Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जुलै महिन्याचे मासिक भविष्यफल

वेबदुनिया
WD
मेष
घरात धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. आप्तस्वकियांच्या गाठीभेटीतून आनंद मिळवाल, प्रतिष्ठीत व्यक्तींचे सहकार्य लाभेल. आपल्या वक्तव्यामुळे दुसर्‍याचे मन दुखावणार नाही काळजी घ्या. लाभातील नेपच्यून धार्मिक-आध्यात्मिक क्षेत्रात ओढा वाढविणारा राहील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. हातून पुण्यकर्म घडेल. उत्तरार्धात कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. लेखकांच्या हातून धार्मिक विषयांवर लेखन होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातून फायदेशीर घटना घडतील. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता राहते. जून्या मैत्रीला उजाळा मिळेल. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल.

वृष भ
प्रतिष्ठीत व्यक्तिच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आपल्या वाक्चातुर्याच्या जोरावर सभोवतालच्या व्यक्तींची मने जिंकून घ्याल. अनेकांशी सुसंवाद साधाल. परप्रांताशी आपले व्यावसायिक संबंध सुधारतील. परदेशस्थ भावंडांशी सुसंवाद साधाल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. महिला दैनंदिन जीवनातून विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न करतील. सहलीचे आयोजन केले जाईल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. नवीन व्यावसायिक करार होतील. महत्वाची कागदपत्रे हाती लागतील. खेळाडूंना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील.

मिथुन
गृहउद्योगातून तसेच जोडधंद्यातून कामाचा व्याप वाढवाल. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराल. साहसी निर्णय घेतले जातील. प्रतिष्ठीत व्यक्तींचे घराला पाय लागतील. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या गरजांसाठी पैसा राखून ठेवावा लागेल. दैनंदिन जीवनातन विरंगुळा मिळावा म्हणून महिला सहलीचे आयोजन करतील. भविष्यकाळाच्या दृष्टीने आर्थिक तजवीज करण्यात यश येईल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना चांगल्या संधी लाभतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

कर्क
घरात धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. मित्रपरिवारांमध्ये आर्थिक व्यवहार करणे शक्यतो टाळावे. राजकीय कार्यकर्त्यांना समाजात नावलौकीक लाभेल. गुरू-शनिचा त्रिकोण योग आपणांस शांत, संयमी बनविणारा राहील. भविष्यकाळाच्या दृष्टीने आर्थिक तजवीज करताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे.आपले तत्त्व सोडून मात्र कोणतेही काम करू नका. नाहीतर मनस्ताप होण्याची शकयता राहते. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. सूचक स्वप्ने पडतील. पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने बदल घडून येतील. १६ तारखेला आपल्या राशीच्या व्यवस्थानात असलेला रवि आपल्या राशीत प्रवेश करीत आहे. तेव्हा आपल्या राशीत प्रवेश उमटवाल.

सिंह
नवनवीन व्यावसायिक उपक्रम राबविले जातील. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना अनिश्‍चितता जाणवेल. बोलताना जिभेवर साखर पेरणी करण्याची गरज आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. प्रवासातून कार्यसिद्ध होईल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. उत्तरार्धात दिनांक १६ रोजी राशीस्वामी रवि आपल्या राशीच्या व्ययस्थानात प्रवेश करीत आहे. कोणताही महत्वाचा निर्णय घेताना अत्यंत विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून देखील त्रास होऊ शकतो.

कन्या
व्यवसायात मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाल केल्या जातील. तीर्थस्थळांना भेट देण्याचे योग येतील. हातून पुण्यकर्म घडेल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. समोर आलेल्या अडचणींमधून मार्ग काढून आपले ध्येय साध्य करता येईल. दशमस्थ रवि नोकरीत अधिकारपद प्राप्त करून देणारा राहील. आपण केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. व्यवसाय-उद्योगात नवनवीन उपक्रम राबविले जातील. भागीदारी व्यवसायात मात्र स्वत लक्ष घालण्याची गरज आहे. नाहीतर फसवणूक होऊ शकते. जोडीदाराशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. १६ तारखेला रवि आपल्या राशीच्या लाभस्थानात प्रवेश करीत आहे. प्रतिष्ठित मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल.

तूळ
व्यवसाय-उद्योगातून नवीन कार्यारंभ केले जातील. लेखक-साहित्यिक, वकील, ऑडिटर्स यांना आपापल्या क्षेत्रातून पतपतिष्ठा लाभेल, चांगल्या संधीचा लाभ घेता येईल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण व्ययातील मंगळ वाढविणारा राहील. लाभेश रवि भाग्यस्थानातून तर भाग्येश बुध दशमस्थानातून भ्रमण करीत आहे. नोकरीत अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन लाभेल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्यानं नोकरीच्या सधी लाभतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. राजकीय कार्यकर्त्यांना आपल्या क्षेत्रातून धाडसी कामे करण्यास अनुकूल ग्रहमान आहे. मात्र कोणतेही अवाजवी साहस करु नका. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. विविध व्यावसायिक उपक्रमातून लाभ घेतील.

वृश्चिक
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांतून यश लाभेल. संशोधनपर अभ्यासक्रमातून नावलौकिक मिळेल. लाभातील मंगळ-शनि धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करतील. कुसंगतिपासून दूर राहा. जून्या मैत्रीला उजाळा मिळेल. मित्रपरिवारच्या सहकार्याने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. १६ तारखेला लाभेश रवि आपल्या राशीच्या भाग्यस्थानात प्रवेश करीत आहे. नवीन व्यावसायिक करार होतील. रचनात्मक कार्यक्रमातून लाभ होतील. सरकारी परवाने मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतणुकीची पूर्तता झाल्यामुळे हाती पैसा खेळेल. आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होण्यास अनुकूल ग्रहमान राहील.

धन ु
कर्मस्थानातील मंगळ-शनि पोलिस खाते लष्कर यासारख्या क्षेत्रात काम करणार्‍या अधिकारी वर्गास अनुकूल ग्रहमान आहे. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकाराल. धाडसी निर्णघ घेतले जातील. प्रकृतीच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करुन चालणार नाही. संसर्गजन्य आजाराचा त्रास होण्याची शक्यता आहे. १६ तारखेला रवि आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून अष्टमस्थानी प्रवेश करीत आहे. जवळच्या व्यक्तिकडून घडलेल्या एखाद्या घटनेमुळे मनस्ताप होण्याची शक्यता राहते. खोट्या गोष्टी उघड होतील. कुटुंबात सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. आपली मते कुटुंबियांवर लादू नका. जमीन-जुमला तसेच वडिलोपार्जित इस्टेटीच्या व्यवहारातून फायदा होईल.

मकर
नोकरी-व्यवसायातून नवीन कल्पना आकार घेतील. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. नोकरीत पदोन्नती होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांना यश येईल. तरुणांच्या कौशल्यात चांगला वाव मिळेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेह देता येईल. आपल्या छंदांना व्यावसायिक स्वरूप देणे शक्य होईल. विरोधकांवर विजय मिळवाल. नोकरीत वरीष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. आपल्या मतांचा समाजात आदर केला जाईल. १६ तारखेला षष्ठस्थानातून सप्तमस्थानात रवि प्रवेश करीत आहे. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल.

कुंभ
मोठे आर्थिक व्यवहार करताना मात्र योग्य व्यक्तिचा सल्ला घ्यावा. उधारी-उसनवारी टाळावी. १६ तारखेला आपल्या राशीच्या षष्ठस्थानात रवि प्रवेश करीत आहे. आपल्या राशीत नेपच्युन तर सुखस्थानात गुरू-शुक्र-केतूचे भ्रमण होत आहे. घरात मंगलकार्याची नांदी होईल. घरातील दुर्लक्षित कामांसाठी वेळ देता येईल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. अष्टमस्थ मंगळ-शनिमुळे प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. उष्णतेचे विकार, नेत्रविकार यांचा त्रास उद्भवू नवीन वास्तु अथवा स्थावराचे व्यवहार यांचे व्यवहारात विलंब होण्याची शक्यता राहते. जबाबदारीची कामे स्वीकाराल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांतून यश लाभेल. नवीन व्यावसायिक करार होतील. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. व्यवसाय-उद्योगातून कामाचा व्याप वाढेल.

मीन
सप्तमस्थ मंगळ-शनि मात्र जोडीदाराचे वर्चस्व वाढविणारे राहतील. भागीदारी व्यवसायात नवीन कार्यारंभ होतील. मात्र कोणावरही अवलंबून न राहता प्रत्येक कामात आपण स्वत लक्ष घालावे, म्हणजे फायदा होईल. महिलांची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. सरकारी नोकरीत कार्यरत असणार्‍या तरुणांना पदोन्नती लाभेल. सुखस्थानातील रविमुळे जवळच्या मोठय़ा व्यक्तिचा वरदहस्त लाभेल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रातून आपली प्रतिष्ठा उंचावेल. परप्रांताशी व्यावसायिक संबंध सुधारतील. कामानिमित्त परदेशप्रवास घडून येतील. सतत प्रगती पथावर राहण्यासाठी कामाच्या विस्ताराचा ध्यास घ्याल.
सर्व पहा

नवीन

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

Santoshi Mata Vrat Vidhi in Marathi संतोषीमाता व्रत संपूर्ण माहिती

आरती शुक्रवारची

गंभीर आजारांपासून मुक्त राहण्यासाठी अश्वत्थ स्तोत्राचे पठण करा Ashwattha Stotram

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार