Dharma Sangrah

सासूने वैतागून केलेली कविता

Webdunia
पाया पडते सूनबाई 
बंद कर तुझी चाल 
पहिलं तुझं व्हॉट्सअॅप चुली मधी जाळ
 
रोज नवीन नवीन ड्रेस
नवं काढतीस फोटू 
रडून रडून उपाशीच
झोपून घेतो छोटू
 
डिपी का फीपी बदलण्याच्या नादात,
करपून जाते डाळ
पहिलं तुझं व्हॉट्सअॅप चुली मधी जाळ
 
लगीन झालंय आपलं
शहाण्या सारखं वागावं
चार दिसाचं सासू सासरं
 
तोंड भरून बोलावं
आम्ही मरून गेल्यावर
बस वाजवीत टाळ
पहिलं तुझं व्हॉट्सअॅप चुली मधी जाळ
 
रोज एक मेनू बनवतेस
वाजवतेस झोपायला बारा
पुलाव असतो चांगला
पण त्यात दगड अन् गारा
 
टून्ग टून्ग वाजतो फोन
पोरी लक्ष थोडं टाळ
पहिलं तुझं व्हॉट्सअॅप चुली मधी जाळ
 
डोळ्याला लागलं चष्मा
अंगठा होईल बाद
खरंच सांगते सूनबाई
ह्यो चांगला नाय नाद
 
मान्य हाय दुनिया चंद्रावर गेली
पण मान मर्यादा पाळ
न्यातर पोटातूनच
नेटपॅक माराय सांगल बाळ
 
पाया पडते सूनबाई
व्हॉट्सअॅप चुली मधी जाळ 
चुली मधी जाळ
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

फराह खानने दीपिका पदुकोण, मलाईका पासून गीता कपूर पर्यंत सर्वांना स्टार बनवले

सलमान खानच्या गाडीत गणेशमूर्ती दिसली, चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली

Pawna Lake लोणावळ्याजवळील अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ

फातिमा सना शेखने बिकिनी घालून तलावात उडी मारली, चाहत्यांसोबत तिचा अनुभव शेअर केला; व्हिडिओ व्हायरल

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

पुढील लेख
Show comments