Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलांची योगासने.....

Webdunia
महिलांची  योगासने....... 

1)  गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की,  वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे.  तो वैतागून कोपला की अश्रूपात करूनच थांबावे.  हमखास  फायदा  होतो.  
 
2) विभ्रमासन : सेल लागल्यावर करणे.  यासाठी नवरा कामावरून घरी परतल्यावर लगेच गरमागरम पोहे, आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की, सेलची लाँटरी लागलीच, समजा. 
 
3) निगरगट्टासन :  आपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला,  तर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे.  निगरगट्ट चेहरा करून थोडा वेळ श्रवणभक्ती झाली, की त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा आवाज चढवून,  त्याने पूर्वी केलेल्या  चुकांचा पाढा वाचून,  यथेच्छ वाभाडे काढावे व अबोला धरावा. असे केल्याने परत कधी कितीही चुका केल्या तरी शत्रूपक्ष मूग गिळून गप्प राहतो.
नवरयांची आसनं...

1) शवासन : हे आसन कधीही करू शकतो. 
"लोळत पडा दिवसभर अजगरासारखे" असं कानावर आलं की हे आसन संपतं.
 
2) अर्धोन्मिलित नेत्रासन : हे कामावर करण्याचे आसन आहे. धड झोपलेला नाही, जागा नाही अशी अवस्था. कुणी हाक मारली की हे आसन संपतं.

3) कर्णबंदासन : घरात पाउल ठेवलं की हे आसन बाय डिफॉल्ट चालू होतं. बायको, आपल्याला काहीही बोलली तरी तो लोट कानात शिरू द्यायचा नाही. बायको रडायची शक्यता वाटू लागली की हे आसन संपतं.
 
4) निष्पापमुखासन : अतिशय उपयुक्त आसन. खूप कष्टदायक आसन आहे. वर्षानुवर्ष अभ्यास लागतो. बरेच लोक याला बावळटमुखासन असंही म्हणतात. यावर बारीक़ लक्ष ठेवायच.

- लेखकाचा शोध चालू आहे, बायको ने पोस्ट वाचल्यापासून फरार आहे म्हणे !

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments