न बोर

Webdunia
 शास्त्रीय नाव : Ziziphus mauritiana / Ziziphus jujube
इंग्रजी नाव : Jujube / red date
स्थानिक नाव बोर
 
बोर सर्वांच्याच परिचयाचे असते. मात्र त्याचे झाड फारच कमी लोकांनी पाहिलेले असते. झुडुपवजा दिसणारे हे झाड काही ठिकाणी १० मीटरपर्यंत उंच वाढलेले दिसून येते. माळरानावर दिसणारे हे झाड पानगळीच्या वनात देखील दिसते. बोराचे शास्त्रीय नाव Ziziphus mauritiana / Ziziphus jujube असे आहे. बोराच्या झाडासारखे दिसणारे तोरण (वेल) हे आर्द्र पानगळीच्या निमसदाहरित झाडासारखे वनात दिसून येते. जंगलात गेल्यावर बोर हे झाड ओळखायचे असेल तर त्याची वरुन हिरवी असलेली आणि खालच्या बाजूने पांढरट चंदेरी रंगअसलेली पाने ही उपयुक्त खूण ठरु शकते. पानाला मुख्य तीन शिरा ठळकपणे दिसतात. पानाजवळ छोटे काटे असतात. क्वचित जोडीने येणारे काटे कधी कधी वळलेले असतात. त्यामुळे शेळ्यांना पाने खायला अडथळा येऊ शकतो. पिवळसर पांढर्‍या बारक्या (२-४ सेंमी) फुलांमुळे पावसाळ्यात हे झाड काटेरी असूनदेखील अतिशय आकर्षक दिसते. बर्‍याचवेळा फूले फूलण्याचा काळ भौगोलिक परिस्थितीमुळे थोडा बदललेला दिसतो. बोराची फळे गोलसर असतात. पिकल्यावर ती पिवळ्या-गडद बदामी रंगाची दिसतात. 
 
बोराच्या झाडावर छोट्या पिवळ्या, राखाडी चिमण्यांची घरटी दिसून येतात. पहीरीच्या काठावर असणार्‍या बोराच्या झाडावर १०-१५ च्या संख्येने सुगरणीची घरटी आढळून येतात. झाडांच्या पानावर कॉमन पिरो, कॉमन सिल्व्हरलाईन फुलपाखराच्या अळ्या आढळून येतात. पक्षी, फुलपाखरांकरीता उपयुक्त असणार्‍या या झाडाच्या लाकडाचा उपयोग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची अवजारे बनविण्याकरीता केला जातो. जळाऊ लाकूड म्हणून तर सर्रास उपयोग केला जातो. आयुर्वेदात बोराचे मूळ, फळ, फुलं, औषधे बनविण्याकरीता वापरले जाते. फळे पौष्टिक असून त्यापासून चविष्ट लोणचे करता येते.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments