Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शून्यातून विश्व का विश्वातून शून्य....!!!!

Webdunia
शून्यातून विश्व का विश्वातून शून्य....!!!!
 
टू रुम किचन चा एखादा फ्लॅट , 
दोन चार एकर चे फार्म हाऊस,
एखादी चार चाकी गाडी आणि
भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं ,
की आपण म्हणतो , 
 
अमक्या- तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं !!
 
म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतो, पण सुखी काही दिसत नाही!
 
आपणचं म्हणतो की, आमच्या लहानपणी खूप मजा यायची.
 
खूप करमायचं, घर भरलेलं असायचं.
 
दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही.!
 
मग आता काय झालं ???
 
मजा कुठ गेली ??
 
एकटं एकटं का वाटत ??
 
छातीत धडधड का होते ??
 
कशामुळे करमत नाही ...??
 
कारण......
 
"विश्व निर्माण करण्याची " व्याख्या 
कुठेतरी चुकली.!
 
विश्व निर्माण करणं म्हणजे.
 
नाती गोती जपणं
 
छंद जोपासणं
 
पाहुणे होऊन जाणं
 
पाहुण्यांचे स्वागत करणं
 
खूप गप्पा मारणं 
 
घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं 
 
खळखळून हसणं 
 
आणि...
 
काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडणं !
 
या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर 
 
" शून्यातून विश्व निर्माण केलं " असं म्हणावं .
 
तुम्हीच सांगा , 
 
आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली  की घट झाली .....???
 
तुमचं खर दुःख तुम्ही मोकळेपणाने 
किती जणांना सांगू शकता ????
 
असे किती मित्र, शेजारी, नातेवाईक
आपण निर्माण करू शकलो...????
 
खूप कमी, किंबहुना नाहीच.. !!!
 
मग आपण " विश्व निर्माण " केलं का ??
 
तर नाही.... 
 
मित्र हो, 
 
रजिस्ट्री च्या कागदाच्या फायली म्हणजे
विश्व...????
 
भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व ?
 
नाही....!
 
लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व.....????
 
मुखवटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व......????
 
नाही !! 
 
हे समजून घ्यावं लागेल ....!!!
 
मोठं बनण्याच्या  दडपणा मुळे आणि मग कामाच्या व्यापा मुळे नाती दूर जाणार असतील,
इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि 
अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील.
 
दुःख सांगायला, मन हलकं करायला जागाच उरणार नसेल....
तर.....
 
आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं ,
 
की...
 
विश्वातून शून्य.... ?????
( पु लं च्या एका‌ संग्रहातून )

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments