rashifal-2026

परमेश्वर सर्व श्रीमंतांना बुध्दीदेवो

Webdunia
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (12:25 IST)
शरद पोंक्षे ह्यांचा लेख..
 
आज नोटांसाठी किती वेगवेगळ्या 
पातळ्यांवर धावाधाव चाललेय.
बँकांच्या समोर मोठ्या रांगा.
सामान्य माणसं साधी भाजी खरेदी करायला 
१०० ची नोट नाही म्हणुन त्रस्त.
तर करोडो रुपयांच्या 
रद्दीच काय करायचं? 
म्हणुन श्रीमंत त्रस्त.
किती गंमत आहे.
अजुनही लक्षात येत नाही आपल्याला 
कि किती व काय जमवायचं?
कशासाठी जमवायंच? 
कोणासाठी जमवायचं?
सगळच अशाश्वत आहे.
एकाक्षणात होत्याचं नव्हत होऊन जात.
सगळ्याच बाबतीत.
पैसा.वस्तु.किंवा माणुस.
पंधरा दिवसापुर्वी अश्विनी गेली.
असंच एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
८.१५ ला होती ८.३० ला जगातुनच निघुन गेली.
परवा पैशांचंही तसच.
काही लोकं ११.५५ ला रात्री अब्जाधीश होते.
१२.०१ मि.ला वरची फक्त शुन्य शिल्लक राहीली.
किती नश्वर आहे सगळंच.
तरीही आपण अडकत राहतो.
सतत प्रत्येक गोष्टीत.
आता नविन नोटा येतिल.
नाही नाही म्हणत लोक त्याही जमवतील.
मग हळु हळु नकळत 
त्या नोटांवर प्रेम करायला लागतील.
मग परत त्या नोटांच्या जीवावर माज करतील.
मग हा प्रसंग विसरुन जातील.
मग पुन्हा एखादे मोदी येतिल 
पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होईल.
पुन्हा करोडो रुपये मातीत जातील.
पण हे विचार येत नाही.
की पैसे मातित घालण्यापेक्षा गरीबाला द्यावेत हजारो माणसांचे प्रश्न पैशावाचुन अडतात त्यांना द्यावे.
पण नाही.
सडले तरी चालतील पण गरीबाला मदत करणार नाहीत.त्याचे आशिर्वाद घेणार नाहीत.तर त्याला लुबाडुन त्याचे शाप घेतील.पण नोटा जमावतील.
कशी वृत्ती झालेय.
सतत जमवायचं पैसा.
जमिन.घरं.फार्म हाऊस.गाड्या.दागीने.
खरच इतकं लागतं का एका माणसाला?
बरं ते सचोटीन जमवलं तर काही हरकत नाही.
पण सचोटीनं इतकी माया जमवता येतं नाही.
मग फसवा फसवी लुट लुबाडुन घेणं.खुन मारामा-या सगळेच अवैध प्रकार करावेच लागतात.
त्रिशुल सिनेमातलं वाक्य आठवलं."
" कोई भी आदमी अमिर बननेसे पहले 
कोई ना कोई बेईमानी जरुर करता है""
खरय ते.आणि श्रीमंत कोणाला म्हणायचं? 
खुप पैसा असणा-याला?
की भरपुर गाड्या असणा-याला? 
की खुप जमिन प्रॉपर्टी असणा-याला?
पण मग हे सगळ ज्यांच्याकडे आहे ते सुखानं झोपतात? टेंशन फ्री आहेत? तर नाही.
ते सामान्यांपेक्षा जास्तच टेंशन मधे जगतात.
मग तुकाराम महाराज आठवतात.
रामदास स्वामी.ज्ञानेश्वर ही मंडळी आठवतात.
धन, धान्य,दागीने,पैसा काहीच न्हवतं पण करोडो माणस होती मागे.त्यांचे अश्रु पुसत होते ते.ती माणसं ही श्रीमंती होती.म्हणुनतर ५०० वर्षानंतरही त्यांचीच पालखी निघते.एकाही तथाकथीत श्रीमंताची निघत नाही.
पण हे संत शिकवलेच नाहीत आपल्याला.
हसत हसत फासावर केवळ देशासाठी लटकणारे क्रांतीकारक शिकवलेच नाहीत.
म्हणुन हा प्रॉब्लेम झालाय.
ह्यांचे संस्कार वेळीच झाले असते.
तर वेगळी पिढी पहायला मिळाली असती.
पण ते नाही झालं.
पैसा हेच आपल्या शिक्षणाचं अंतिम ध्येय बनवल गेलं.
त्यातुनच हा पैसा जमवायची सवय लागली.
पण अजुनही वेळ गेलेली नाही.
पालकांनी लक्ष्मी पेक्षा सरस्वतीची पुजा करायला मुलांना शिकवल पाहीजे.
सरस्वती मागोमाग लक्ष्मी येणारच.पण लक्ष्मी मागोमाग सरस्वती नाही येत.असो.
ह्यातुन काहीतरी शिकलं पाहिजे.
शिकावं.असं वाटतं.असो.
परमेश्वर सर्व श्रीमंतांना बुध्दीदेवो.
पालकांना सरस्वतीची उपासना करायला 
मुलांना शिकवण्याची बुध्दी देवो.
भारत माता की जय.
-शरद पोंक्षे.
११ नोव्हे.अर्थात २० कार्तिक १९३८
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

सर्व पहा

नवीन

जावेद अख्तर यांचे लहानपणापासूनच कवितेशी खोल नाते होते, तुम्हाला गीतकाराचे खरे नाव माहिती आहे का?

मृणाल ठाकूर आणि धनुषच्या लग्नाच्या अफवा खोट्या निघाल्या

गायक बी प्राकला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी, 10 कोटींच्या खंडणीची मागणी

दक्षिण भारतीय चित्रपटात अनिल कपूर यांची एंट्री, या सुपरस्टार सोबत दिसणार

Vasant Panchami Tourist Places वसंत पंचमीला भेट देण्यासाठी 5 सर्वोत्तम ठिकाणे

पुढील लेख
Show comments