Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"Priority माणसांची"

Webdunia
'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. काही वेळा ह्या वाक्यामागे खरं कारण असतं तर काही वेळा ती गोष्ट टाळायची म्हणून घेतलेला हा stance असतो. असं का होतं ह्याचा विचार केला तर लक्षात येते की आपल्या priorities ठरलेल्या असतात, त्यात जास्त फेरफार आपल्याला झेपत नाही.
 
माझी आई नेहेमी सांगायची की बाकी कशाला सवड काढ नाही तर काढू नको पण आपल्या सणावारांना, देवासमोर निवांत दिवा लावण्यासाठी, मुलांच्या शाळेतील शिक्षक पालक मीटिंगला, कुटुंबीयांच्या वाढदिवसाला, स्वतःच्या तब्येतीसाठी, मैत्रिणींबरोबर मज्जा करण्यासाठी, नक्की वेळ काढ.
 
मला काही सगळ पटायचं नाही. मी म्हणायचे, आई कामासाठी वेळ नको का? तर आई हसून सांगायची, महिन्याचा पगार मिळेल, बढती मिळेल म्हणून तू रोजच अगदी नेटाने काम करतेस ग पण नात्यांचे काय, आपल्या सांस्कृतिक विचारांचे काय? त्यासाठी वेळ काढावाच लागेल नाहीतर आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा एकटी घरात असशील तेव्हा कोण असणार आहे?
 
नातेवाईकांकडे कधी गेली नाहीस, मैत्रिणींना कधी घरी बोलावले नाहीस, स्वतः गेली नाहीस, मग तुझ्या उतरत्या काळात त्या येतील अशी अपेक्षा करु नकोस! आपण माणसे इतकी स्वार्थी असतो की काही न देता आपल्याला समोरच्याकडून मात्र भरपूर अपेक्षा असतात आणि अपेक्षाभंग झाला तर वाईटही वाटते.
 
आईला म्हंटल तू एवढी psychology कधी शिकलीस ग? ती हसली आणि म्हणाली, आयुष्य जेवढं शिकवतं तेवढं तुमच्या एमबीए मध्ये पण नाही शिकवत.. तेव्हा माणसांना आधी priority दे तरच आयुष्यात सुखी आणि समाधानी राहशील.
 
- प्राजक्तं  

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments