suvichar

नवीन व्रत

Webdunia
एक आटपाट नगर होतं तिथे एक सुंदर स्त्री रहात होती. घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती. परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती. जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव, 
या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुंताड्यात फसली. बी.पी; शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची उडाली धूळधाण...
 
तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन भेट, आणि What's app मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट काह‍ी दिवसांतच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल...

चिकटून बसलेले बी.पी; शुगर वागू लागले फॉर्मल...ती आनंदली, What's app व्रताची यशवार्ता आल्यागेल्याला सांगू लागली. तिची एक सखी निर्मळ मनाची!  ती म्हणाली, मला पण सांग ना ग, हे व्रत! उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही. स्त्री म्हणाली बघ, रोज सकाळी उठता क्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. GM, GN चा वेळोवेळी जप करावा. यथासमय देवाच्या देव्हार्‍यात डोकवावे, मनमोकळ करावे. एका ग्रुपने What's app ला वाहिलेले सर्व काही दुस-या ग्रुपला यथाशक्ती मनोभावे अर्पण करावे...
 
रुसु नये, रागवू नये, आपला ग्रुप सोडू नये...त्या सखीने मनोभावे केले व्रत आणि आश्चर्य, चारच महिन्यात मिळाले फळ..! बी.पी; शुगर कमी होऊन रडक्या मना येऊ लागले बळ. तुम्ही ही व्रत हे धरावे, कामकाज काळवेळ सांभाळूनी त्रिकाळ What's app ला पुजावे. जसा हा देव त्या दोघी सखींना पावला, तसा तुम्हास ही पावो...हे व्रत सर्व बंधु व भगिनीने करावे. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ....
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

शाहरुख खान पत्नी गौरीसोबत जेव्हा भाड्याच्या घरात राहत होता, तेव्हा तो चंकी पांडेच्या घरी हे काम करायचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

Show comments