Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंडित जवाहरलाल नेहरू

वेबदुनिया
NDND
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि सहा वेळा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेल्या पंडित नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये एका सुखवस्तू कुटुंबात झाला.

हॅरो व केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर १९१२ मध्ये नेहरूंनी बॅरिस्टर ही पदवी घेतली. पण भारतात परतल्यानंतर काय करायचे असा संभ्रम त्यांना पडला होता. त्यावेळी त्यांना गांधीजी भेटले. त्यांनी दिलेल्या गुरूमंत्राने नेहरूंच्या विचारांची दिशाच बदलली. वडिलांची चांगली चाललेली प्रॅक्टिस त्यांना वारसा म्हणून मिळत होती. मात्र, नेहरूंनी त्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली.

१९१२ मध्ये ते कॉंग्रेसशी जोडले गेले. १९२० मध्ये प्रतापगड येथे शेतकर्‍यांचा मोर्चा त्यांनी काढला. १९२८ मध्ये सायमन कमिशनविरोधात निदर्शने करताना ते जखमी झाले. १९३० मध्ये मीठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक करण्यात आली. सहा महिने ते तुरूंगात होते. १९३५ मध्ये अल्मोडा तुरूंगात असताना त्यांनी आत्मचरित्र लिहिले. आयुष्यात एकूण नऊ वेळा ते तुरूंगात गेले.

ND
१९४२ मध्ये मुंबईत कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांनी जोरदार भाषण केले. त्याचवेळी गांधीजींना करा वा मरा चा नारा दिला. दुसर्‍याच दिवशी नेहरूंसह सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी नेहरूंसह काही नेत्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते. तेथेच नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला.

पुढे स्वातंत्र्य आंदोलन यशस्वी ठरून देश स्वातंत्र्य होताच, पंतप्रधानपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली. २७ मे १९६४ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते त्या पदावर होते. लोकशाहीला मजबूत करणे, देश आणि घटनेतील धर्मनिरपेक्ष छबी प्रस्थापित करणे आणि भारताच्या विकासात दीर्घकालीन फायद्याच्या ठरतील अशा योजना राबविणे हे त्यांच्या कार्यकाळाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

NDND
त्यांच्या सुरवात ते १९२२ मध्ये अलाहाबाद म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष झाले तेव्हाच झाली होती. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतीच त्यांनी अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग त्यांनी देशाच्या विकासासाठी केला.

स्वातंत्र्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्व जगभरात झळाळून उठले. ते फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय नेता बनले. तटस्थ देशांची चळवळ त्यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन झाली.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments