Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफलातून आधुनिक म्हणी

Webdunia
बाबा आजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीन म्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-
 
१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर!
२) सासू क्लबमध्ये सून पबमध्ये!
३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन!
४) मुलं करतात चॅनेल सर्फ, आईबाप करतात होमवर्क!
५) चुकली मुलं सायबरकॅफेत!
६) चुकल्या मुली ब्यूटीपार्लरमध्ये!
७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार!
८) नाजुक मानेला मोबाइलचा आधार!
९) मनोरंजन नको रिंगटोन आवर!
१०) स्क्रीनपेक्षा एस एम एस मोठा!
११) जागा लहान फर्निचर महान!
१२) उचलला मोबाईल लावला कानाला!
१३) रिकाम्या पेपरला जाहिरातींचा आधार!
१४) काटकसर करून जमवलं, इन्कम टॅक्समध्ये गमावलं
१५) साधुसंत येती घरा, दारं खिडक्या बंद करा!
१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी
१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण!
१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी!
१९) चोऱ्या करून थकला आणि शेवटी आमदार झाला
२०) आपले पक्षांतर, दुसऱ्यांचा फुटीरपणा!
२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे!
२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा!
२३) जया अंगी खोटेपण, त्या मिळे मोठेपण!
२४) एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो!
२५) सरकार जेवू घालीना, पदवी भीक मागू देईना 
२६) वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यू कशाला!
२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहिले दाखले!
२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे!
२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता!
३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता!
३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार!
३२) मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका!
३३) न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!
३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा!
३५) पुढाऱ्यांचं मूळ व हॉटेलची चूल पाहू नये!
३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही!
३७) नाव गंगूबाई, अंघोळीला पाणी नाही!
३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा!
३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल!
४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही!
४१) रिकामा माळी ढेकळं फोडी!
४२) घरोघरी मॉडर्न पोरी!
४३) ओठापेक्षा लिपस्टिक जड!
४४) नाकापेक्षा चष्मा जड!
४५) अपुऱ्या कपड्याला फॅशनचा आधार!
४६) बायकोची धाव माहेरापर्यंत!
४७) गोष्ट एक चित्रपट अनेक!
४८) काम कमी फाइली फार!
४९) लाच घे पण जाच आवर!
५०) मंत्र्याच पोर गावाला घोर!
५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे!
५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे!
५३) मिळवत्या मुलीला मागणी फार!
५४) रिकामी मुलगी शृंगार करी!
५५) प्रेमात पडला हुंड्यास मुकला!
५६) दुरून पाहुणे साजरे!
५७) ऑफिसात प्यून शहाणा!
५८) सत्ता नको पण खैरनार आवर!
५९) एक ना धड भाराभर पक्ष!
६०) हरावे परी डिपॉझिटरूपी उरावे!
६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे!
६२) तोंडाला पदर गावाला गजर!
६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं!
६४) रात्र थोडी डास फार!
६५) शिर सलामात तो रोज हजामत!
६६) नेता छोठा कटआऊट मोठा!
६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!
६८) दैव देते आयकर नेत!
६९) डिग्री लहान वशिला महान!

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments