Dharma Sangrah

Whatsapp Message : दोघे

Webdunia
मुलगी आमची युरोपात असते 
आणि मुलगा यूएस मध्ये असतो 
इथे मात्र आम्ही दोघेच असतो 
 
जावई मुलासारखा वागतो 
सुनेतही मुलीचाच भास होतो 
इकडे या इकडेच  या 
दोघांचाही आग्रहच असतो 
इथे मात्र आम्ही दोघेच असतो !
 
हिचं महिला मंडळ आहे 
दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो 
मला कसलीच आवड नाही 
मी एकटाच घरी बसतो 
कारण आम्ही दोघेच असतो !
 
संध्याकाळी ती सिरीयल बघते 
आणि मी फिरायला जातो 
बिल्डिंगमागे सूर्य डुबतो 
मग मी आपसूक घरी येतो 
कारण आम्ही दोघेच असतो !
 
एकदा मुलाचा फोन येतो 
एकदा मुलीचा फोन येतो 
काळजीनं चौकशी करतात 
आमचाही उर भरून येतो 
कारण आम्ही दोघेच असतो !
 
नव्या नवलाईन जाऊनही आलो 
स्वच्छ सुंदर सगळं पाहूनही आलो 
पण ते सगळं मात्र तेवढंच 
काही म्हणा, तिकडं जीव गुदमरतो 
कारण आम्ही  दोघेच असतो !
 
नाही तक्रार नाही कसलीच इथे 
आणि नाही कसली तक्रार तिथे 
नाही कसली अडचण सुखाची 
पण इथली सगळी वर्षे आठवतो 
कारण आम्ही दोघेच असतो !
 
भांडण तंटे आमचे खूप होतात 
नसते तिला स्मरण नि मला आठवण 
खरे तर काहीच नसते वादाचे कारण 
मग आम्हीच आम्हाला समजावतो 
कारण आम्ही दोघेच असतो !
 
खरोखर तिला कवठी चाफा आवडतो 
तो एकाच फुलवाल्याकडे मिळतो 
नेहमीच तो मिळतो असे नाही 
पण तो आला कि मी नक्की आणतो 
कारण आम्ही दोघेच असतो ! 
 
हल्ली कधी कधी ती भावुक होते 
तुमच्याआधी मला जायचंय म्हणते 
मग मी म्हणतो, माझे कसे होणार ? 
म्हणते कशी, तुम्ही असेच स्वार्थी ! 
मी जाणार त्याचे काहीच नाही 
काळजी काय, तर माझे कसे होणार ?
लुटुपुटुचे असते हे तिचे नि माझे 
यावर तीही मग हसते नि मीही हसतो 
कारण आम्ही दोघेच असतो ! 
कारण आम्ही दोघेच असतो !!
 
-सुनील गोडसे
सर्व पहा

नक्की वाचा

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

सर्व पहा

नवीन

मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे अडकला लग्न बंधनात

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026: 16 वर्षीय ओवेन कूपरने रचला इतिहास, पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

या कारणामुळे अमरीश पुरी यांनी हॉलिवूड चित्रपटांचे ऑफर नाकारले

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

दुष्टाचा नाश करण्यासाठी राणी मुखर्जी परत येणार, मर्दानी 3 च्या रिलीजची तारीख जाहीर

पुढील लेख
Show comments