Publish Date: Mon, 27 Mar 2023 (12:37 IST)
Updated Date: Mon, 27 Mar 2023 (13:45 IST)
आयुष्यातील
त्यादिवशी बायकोकडे
काळजीपूर्वक
बघितले अन् लक्षात आले
फक्त हीच गुंतवणूक पाहता पाहता डबल झाली
नवरा :- वकीलसाहेब. मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे..
गेले सहा महिने माझी बायको
माझ्याशी एक… शब्दसुद्धा बोलली नाही..
वकील :- परत एकदा विचार करा
एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही.
बायको कटकट करायला लागली की बायकोच्या
फोनवरून गुपचूप तिच्या आईला किंवा
बहिणीला मिसकॉल मारायचा.
लगेच कॉल येईल तासभर तरी कटकट बंद!
बायको समजा, मी हरवले तर
तुम्ही काय कराल?
नवरा : पेपर मध्ये जाहिरात देईन…
बायको :ओsss माझ्या शोन्या…
काय लिहिणार त्यात?
नवरा : जो परत आणून देईल
त्याच्याकडुन 20000/-२ दंड घेण्यात येईल!